We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Thursday, February 20, 2020
सावनी रविंद्रचे 'शोन रे शोखी' ह्या बंगाली गाण्याव्दारे बंगाली सिनेसृष्टीत पदार्पण
सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्रने मराठी, गुजराती तमिल, तेलगु, मल्याळम, कन्नडा अशा सहा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गाऊन बहुभाषिक रसिकांची मनं जिंकल्यावर आता ती बंगालीमध्ये आपलं पहिलं ‘सिंगल’ घेऊन आली आहे. ‘शोन रे शोखी’ हे तिचं पहिलं बंगाली गाणं रिलीज झालंय.
बंगाली गाणं गाण्यासाठी सावनी बंगाली शिकली. ती म्हणते, “गाणं गाताना शब्द उच्चारणही महत्वाचं असतं. प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो. तो ही यायला हवा. त्यामूळे गाण्यावर अर्थातच खूप मेहनत करावी लागली. हे गाणं आपली स्वप्न साकार करण्यासाठी निघालेल्या मुलीचं मनोविश्व सांगणारं गाणं आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना मनोबल देणारं आणि सकारात्मक दृष्टीकोन देणारं गाणं आहे.”
सावनीने गायलेल्या ह्या गाण्याचे गीत लिहिले आहेत, नाबरून भट्टाचार्य जी ह्या गीतकारने. तर शुभंकर शेंबेकरने गाण्याला संगीत दिलंय. गाण्याचे चित्रीकरण गोव्यात झालेलं आहे. गाण्याच्या मूडनूसार, गोव्यासारख्या शांत आणि रम्य ठिकाणाची निवड करण्यात आलीय. नवीन शहरात एकटीने राहणं, वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देणं, आणि करीयर करणं हे कठीण जरूर असतं, पण अशक्य नसतं हेच ह्या व्हिडीयोतून दर्शवण्यात आलंय. डॉ. आशिष धांडे ह्यांनी ह्या गाण्याची निर्मिती केलीय. नवीन वर्षात सावनीचा नव्या सिनेसृष्टीतलं हे पहिलं पाऊल निश्चितच वाखाणण्याजोगं आहे.
*महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री श्री. राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून साकारला ‘दाह’ सिनेमा*
माजी सामाजिक न्याय मंत्री श्री. राजकुमार बडोले यांचे कार्य महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. सामाजिक न्याय विभागाने त्यांच्या कार्यकाळात खूप मोठे निर्णय घेतले. लंडनमध्ये परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर व इंदू मील येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचा निर्णय, किंवा मुलींसाठी ५० नवीन वसतिगृह सुरू करणे, किंवा ओबिसीच्या किमी लेअरची मर्यादा वाढविणे व ओबिसी मुलींना एमपीएससी साठी आरक्षण अशा अनेक निर्णयाबाबत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच त्यांच्यां कार्यकाळात दिव्यांग शाळा संहिता व जेष्ठ नागरिकांचे धोरण देखील आखले गेले.
राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती राजकुमार बडोले यांचे पुत्र अनिकेत राजकुमार बडोले यांनी केली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून समाजसेवा, आपल्या शिक्षणाचा, बुध्दिचा वापर गावातील लोकांच्या भल्यासाठी कसा करता येईल हा एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे.
या सिनेमाविषयी आपलं मत व्यक्त करताना त्यांनी म्हटले की, "सामाजिक विषयावर आधारित हा सिनेमा आहे. गावागावांमध्ये अजूनही अशा काही अंधश्रद्धा, रुढी, परंपरा, व्यवस्था आहेत ज्याचा परिणाम समाजावर होत असतो. जसे की उच्च जातीच्या व्यक्तीकडून खालच्या जातीच्या व्यक्तींसोबत होणार भेदभाव, एखादा आजार बरा करण्यासाठी पसरवली जाणारी अंधश्रद्धा, दारूबंदी सारख्या विषयाला होणारा विरोध आदी. या सर्व गोष्टी सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील एकूण व्यवस्था दाखवण्यात आली आहे.
