Friday, March 22, 2019


‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधील स्पर्धक अनुष्का पात्राला दिली हिमेश रेशमियाने तिची पहिली सांगीतिक संधी!

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या भारतातील लहान मुलांच्या गाण्यांच्या सर्वाधिक पसंतीच्या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाच्या आगामी भागात स्पर्धकांनी सादर केलेल्या अप्रतिम गाण्यांनी प्रेक्षकांना मोहवून टाकले आहे. येत्या वीकेण्डच्या भागात नामवंत गायक आणि उत्कृष्ट संगीतकार हिमेश रेशमिया हा अतिथी परीक्षक म्हणून या कार्यक्रमात सहभागी होत आहे. आतापर्यंत ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या कार्यक्रमात हिमेशचा सहभाग नेहमीच राहिलेला असल्याने तो या कार्यक्रमात सहभागी झाल्यमुळे सर्व स्पर्धक तसेच प्रशिक्षकही उल्हसित झाले होते. आपल्या स्वगृही आल्यावर आनंदित झालेल्या हिमेश रेशमियानेही स्पर्धकांना केवळ प्रोत्साहन दिले नाही, तर त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे गाणे कसे गावे, याचे मार्गदर्शनही केले.
काही लिटिल चॅम्प्सच्या सुरेल गीते ऐकल्यानंतर अनुष्का पात्रा या बालस्पर्धकाने गायलेल्या ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’ चित्रपटातील ‘पर्दा पर्दा’  या गाण्यमुळे हिमेश एकदम भारावून गेला. सर्वच परीक्षकांनीही अनुष्काची या गाण्याबद्दल जोरदार प्रशंसा केली; पण नंतर हिमेशने जी कृती केली, त्यामुळे अनुष्काचे जीवनच बदलून गेले! हिमेशने चक्क आपल्या ‘एक्सपोझे रिटर्न्स’  या आगामी चित्रपटात पार्श्वगायन करण्याची ऑफर तिला दिली! तिच्या सुरेल आवाजाने आणि अप्रतिम सादरीकरणाने पुरता भारावून गेलेल्या हिमेशने तिची स्तुती करताना सांगितले, “अनुष्का, तू तर पार्श्वगायन करण्यास अगदी तयार झाली आहेस. बॉलीवूडच्या चित्रपटांसाठी लागणारा अचूक आवाज आणि पार्श्वगायनासाठी लागणारा आत्मविश्वास तुझ्याकडे आहे. तसंच गाण्याकडे योग्य पध्दतीने पाहण्याचा दृष्टिकोनही तुझ्याकडे आहे. म्हणूनच माझ्या एक्सपोझे रिटर्न्स’  या आगामी चित्रपटासाठी तू पार्श्वगायन करावंस, अशी माझी इच्छा आहे!”
अशी सुवर्णसंधी अकस्मात मिळाल्याने मनातून थक्क झालेल्या 12 वर्षांच्या अनुष्काच्या तोंडून आनंदामुळे काही शब्दच फुटत नव्हते. इतके उत्कृष्ट गायन केल्याबद्दल अनुष्काची आणि या तरुण गुणी स्पर्धकाच्या आवाजाची कदर करून तिला पार्श्वगायनाची संधी दिल्याबद्दल हिमेश रेशमियाचीही तारीफ करावी तितकी थोडीच ठरेल.
कार्यक्रमात स्पर्धकांनी अतिथी परीक्षक असलेल्या हिमेश रेशमियाची काही अतिशय गाजलेली गाणी एकामागोमाग एक अप्रतिम शैलीत सादर केली. यापूर्वी जेव्हा हिमेश या कार्यक्रमात सहभागी झाला होता, तेव्हा त्याने त्यातील छोटे भगवान म्हणून ओळखल्या जाणार्‍्या एका स्पर्धकाला जो गुरुमंत्र दिला होता (जय माता दी लेटस रॉक!) त्याची सर्वांना आठवण आली. त्याशिवाय अमाल मलिक या परीक्षकाच्या आईने हिमेशची काही गुपिते एका व्हिडिओ संदेशाद्वारे उघड केल्याने कार्यक्रमात एकच धमाल झाली. तसेच आपल्या जंगली या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी या कार्यक्रमात सहभागी झालेला अभिनेता विद्युत जमवाल यानेही आपल्या तंदुरुस्त शरीराची काही गुपिते सांगितली. एकंदरीतच या वीकेण्डच्या भागात काही संस्मरणीय क्षण आणि अप्रतिम गाणी पाहायला मिळतील.
अधिक जाणून घेण्यासाठी तसेच स्पर्धकांची सुरेल आवाजातील गाणी ऐकण्यासाठी  पाहा ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ शनिवार-रविवारी रात्री 9.00 वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर!








No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...