‘मीट इंडियाज पॅशनिस्टास’ अहवालातून देशभरातील भारतीयांची पॅशनवर आधारित मैत्री स्पष्ट
सिंगापूर टुरिझम बोर्डने केलेल्या सर्वेक्षणाच्या अनुसार, पॅशनिस्टची वैशिष्ट्ये मुंबई व नवी दिल्ली येथे अधिक प्रकर्षाने दिसूनयेतात
11 एप्रिल: 76.2% मुंबईकर व 82.4% दिल्लीकर त्यांच्या मासिक उत्पन्नातील काही भाग त्यांची पॅशन पूर्ण करण्यासाठी खर्च करतात. कुटुंबीयांना,मित्रमंडळींना किंवा कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्यांना माहीत नसू शकतील, अशा आपल्या पॅशन, गुप्त आवडी किंवा छंद आहेत, असे सर्वेक्षणामध्ये सहभागीझालेल्यांपैकी प्रत्येक शहरातील दोन तृतियांश जणांनी (दिल्ली - 63.4% व मुंबई – 73.4%) सांगितले.
पॅशन पूर्ण करण्यासाठी पगारातील काही भाग खर्च करण्यासाठी एक तृतियांशहून अधिक मुंबईकर (34.9%) व एक चतुर्थांशहून अधिक दिल्लीकर (25.2%)तयार असतात. सहापैकी एक मुंबईकर (15.8%) व आठपैकी एक दिल्लीकर (12.4%) यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील त्यांचे ‘फ्रेंड्स’, ‘लाइक्स’ व‘फॉलोअर्स’ हे एकसमान छंद वा आवडी यावर आधारित असतात.
आज, व्यक्तीच्या जीवनामध्ये पॅशन महत्त्वाची भूमिका बजावते. देशभर, सामाजिक जीवनात कोणालाही पहिल्यांदा भेटत असताना, स्वतःची ओळख करूनदिल्यावर संवादाचे विषय आपल्या आवडीनिवडी किंवा छंद हे असतात, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एक तृतियांशहून अधिक जणांनी (36.5%) सांगितले.
पैसे व वेळेचे व्यवस्थापन याबाबतचा व्यक्तीचा दृष्टिकोन; आणि अनेकदा स्वतःची माहिती त्यांच्या पॅशनकडे झुकणारी असते. सिंगापूर टुरिझन बोर्डने केलेल्या “मीटइंडियाज पॅशनिस्टास” या देशातील 14 शहरांतून घेतलेल्या प्राथमिक माहितीवर आधारित असणाऱ्या[1] नव्या संशोधनामध्ये, कौटुंबिक दर्जा, करिअर व राहण्याचेठिकाण वा मूळ गाव अशा पारंपरिक माहितीच्या पलीकडे जाऊन भारतीय आता कशा प्रकारे नव्या भूमिका, व्याख्या व नाती याकडे पाहत आहेत, हे अधोरेखित केलेआहे.
उदाहरणार्थ, छंद किंवा आवडीनिवडी या आधारे मैत्री करतो, असे सांगणाऱ्या सर्वेक्षणातील सहभागींचे प्रमाण दिल्ली (24.3%), कोलकाता (19.2%) व पुणे(21.4%) येथे राष्ट्रीय सरासरीपेक्षा (17.98%) अधिक होते. छंद किंवा आवडीनिवडींनुसार मैत्री करण्याचे प्रमाण मुंबई व जयपूर या शहरांत तर याहून अधिक,अनुक्रमे 30.6% व 30.2% होते. या उलट, मैत्रीच्या बाबतीत अहमदाबाद पारंपरिक आहे आणि 74.3% व्यक्ती त्यांच्या शेजाऱ्यांशी मैत्री करतात.
अहवालामध्ये नमूद केलेली एक रंजक बाब म्हणजे, सर्वेक्षण करण्यात आलेल्या सर्व शहरांनी त्यांच्या पॅशनच्या बाबतीत गुप्तता राखली असल्याचे आढळले असलेतरी, दिल्ली (59.6%), जयपूर (62.1%), पुणे (59.7%), कोची (59.5%) व मुंबई (58.9%) या शहरांतील व्यक्ती त्यांच्या पॅशनबद्दल मित्र, नातेवाईक व सहकारीयांच्यापासून अधिक गुप्तता राखत असल्याचे निदर्शनात आले आहे. या तुलनेत राष्ट्रीय सरासरी 52.4% आहे. गुप्तता राखण्याच्या बाबतीत हैदराबादमधील प्रमाणतब्बल 95.7% आहे.
हैदराबादमधील 95.2% सहभागींच्या मते, आपली पॅशन पूर्ण करण्यासाठी ते मासिक उत्पन्नातील 50% हून अधिक रक्कम खर्च करतात, आणि 77.3% जण रोजचेकाम करत असताना त्यांच्या पॅशनबाबत रोज किंवा वीकेण्डला काम करतात. परंतु, याबाबत मित्र, नातेवाईक व सहकारी यांना माहीत नसल्याचा दावा 64.4%जणांनी केला आहे.
सेकंडरी डाटाने या सर्व माहितीला दुजोरा दिला आहे. या डाटाच्या अनुसार, 26% महिला केवळ एखाद्या ठिकाणाचा अनुभव घेण्यासाठीच नव्हे, तर नव्या लोकांनाभेटण्यासाठी व नवी संस्कृती जाणून घेण्यासाठी सोलो ट्रिपवर जातात[2]. 27% महिलांनी सांगितले, छंद व पॅशन यांना वाव देण्यासाठी भविष्यात सोलो ट्रिपवर जाणारआहोत.[3]
एसटीबीचे प्रादेशिक संचालक (दक्षिण आशिया, मध्य पूर्व व आफ्रिका) जी. बी. श्रीथर यांनी स्पष्ट केले की, ‘पॅशनिस्टा’ ही संकल्पना संचालक मंडळाच्या ब्रँड“पॅशन मेड पॉसिबल” यास अनुसरून आहे आणि भारतीय स्वतःकडे कसे पाहतात, त्यांचे कोणाशी सूर जुळतात आणि ते कोणत्या तरी अर्थपूर्ण बाबींमध्ये पॅशन कशीअवलंबतात, यामध्ये डोकावणारी आहे.
त्यांनी सांगितले, “सिंगापूरमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या संख्येमध्ये सर्वाधिक संख्या असणाऱ्यांमध्ये भारताचे तिसरे स्थान कायम आहे. 2018 मध्ये, आमच्या देशातभारतातून 1.4 दशलक्षहून अधिक व्हिजिटर आले. 2017 या वर्षाच्या तुलनेत त्यात 13% वाढ झाली. पॅशन पूर्ण करण्यासाठी प्रवास करण्याचे लोकांचे प्