Friday, August 2, 2019

बिग बॉसमध्ये आरोह वेलणकरने सांगितले दिव्यांगांसाठी काम करतानाचे अनुभव

बिग बॉसमध्ये आरोह वेलणकरने सांगितले दिव्यांगांसाठी काम करतानाचे अनुभव


बिग बॉसमध्ये आरोह वेलणकरने सांगितले दिव्यांगांसाठी काम करतानाचे अनुभव


बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या रेगे फेम अभिनेता आरोह वेलणकरने समाजसेवा करतानाचे काही अनुभव बिग बॉसच्या घरच्यांशी बोलताना शेअर केले. बिग बॉस मराठीच्या अनसीन अनकट व्हिडीओमध्ये दिव्यांगांच्या असामान्य कर्तृत्वाच्या यशोगाथा आरोहने सांगितल्या.

आरोह वेलणकर म्हणाला, मी ज्या दिव्यांगांच्या संस्थेसोबत काम करतो. त्या संस्थेसोबत काम करताना दिव्यांगांच्या असामान्य कर्तृत्वाची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याचा डान्स करताना अपघात झाला. ह्या अपघातात तो मानेखालचे शरीर निकामी होऊनही न डगमगता त्याने इंजिनिअरिंग पूर्ण करून आता एक वेबसाइट सुरू केली आहे. मला भेटलेल्या अशा अनेक असामान्य व्यक्तिंमध्ये अपघातात एमए इकॉनोमिक्स असलेला अपघातग्रस्त टॅक्सीचालक, संपूर्ण अंध असलेल्या एका महिला वकिलाची आणि पाय नसलेल्या बॉडीबिल्डर मि.ऑलिम्पियाची यशोगाथा मला भारावून टाकणारी होती.

सुत्रांच्या अनुसार, अभिनेता आरोह वेलणकर निरनिराळ्या सामाजिक संस्थांसोबत संलग्न आहे. आय व्होट’ ह्या जनजागृती मोहिमेतून त्याने नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकांमध्ये मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. तसेच माय होम इंडिया ह्या सामाजिक एकात्मतेसाठी काम करणा-या संस्थेसोबतही तो संलग्न आहे. माय होम इंडियाच्या सपनों से अपनों तक ह्या मोहिमेत त्याचा सक्रिय सहभाग होता. बिग बॉसमध्ये आरोहने नुकतेच काही हृदयस्पर्शी अनुभव सांगितले. हे अनुभव त्याला नुतन गुळगुळे फाउंडेशन’ सोबत काम करताना आले होते. ह्या समाजसेवी संस्थेव्दारे काम करताना त्याला दिव्यांगाच्या असामान्य प्रतिभेची अनुभूती आली. आरोहला जेव्हा जेव्हा चित्रीकरणातून किंवा नाटकांच्या प्रयोगांमधून वेळ मिळतो तेव्हा तो सामाजिक कार्यामधे स्वतःला गुंतवतो.


बिग बॉसमध्ये आरोह वेलणकरने सांगितले दिव्यांगांसाठी काम करतानाचे अनुभव

बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या ‘रेगे’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने समाजसेवा करतानाचे काही अनुभव बिग बॉसच्या घरच्यांशी बोलताना शेअर केले. बिग बॉस मराठीच्या अनसीन अनकट व्हिडीओमध्ये दिव्यांगांच्या असामान्य कर्तृत्वाच्या यशोगाथा आरोहने सांगितल्या.

आरोह वेलणकर म्हणाला, “मी ज्या दिव्यांगांच्या संस्थेसोबत काम करतो. त्या संस्थेसोबत काम करताना दिव्यांगांच्या असामान्य कर्तृत्वाची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याचा डान्स करताना अपघात झाला. ह्या अपघातात तो मानेखालचे शरीर निकामी होऊनही न डगमगता त्याने इंजिनिअरिंग पूर्ण करून आता एक वेबसाइट सुरू केली आहे. मला भेटलेल्या अशा अनेक असामान्य व्यक्तिंमध्ये अपघातात एमए इकॉनोमिक्स असलेला अपघातग्रस्त टॅक्सीचालक, संपूर्ण अंध असलेल्या एका महिला वकिलाची आणि पाय नसलेल्या बॉडीबिल्डर मि.ऑलिम्पियाची यशोगाथा मला भारावून टाकणारी होती.”