समाजप्रबोधनासाठी सिनेमा हे एक प्रबळ साधन आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विशेष करून अधोरेखित करण्यात आले आहे की 'माणुसकीचा धागा हा रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त घट्ट बांधला जातो'.
मनोरंजनाच्या दृष्टीने सिनेमातील गाणी पण सुंदर झाली आहेत आणि सिनेमातील प्रत्येकाने खूप छान काम केलं आहे आणि एक चांगला मराठी सिनेमा तयार झाला आहे."
सायली संजीव, गिरीश ओक, राधिका विद्यासागर, सुह्रद वार्डेकर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौघुले यांच्या महत्वपूर्ण भूमिका असलेला ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.
‘एबी आणि सीडी’ चा याराना १३ मार्चला रुपेरी पडद्यावर
‘याराना’ सिनेमातील ‘ सारा जमाना हसींनो का दिवाना ’ हे गाणं ऐकल्यावर लगेच पाय थिरकायला लागतात आणि त्याचवेळी डोळ्यांसमोर उभा राहतो या गाण्यातील अमिताभ बच्चन यांचा गेट अप. आता मराठी प्रेक्षकांना हा गेट अप नव्याने आठवेल कारण गेल्या वर्षी गणरायाचे आगमन झाल्यावर अभिनेते विक्रम गोखले यांच्या ‘एबी आणि सीडी’ या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या पोस्टरमध्ये विक्रम गोखले यांनी अमिताभजींच्या स्टाईलचा गेट अप केला होता आणि ‘चंदू मी आलो ’ असं वाक्य त्या पोस्टरसह अधोरेखित करण्यात आले होते.
अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि पीव्हीआर प्रदर्शित ‘एबी आणि सीडी’चे पहिले पोस्टर लालबागच्या राजाच्या चरणी प्रदर्शित करण्यात आले होते.
औरंगाबाद येथील आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या 'औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२०' मध्ये मिलिंद लेले दिग्दर्शित 'एबी आणि सीडी' या सिनेमाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या नवीन पोस्टरमधून विक्रम गोखले आणि बिग बी यांच्या भूमिकेची आणखी एक नवीन झलक पाहायला तर मिळतेच पण त्याचसोबत सिनेमाची प्रदर्शित तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर घडणारी आनंदी घटना आणि त्याचे सेलिब्रेशन या एका ओळीमुळे सिनेमाची उत्सुकता वाढते. नेमकी ती आनंदी घटना कोणती आणि सेलिब्रेशनविषयी तपशिलात लवकरच कळेल कारण ‘एबी आणि सीडी’ येत्या १३ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
या सिनेमात अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांच्या लक्षवेधी भूमिका तर आहेतच पण सिनेमाच्या शिर्षकामध्येही त्यांचे सुंदर कनेक्शन आहे. आणि ते कनेक्शन असे की ‘एबी’ म्हणजे अमिताभ बच्चन आणि ‘सीडी’ म्हणजे चंद्रकांत देशपांडे. दोन कलाकारांची ऑन स्क्रिन मैत्री येत्या १३ मार्चला पाहायला मिळणार आहे. या सिनेमात सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अमिताभजींना बयाच वर्षांनी मराठी सिनेमात पाहण्यासाठी आणि कौटुंबिक पण तितकीच मजेदारगोष्ट अनुभवण्यासाठी ‘एबी आणि सीडी’ तुम्हांला भेटायला येत आहेत १३ मार्चला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.
Subscribe to:
Comments (Atom)
Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025
Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
Whirlpool India wins prestigious Dun & Bradstreet Corporate Awards 2019 Mumbai , 3rd June, 2019 : Whirlpool India bagged the D...
-
PLAYBOY CLUB MUMBAI IN ASSOCIATION WITH SUNBURN FESTIVAL PRESENTS "SUNBURN OFFICIAL AFTER PARTY" WITH MOKSI // GV // SANDY...


