जॉली रँचरने भारतातील कॉन्फेक्शनरीमध्ये दाखल केले वैशिष्ट्यपूर्ण ‘ट्रिपल पॉप’
जॉली रँचरने भारतातील कॉन्फेक्शनरीमध्ये दाखल केले वैशिष्ट्यपूर्ण ‘ट्रिपल पॉप’
जॉली रँचर ट्रिपल पॉप ग्राहकांना एकाच लॉलिपॉपमध्ये देणार च्युई, क्रंची व पावडर्ड या स्वरूपांतील तीन फ्लेवर
मुंबई, 31 जुलै, 2019: हर्षी कंपनी या जगातील आघाडीच्या स्नॅकिंग कंपनीचा भाग असणाऱ्या हर्षी इंडिया प्रा. लि.ने जॉली रँचर ट्रिपल पॉप हा भारतातील पहिला तीन लेअरचा लॉलिपॉप दाखल केल्याचे जाहीर केले असून त्याच्या प्रत्येक लेअरमध्ये वेगळा फ्लेवर समाविष्ट आहे. हे नवे उत्पादन जॉली रँचर कॉन्फेक्शनरी उत्पादनांचा एक भाग असून, ही उत्पादने उत्कृष्ट,गोड व टँगी फ्रुटी फ्लेवरसाठी प्रसिद्ध आहेत. ब्रँडच्या व्यक्तिमत्त्वानुसार, जॉली रँचर ट्रिपल पॉपचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. हे प्रकार निरनिराळे फ्लेवर देत असून, त्यामध्ये बाहेरची च्युई लेअर, मधली क्रंची लेअर व त्यानंतर पावडर्ड सेंटर यांचा आनंद मिळेल.
जॉली रँचर ट्रिपल पॉप दोन विशेष प्रकारांमध्ये उपलब्ध असतील:
स्ट्रॉबेरी (च्युई आउटर) I मँगो (क्रंची मिडल लेअर) I रास्पबेरी (पावडर्ड सेंटर) व;
ब्लुबेरी (च्युई आउटर) I स्ट्रॉबेरी (क्रंची मिडल लेअर) I मँगो (पावडर्ड सेंटर)
ब्रँड अम्बेसिडर तमन्ना भाटिया यांचा सहभाग असणाऱ्या उत्पादनाच्या टेलिव्हिजन जाहिरातीमध्ये, तमन्ना ब्रेक घेत असताना ट्रिपल पॉपच्या फ्लेवर्सचा आनंद घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा जाहिरात तुम्हाला येथे पाहता येईल: Insert link
जॉली रँचर ट्रिपल पॉप दाखल केल्याबद्दल हर्षी इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक हरजित भल्ला यांनी सांगितले, “हर्षी इंडिया ग्राहकांच्या पसंतीच्या चवींच्या अनुषंगाने सातत्याने उत्पादनात बदल आणत असते. जॉली रँचर ही जगभरातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे व भारतातील लॉलिपॉप श्रेणीतील एक आघाडीचा ब्रँड आहे. तीन लेअर असणारे ट्रिपल पॉपअतिशय वेगळे आहे आणि या श्रेणीतील पहिलेवहिले आहे. भारतात हे उत्पादन दाखल करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
हर्षी इंडियाचे मार्केटिंग डायरेक्टर सरोष शेट्टी म्हणाले, “ग्राहकांना कॉन्फेक्शनरी श्रेणीतील नावीन्य अतिशय आवडते. ग्राहकांना अपूर्व अनुभव देणाऱ्या या उत्पादनामार्फत आम्ही ठसठशीत,फ्रुटी व धमाल ही ब्रँडची वैशिष्ट्ये पुन्हा सादर केली आहेत. आम्ही ब्रँडच्या जागतिक प्रसिद्धी घटकांचा वापर केला आहे, जसे सिग्नेचर अॅनिमेटेड फ्रुट कॅरॅक्टर, यामुळे ग्राहकांचा उत्साह व धमाल आणखी वाढेल. जॉली रँचर ट्रिपल पॉप दाखल केल्याचे टेलिव्हिजन व डिजिटल यासह सर्व माध्यमांतून जाहीर केले जाणार आहे. सेलिब्रेटी तमन्ना भाटिया या उत्पादनाचा चेहरा असणार आहेत.”
जॉली रँचर ब्रँड अम्बेसिडर तमन्ना भाटिया यांनी सांगितले, “तुम्हाला जवळच्या वाटणाऱ्या ब्रँडशी जोडलेले असणे नेहमीच उत्साहाचे असते. जॉली रँचर हा माझ्यासाठी असाच एक ब्रँड आहे. हा थोडीशी मौजमस्ती करणारा ठसठशीत, आकर्षक व धमाल ब्रँड आहे आणि हे माझ्या व्यक्तिमत्त्वातही दिसून येते. ट्रिपल पॉपद्वारे, ब्रँडने आणखी एकदा धमाल आणली आहे आणि माझ्याप्रमाणेच ग्राहकांनाही जॉली रँचर ट्रिपल पॉप नक्कीच आवडेल याची खात्री आहे!”
प्रत्येक जॉली रँचर ट्रिपल पॉप प्रकाराची किंमत 10 रुपये आहे.
हर्षी कंपनीविषयी
125वा वर्धापनदिन साजरा करणाऱ्या हर्षी कंपनीचे मुख्यालय पेन्सिल्वेनिया येथे आहे आणि ती या उद्योगातील आघाडीची स्नॅक्स कंपनी असून, ती वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड, उल्लेखनीय व्यक्ती व बालकांना मदत करण्यासाठी कटिबद्ध म्हणून नावाजली जाते. हर्षीचे जगभर अंदाजे 16,500 कर्मचारी आहेत व ते लज्जतदार, दर्जेदार उत्पादने देण्यासाठी दररोज कार्यरत आहेत. कंपनीचे जगभर 80 हून अधिक ब्रँड आहेत आणि ते 7.8 अब्ज डॉलरहून अधिक वार्षिक उत्पन्न नोंदवत आहेत. त्यामध्ये हर्षीज, रीसेज, किट कॅट, जॉली रँचर, आइस ब्रेकर्स, स्किनीपॉप व पायरेट्स बूटी अशा महत्त्वाच्या ब्रँडचा समावेश आहे.
125 वर्षे, हर्षी प्रामाणिकपणे, नैतिकपणे व शाश्वतपणे कार्यरत आहे. हर्षीचे संस्थापक मिल्टन हर्षी यांनी 1909 मध्ये मिल्टन हर्षी स्कूलची स्थापना केली आणि तेव्हापासून कंपनी बालकांना मदत करण्यासाठी काम करत आहे.