सुत्रांच्या अनुसार, अभिनेता आरोह वेलणकर निरनिराळ्या सामाजिक संस्थांसोबत संलग्न आहे. ‘आय व्होट’ ह्या जनजागृती मोहिमेतून त्याने नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकांमध्ये मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. तसेच ‘माय होम इंडिया’ ह्या सामाजिक एकात्मतेसाठी काम करणा-या संस्थेसोबतही तो संलग्न आहे. माय होम इंडियाच्या ‘सपनों से अपनों तक’ ह्या मोहिमेत त्याचा सक्रिय सहभाग होता. बिग बॉसमध्ये आरोहने नुकतेच काही हृदयस्पर्शी अनुभव सांगितले. हे अनुभव त्याला ‘नुतन गुळगुळे फाउंडेशन’ सोबत काम करताना आले होते. ह्या समाजसेवी संस्थेव्दारे काम करताना त्याला दिव्यांगाच्या असामान्य प्रतिभेची अनुभूती आली. आरोहला जेव्हा जेव्हा चित्रीकरणातून किंवा नाटकांच्या प्रयोगांमधून वेळ मिळतो तेव्हा तो सामाजिक कार्यामधे स्वतःला गुंतवतो.

AROH WELANKAR'S SOCIAL WORK VIDEO

AROH WELANKAR'S SOCIAL WORK VIDEO

CAPTION FOR INSTAGRAM 

#BiggBossMarathi2 च्या घरात @arohwelankar सांगतोय समाजातील असामान्य व्यक्तींच्या यशोगाथा

@colorsmarathiofficial @endemolshineind #biggbossmarathi2 #arohwelankar #socialwork #goodhumanbeing #supportaroh #voteforarohwelankar

CAPTION FOR TWITTER
सामाजिक भान जपणारा #BiggBossMarathi2 च्या घरातील आवडता स्पर्धक @ArohWelankar   
@ColorsMarathiOfficial @EndemolShineIND

#biggbossmarathi2 #arohwelankar #socialwork #goodhumanbeing #supportaroh #voteforarohwelankar

CAPTION FOR FACEBOOK

 #BiggBossMarathi2 च्या घरातील #arohwelankar करतो सामाजिक कार्य 

#biggbossmarathi2  #socialwork #goodhumanbeing #supportaroh #voteforarohwelankar  

Thursday, August 1, 2019

Anna Bhau Sathe 100th Years Event Press Release

Anna Bhau Sathe 100th Years Event Press Release


अण्णा भाऊ साठे खर्‍या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्व होते - मुख्यमंत्री

मुंबई: अण्णा भाऊ साठे हे लोकशाहीर म्हणून सबंध महाराष्ट्राला परिचित आहेत. लोकशाहीर हे बिरूद त्यांच्या नावामागे नेहमीसाठीच आहे. त्यांनी शाहिरीला वैभव प्राप्त करून दिले. परंतु त्यांचे जीवन कायमच संघर्षमय राहिले.  महाराष्ट्राची शाहिरी परंपरा प्रदीर्घ व समृद्ध आहे. अण्णाभाऊंनी ती परंपरा अधिक उन्नतपरिणत व संपन्न केली असे गौरवोद्गार मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील रंगशारदा सभागृहामध्ये आयोजित अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षारंभ कार्यक्रमावेळी काढले. आजपासून आणा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे त्यानिमित्त मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अण्णा भाऊंचे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आलेहा कार्यक्रम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्याला राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटीलअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारमाजी मंत्री दिलीप कांबळेलोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समिती उपाध्यक्ष मधुकर कांबळे,  पोस्टाच्या मुंबई विभागाच्या स्वाती पांडेलहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती अध्यक्ष अशोक लोखंडेआमदार सुधाकर भालेराव यांची प्रमुख उपस्थिती यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारीअधिकारी आणि अण्णा भाऊंना मानणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 


 महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले कीपृथ्वी हि शेषनागाच्या नाही तर कामगारांच्या तळहातावर तरली आहे अशी अंत्योदयाची व्याख्या अण्णाभाऊंनी त्यांच्या काळातच केली आहे.   कथानाट्यलोक नाट्य कादंबऱ्याचित्रपटपोवाडेलावण्यावगगवळणप्रवास वर्णन असे सर्वच साहित्य प्रकार समृद्ध करणारे साहित्यरत्न म्हणून अण्णा भाऊंची ओळख आहे. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय त्यांना जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळगोवा मुक्ती संग्रामात त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान मोलाचे आहे.  अशा साहित्यातून सामान्य माणसांच्या दु:खाला वाचा फोडणा-या लोकशाहीर अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दीची सुरुवात आज मुख्यत्र्यांच्या उपस्थितीत होत आहे. जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने हा टपाल तिकिटाच्या प्रकाशनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. त्याचसोबत आज जन्मशताब्दी सोहळ्याचा लोगो अनावरण,महामंडळाच्या वेबसाईटचे अनावरण तसेच गुणवंत विद्यर्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वितरणाचा सोहळा आज मुख्यंमत्री तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटीलअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. अश्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी अण्णा भाऊंची जन्मशताब्दी साजरी होत आहे ही महाराष्ट्रासाठी गौरवास्पद बाब आहे.

अण्णा भाऊ साठे महामंडळाचे भागभांडवल ३०० कोटी वरून ५०० कोटी करावे२००६ ते २०१२ या कालावधी मधील कर्जांना कर्जमाफी मिळावीअण्णाभाऊ आणि लहुजी स्मारक यांच्या कामास गती मिळावीअबकड आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा तसेच लहुजी आयोगाचे पुनर्गठन व्हावे आणि अण्णा भाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी केली.    

मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, अण्णाभाऊंनी अनेक पोवाडे लिहिले व गायिले. त्यांची शाहिरी ही त्यांच्या हातातली तळपती तलवार होती. कामगार चळवळीत त्यांचे व्यक्तिमत्त्व ढाळले गेले होते. ते साम्यवादी होते. कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा प्रत्येक नेता हा अण्णाभाऊंच्या शाहिरीचा जणू नायक होता. अण्णा भाऊंची जन्मशताब्दीची सुरुवात आज होत आहे महामंडळाच्या वतीने अनेक नाविन्यपूर्ण व समाजाला पुढे नेण्याचे उपक्रम महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या माध्यमातून होतील असा मला विश्वास आहे. अण्णा भाऊंचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवावेत यासाठी अमित गोरखे नक्कीच प्रयत्नशील राहतील. अण्णाभाऊंच्या कारकिर्दीवर सिनेमा काढला जावा. समाजातील जनतेला एक लाख घरे देण्याचे आश्वासन आम्ही दिले होते त्याची आता पूर्ती होत आहे याचे समाधान आहे. आधीच ७५ हजार घरांचे वाटप झाले आहे तसेच उरलेल्या २५ हजार घरांचेही वाटप लवकरच होतील त्यासाठी शासन आणि महामंडळ प्रयत्नशील राहील.


 राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले किमहामंडळाने अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची आजपासून अभिनव सुरुवात मुख्यत्र्यांच्या उपस्थितीत झाली.  वर्षभर हे सर्व उपक्रम व समाजासाठी शाश्वत काम महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या प्रयत्नातून यशस्वीपणे होतील असा मला विश्वास आहे. 

