Thursday, February 20, 2020


*महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री श्री. राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून साकारला ‘दाह’ सिनेमा*

माजी सामाजिक न्याय मंत्री श्री. राजकुमार बडोले यांचे कार्य महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. सामाजिक न्याय विभागाने त्यांच्या कार्यकाळात खूप मोठे निर्णय घेतले. लंडनमध्ये परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर व इंदू मील येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचा निर्णय,  किंवा मुलींसाठी ५० नवीन वसतिगृह सुरू करणे, किंवा ओबिसीच्या किमी लेअरची मर्यादा वाढविणे व ओबिसी मुलींना एमपीएससी साठी आरक्षण अशा अनेक निर्णयाबाबत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच त्यांच्यां कार्यकाळात दिव्यांग शाळा संहिता व जेष्ठ नागरिकांचे धोरण देखील आखले गेले.

             

राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती राजकुमार बडोले यांचे पुत्र अनिकेत राजकुमार बडोले यांनी केली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून समाजसेवा, आपल्या शिक्षणाचा, बुध्दिचा वापर गावातील लोकांच्या भल्यासाठी कसा करता येईल हा एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. 

या सिनेमाविषयी आपलं मत व्यक्त करताना त्यांनी म्हटले की, "सामाजिक विषयावर आधारित हा सिनेमा आहे. गावागावांमध्ये अजूनही अशा काही अंधश्रद्धा, रुढी, परंपरा, व्यवस्था आहेत ज्याचा परिणाम समाजावर होत असतो. जसे की उच्च जातीच्या व्यक्तीकडून खालच्या जातीच्या व्यक्तींसोबत होणार भेदभाव, एखादा आजार बरा करण्यासाठी पसरवली जाणारी अंधश्रद्धा, दारूबंदी सारख्या विषयाला होणारा विरोध आदी. या सर्व गोष्टी सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील एकूण व्यवस्था दाखवण्यात आली आहे.


समाजप्रबोधनासाठी सिनेमा हे एक प्रबळ साधन आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विशेष करून अधोरेखित करण्यात आले आहे की 'माणुसकीचा धागा हा रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त घट्ट बांधला जातो'. 

मनोरंजनाच्या दृष्टीने सिनेमातील गाणी पण सुंदर झाली आहेत आणि सिनेमातील प्रत्येकाने खूप छान काम केलं आहे आणि एक चांगला मराठी सिनेमा तयार झाला आहे." 

 सायली संजीव, गिरीश ओक, राधिका विद्यासागर, सुह्रद वार्डेकर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौघुले यांच्या महत्वपूर्ण भूमिका असलेला ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...