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि, आपल्या देशाला थोर स्वातंत्र्य सेनानींच्या मुळे स्वातंत्र्य मिळाले आहे. अश्या स्वातंत्र्य  सेनानींमध्ये महाराष्ट्र अग्रेसर होता.  संयुक्त महाराष्ट्र चळवळगोवा मुक्ती संग्रामात अण्णा भाऊंनी शाहिरीतून दिलेले योगदान मोलाचे आहे.   आजपासून महामंडळ आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने लोकशाहीर आणा भाऊ साठे जन्मशताब्दीला सुरुवात होत आहेविविध्यपूर्ण उपक्रम वर्षभर व्हावेत यासाठी शुभेच्छा. महामंडळाच्या उपक्रमात शासन नेहमीच मदतशीर राहील अशी ग्वाही मी यानिमित्ताने देतो.  महामंडळाचे एमडी विक्रांत बगाडे यांनी आभार मानले 

'पुष्पक विमान'च्या फिल्ममेकर सोबत पुर्वी भावेचे नवे प्रोजेक्ट

'पुष्पक विमान'च्या फिल्ममेकर सोबत पुर्वी भावेचे नवे प्रोजेक्ट


'पुष्पक विमान'च्या फिल्ममेकर सोबत पुर्वी भावेचे नवे प्रोजेक्ट

अभिनेत्री आणि नृत्यांगना पुर्वी भावेच्या अंतर्नाद’ डान्स सिरीज मधले भज गणपती हे पहिले गाणे लोकांच्या पसंतीस उतरल्यावर आता ह्या सीरिजमधले दुसरे गाणे धागा प्रेम का’ नुकतेच रिलीज झाले आहे. गाण्याची विशेषता म्हणजे या गाण्याचं दिग्दर्शन पुष्पक विमान ह्या सिनेमाचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर ह्यांनी केले आहे.

ह्या गाण्याविषयीअभिनेत्री पुर्वी भावे सांगते, “भरतनाट्यम नृत्यप्रकाराचे मी शास्त्रशुध्द शिक्षण घेतले आहे. त्यामुळे ह्या नृत्यशैलीत पहिला आणि ह्याच नृत्यशैलीत दूसराही व्हिडीयो आला आहे. युगानुयुगांपासून पारंपारिक शास्त्रीय कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहचवल्या गेल्या आहेत. आत्ताच्या पिढीपर्यंत भरतनाट्यम हा नृत्यप्रकार पोचावा यासाठी युट्युब हे उत्तम माध्यम आहे. एखाद्या कलेची सिरीज करत असताना त्यात विविध प्रकारच्या भावभावनांचा अंतर्भाव केला पाहिजे. म्हणून अंतर्नाद’ डान्स सिरीजमधल्या दूस-या गाण्यामध्ये एक प्रेमकथा दाखवली गेली आहे. 

धागा प्रेम का’ या गाण्यात रहीम दास ह्यांचे दोन लोकप्रिय दोहे आहेत. प्रेमाचा धागा तोडू नये, तुटला तर गाठ पडते. अशा आशयाचे हे गाणे आहे. गाण्यात नृत्यांगना आणि मृदुंग वादक या जोडीची प्रेमकथा भरतनाट्यमच्या माध्यमातून सांगितली आहे. या गाण्याच्या शुटींगचा अनुभव सांगताना पुर्वी भावे म्हणते, “या गाण्यात जितकी माणसं स्क्रीन वर दिसत आहेत त्यापैकी कुणालाच शुटिंगचा अनुभव नव्हता. मात्रकसलेला दिग्दर्शक वैभव चिंचाळकर ह्याने सर्वांकडून उत्तम परफॉर्मन्स करवून घेतला आहे. याआधीच्या भज गणपती’ डान्स मध्ये मी एकटीच दिसले होते. परंतु ह्या गाण्यात माझी डान्स अकॅडमी हाउस ऑफ नृत्य’ च्या विद्यार्थिनींचाही सहभाग आहे. “  

'पुष्पक विमान'च्या फिल्ममेकर सोबत पुर्वी भावेचे नवे प्रोजेक्ट
अभिनेत्री आणि नृत्यांगना पुर्वी भावेच्या अंतर्नाद’ डान्स सिरीज मधले भज गणपती हे पहिले गाणे लोकांच्या पसंतीस उतरल्यावर आता ह्या सीरिजमधले दुसरे गाणे धागा प्रेम का’ नुकतेच रिलीज झाले आहे. गाण्याची विशेषता म्हणजे या गाण्याचं दिग्दर्शन पुष्पक विमान ह्या सिनेमाचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर ह्यांनी केले आहे.
ह्या गाण्याविषयीअभिनेत्री पुर्वी भावे सांगते, “भरतनाट्यम नृत्यप्रकाराचे मी शास्त्रशुध्द शिक्षण घेतले आहे. त्यामुळे ह्या नृत्यशैलीत पहिला आणि ह्याच नृत्यशैलीत दूसराही व्हिडीयो आला आहे. युगानुयुगांपासून पारंपारिक शास्त्रीय कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहचवल्या गेल्या आहेत. आत्ताच्या पिढीपर्यंत भरतनाट्यम हा नृत्यप्रकार पोचावा यासाठी युट्युब हे उत्तम माध्यम आहे. एखाद्या कलेची सिरीज करत असताना त्यात विविध प्रकारच्या भावभावनांचा अंतर्भाव केला पाहिजे. म्हणून अंतर्नाद’ डान्स सिरीजमधल्या दूस-या गाण्यामध्ये एक प्रेमकथा दाखवली गेली आहे. 
धागा प्रेम का’ या गाण्यात रहीम दास ह्यांचे दोन लोकप्रिय दोहे आहेत. प्रेमाचा धागा तोडू नये, तुटला तर गाठ पडते. अशा आशयाचे हे गाणे आहे. गाण्यात नृत्यांगना आणि मृदुंग वादक या जोडीची प्रेमकथा भरतनाट्यमच्या माध्यमातून सांगितली आहे. या गाण्याच्या शुटींगचा अनुभव सांगताना पुर्वी भावे म्हणते, “या गाण्यात जितकी माणसं स्क्रीन वर दिसत आहेत त्यापैकी कुणालाच शुटिंगचा अनुभव नव्हता. मात्रकसलेला दिग्दर्शक वैभव चिंचाळकर ह्याने सर्वांकडून उत्तम परफॉर्मन्स करवून घेतला आहे. याआधीच्या भज गणपती’ डान्स मध्ये मी एकटीच दिसले होते. परंतु ह्या गाण्यात माझी डान्स अकॅडमी हाउस ऑफ नृत्य’ च्या विद्यार्थिनींचाही सहभाग आहे. “  

Press Note on- सई देवधर दिग्दर्शित ‘सायलेंट-टाईज’ शॉर्ट फिल्ममध्ये रेणुका शहाणे साकारणार प्रमुख भूमिका

Press Note on- सई देवधर दिग्दर्शित ‘सायलेंट-टाईज’ शॉर्ट फिल्ममध्ये रेणुका शहाणे साकारणार प्रमुख भूमिका


सई देवधर दिग्दर्शित सायलेंट-टाईज’ शॉर्ट फिल्ममध्ये रेणुका शहाणे साकारणार प्रमुख भूमिका

OR

सायलेंट-टाईज’ मधून सई देवधर घेऊन येतेय एक नवीन नाजूक विषय अन् प्रमुख भूमिका साकारणार रेणुका शहाणे

गेली अनेक वर्षे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सई देवधरने मराठी सिनेमातही काम करावं अशी अनेकांची इच्छा नुकतीच मोगरा फुलला’ या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झाली. आणि या सिनेमानंतर तिचे काम पुन्हा एकदा पाहायला मिळावे असे अनेकांना वाटले. अभिनेत्रीसह दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून पण काम पाहणारी धाडसीमेहनतीजिद्दी सई जास्त वेळ तिच्या कामापासून लांब राहू शकत नाही हे ही तितकेच खरे आहे. सतत काही ना काही नवीन करत राहायचंशिकत राहायचं असा विचार करणारी सई आता काय घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष हमखास असणार यात शंका नाही.

काही दिवसांपूर्वी सई देवधरने तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवर अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिची आई आणि दिग्दर्शिका श्राबणी देवधरही होत्या. आणि त्या फोटोसह सईने स्पष्ट म्हंटलंय की ‘My second directorial venture’. याचाच अर्थ असा की झी5 वरील डेट’ या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन सईने केले होते आणि आता ती पुन्हा एक नवीन शॉर्ट फिल्म दिग्दर्शित करणार आहे ज्याचे नाव आहे सायलेंट-टाईज’.


 पलाश दत्ता यांनी निर्मित केलेल्या सायलेंट-टाईज’ या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सईने एक नवीन पण तितकाच नाजूक विषय सुंदर पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एलजीबीटी विषयी समाजाला आणि समाजातील लोकांना जागरुक करणे हा या शॉर्ट फिल्मचा हेतू आहे. ही एक कौटुंबिक कथा आहे जी बहिण-भावाच्या नात्यावर आधारित आहे आणि अभिनेत्री रेणुका शहाणे यामध्ये बहिणीची भूमिका साकारणार आहे.

 या महिन्यात रक्षाबंधन सण ही येतोय आणि सईची नवीन शॉर्ट फिल्म देखील येतेयत्यामुळे एक छान कलाकृती आणि सोबतीला ब-याच दिवसांनी रेणुका शहाणे यांचा अभिनय पण प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे नक्की.

जॉली रँचरने भारतातील कॉन्फेक्शनरीमध्ये दाखल केले वैशिष्ट्यपूर्ण ‘ट्रिपल पॉप’

जॉली रँचरने भारतातील कॉन्फेक्शनरीमध्ये दाखल केले वैशिष्ट्यपूर्ण ‘ट्रिपल पॉप’


जॉली रँचरने भारतातील कॉन्फेक्शनरीमध्ये दाखल केले वैशिष्ट्यपूर्ण ट्रिपल पॉप
जॉली रँचर ट्रिपल पॉप ग्राहकांना एकाच लॉलिपॉपमध्ये देणार च्युईक्रंची व पावडर्ड या स्वरूपांतील तीन फ्लेवर

मुंबई31 जुलै, 2019: हर्षी कंपनी या जगातील आघाडीच्या स्नॅकिंग कंपनीचा भाग असणाऱ्या हर्षी इंडिया प्रा. लि.ने जॉली रँचर ट्रिपल पॉप हा भारतातील पहिला तीन लेअरचा लॉलिपॉप दाखल केल्याचे जाहीर केले असून त्याच्या प्रत्येक लेअरमध्ये वेगळा फ्लेवर समाविष्ट आहे. हे नवे उत्पादन जॉली रँचर कॉन्फेक्शनरी उत्पादनांचा एक भाग असूनही उत्पादने उत्कृष्ट,गोड व टँगी फ्रुटी फ्लेवरसाठी प्रसिद्ध आहेत. ब्रँडच्या व्यक्तिमत्त्वानुसार, जॉली रँचर ट्रिपल पॉपचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. हे प्रकार निरनिराळे फ्लेवर देत असूनत्यामध्ये बाहेरची च्युई लेअर, मधली क्रंची लेअर व त्यानंतर पावडर्ड सेंटर यांचा आनंद मिळेल.

जॉली रँचर ट्रिपल पॉप दोन विशेष प्रकारांमध्ये उपलब्ध असतील:
स्ट्रॉबेरी (च्युई आउटर) मँगो (क्रंची मिडल लेअर) I रास्पबेरी (पावडर्ड सेंटर;
ब्लुबेरी (च्युई आउटर) I स्ट्रॉबेरी (क्रंची मिडल लेअर) I मँगो (पावडर्ड सेंटर)

ब्रँड अम्बेसिडर तमन्ना भाटिया यांचा सहभाग असणाऱ्या उत्पादनाच्या टेलिव्हिजन जाहिरातीमध्ये, तमन्ना ब्रेक घेत असताना ट्रिपल पॉपच्या फ्लेवर्सचा आनंद घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा जाहिरात तुम्हाला येथे पाहता येईल: Insert link

जॉली रँचर ट्रिपल पॉप दाखल केल्याबद्दल हर्षी इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक हरजित भल्ला यांनी सांगितले, हर्षी इंडिया ग्राहकांच्या पसंतीच्या चवींच्या अनुषंगाने सातत्याने उत्पादनात बदल आणत असते. जॉली रँचर ही जगभरातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे व भारतातील लॉलिपॉप श्रेणीतील एक आघाडीचा ब्रँड आहे. तीन लेअर असणारे ट्रिपल पॉपअतिशय वेगळे आहे आणि या श्रेणीतील पहिलेवहिले आहे. भारतात हे उत्पादन दाखल करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.


हर्षी इंडियाचे मार्केटिंग डायरेक्टर सरोष शेट्टी म्हणालेग्राहकांना कॉन्फेक्शनरी श्रेणीतील नावीन्य अतिशय आवडते. ग्राहकांना अपूर्व अनुभव देणाऱ्या या उत्पादनामार्फत आम्ही ठसठशीत,फ्रुटी व धमाल ही ब्रँडची वैशिष्ट्ये पुन्हा सादर केली आहेत. आम्ही ब्रँडच्या जागतिक प्रसिद्धी घटकांचा वापर केला आहेजसे सिग्नेचर अॅनिमेटेड फ्रुट कॅरॅक्टर, यामुळे ग्राहकांचा उत्साह व धमाल आणखी वाढेल. जॉली रँचर ट्रिपल पॉप दाखल केल्याचे टेलिव्हिजन व डिजिटल यासह सर्व माध्यमांतून जाहीर केले जाणार आहे. सेलिब्रेटी तमन्ना भाटिया या उत्पादनाचा चेहरा असणार आहेत.”

जॉली रँचर ब्रँड अम्बेसिडर तमन्ना भाटिया यांनी सांगितले, तुम्हाला जवळच्या वाटणाऱ्या ब्रँडशी जोडलेले असणे नेहमीच उत्साहाचे असते. जॉली रँचर हा माझ्यासाठी असाच एक ब्रँड आहे. हा थोडीशी मौजमस्ती करणारा ठसठशीतआकर्षक व धमाल ब्रँड आहे आणि हे माझ्या व्यक्तिमत्त्वातही दिसून येते. ट्रिपल पॉपद्वारेब्रँडने आणखी एकदा धमाल आणली आहे आणि माझ्याप्रमाणेच ग्राहकांनाही जॉली रँचर ट्रिपल पॉप नक्कीच आवडेल याची खात्री आहे!”

प्रत्येक जॉली रँचर ट्रिपल पॉप प्रकाराची किंमत 10 रुपये आहे.

हर्षी कंपनीविषयी 
125वा वर्धापनदिन साजरा करणाऱ्या हर्षी कंपनीचे मुख्यालय पेन्सिल्वेनिया येथे आहे आणि ती या उद्योगातील आघाडीची स्नॅक्स कंपनी असून, ती वैशिष्ट्यपूर्ण ब्रँडउल्लेखनीय व्यक्ती व बालकांना मदत करण्यासाठी कटिबद्ध म्हणून नावाजली जाते. हर्षीचे जगभर अंदाजे 16,500 कर्मचारी आहेत व ते लज्जतदारदर्जेदार उत्पादने देण्यासाठी दररोज कार्यरत आहेत. कंपनीचे जगभर 80 हून अधिक ब्रँड आहेत आणि ते 7.8 अब्ज डॉलरहून अधिक वार्षिक उत्पन्न नोंदवत आहेत. त्यामध्ये र्षीजरीसेजकिट कॅटजॉली रँचरआइस ब्रेकर्सस्किनीपॉप व पायरेट्स बूटी अशा महत्त्वाच्या ब्रँडचा समावेश आहे.

125 वर्षे, हर्षी प्रामाणिकपणेनैतिकपणे व शाश्वतपणे कार्यरत आहे. हर्षीचे संस्थापक मिल्टन हर्षी यांनी 1909 मध्ये मिल्टन हर्षी स्कूलची स्थापना केली आणि तेव्हापासून कंपनी बालकांना मदत करण्यासाठी काम करत आहे.


‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...