Thursday, February 20, 2020



अगदी कॉलेजपासून 'सिनेमाची निर्मिती' हे माझं पॅशन होतं; प्रेक्षकांना आवडेल असा आहे 'बोनस': निर्माते गोविंद उभे

बोनस हा शब्द एक वेगळाच आनंद देऊन जातो. मग तो बोनस पैशांचा असो किंवा सुखाचा. बोनस मिळाला तर खुशी नाही मिळाला तर नाराजी अशी ही मिक्स भावना प्रत्येकाची असते... आता फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांना मराठी सिनेसृष्टीतला बोनस अनुभवयाला मिळणार आहे. म्हणजेच लायन क्राऊन एंटरटेनमेंट आणि जीसिम्स यांची प्रस्तुती असलेला, गोविंद उभे, एन. अनुपमा, कांचन पाटील निर्मित आणि युवा दिग्दर्शक सौरभ भावे दिग्दर्शित 'बोनस' हा मराठी सिनेमा येत्या २८ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात टॉल अँड हँडसम अभिनेता गश्मीर महाजनी आणि सुंदर, प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री पूजा सावंत या कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

या सिनेमाच्या निमित्ताने निर्माते गोविंद उभे यांच्याशी खास बातचीत करण्यात आली. 

निर्माता म्हणून सिनेमाचा विषय निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार खास करुन सर्वप्रथम करता याचे उत्तर देताना गोविंद उभे यांनी म्हटले की, "निर्माता म्हणून जेव्हा सिनेमाची निवड करायची असते तेव्हा सिनेमाची गोष्ट निवडताना किंवा ‘आपण हा सिनेमा करायचाच’ असा होकार देण्यापूर्वी मी खास करुन काही ठराविक गोष्टींचा विचार करतो आणि तो विचार म्हणजे प्रेक्षकांची चॉईज. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जर मी सिनेमाची निर्मिती करतोय तर त्यांचे निखळ मनोरंजन हे झालेच पाहिजे... ‘बोनस’ची कथा जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मी ती ऐकली, समजून घेतली आणि मला ती आवडली देखील. या सिनेमाला होकार देताना हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री मला तेव्हा होती आणि अजूनही आहे. सिनेमाचा विषय चांगला आहे आणि कथेसह एक महत्त्वाचा संदेश यातून प्रेक्षकांना मिळेल."




या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे, तसेच दिग्दर्शन सौरभ भावे आणि छायाचित्रण संजय मेमाणे यांचं आहे... यांच्या विषयी सांगताना त्यांनी म्हटले की, "माझ्या सिनेमाचा दिग्दर्शक सौरभ भावे हा उत्तम कथा आणि पटकथा लेखक आहे, या सिनेमाच्या निमित्ताने लिखाणासह त्याचे दिग्दर्शन कौशल्य देखील आता मराठी सिनेसृष्टीला पाहायला मिळेल. यंग दिग्दर्शक, यंग जोडी, यामुळे सिनेमात नाविन्य आणि एक वेगळी कथा पाहायला मिळेल. गश्मीर आणि पूजा हे दोघेही हुशार, समंजस आणि उत्तम कलाकार आहेत, नव्या जोडीची सुंदर केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल... छायाचित्रणाची जबाबदारी संजय मेमाणे यांनी अगदी उत्तमरित्या सांभाळली, त्यांची कामं मी पहिली आहे, त्यांची प्रत्येक फ्रेम ही अचूक आणि खूप काही व्यक्त करणारी असते . मला सांगायला आनंद होतोय की 'बोनस'मध्ये त्यांचा मोठा हातभार आहे."

सिनेमाची निर्मिती हा गोविंद उभे यांचा आधीपासूनच आवडीचा विषय.  ते कॉलेजमध्ये होते तेव्हा पासून सिनेमाची निर्मिती करायची हे त्यांचं पॅशन होतं. निर्माता बनणं आणि प्रेक्षकांना रुचतील, पटतील असे विषय आणणं ही त्यांची इच्छा कायम असायची आणि आता ती पूर्ण देखील झाली आहे. "आपल्या आवडीच्या क्षेत्रात जर काम केलं तर मनाला समाधान वाटतं. निर्माताच्या जबाबदा-या म्हणाव्या तर सिनेमाचे कथा लेखणाची प्रक्रिया ते सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत निर्मात्याला अनेक जबाबदा-या असतात, जे त्याला अगदी शांतपणे आणि समजंसपणाने सांभाळाव्या लागतात", असे देखील त्यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्राची आवडती संगीतकार जोडी 'रोहन-रोहन' यांनी 'बोनस'ला संगीत दिले आहे आणि नुकतेच त्यांचे रॅप साँगही रिलीझ झाले आहे...  संगीतकार रोहन प्रधान आणि रोहन गोखले या म्युझिकल जोडीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं ते ‘व्हेंटिलेटर’ मधील गाण्यांच्या माध्यमातून... त्यांच्या विषयी बोलताना गोविंद यांनी म्हटले की, "त्यांनी तयार केलेलं गणपतीचं गाणं ‘या रे या’ आणि ‘बाबा’ हे वडीलांवरचं गाणं... ही दोन्ही गाणी मला प्रचंड आवडली आणि ती मनाला भावली देखील. तेव्हाच ठरवलं की या माझ्या सिनेमाला संगीत हीच जोडी देणार. नुकतंच 'बोनस' मधील 'माईक दे' हे रॅप साँग रिलीझ झाले आहे आणि त्याला पसंती देखील मिळाली आहे.... व्हॅलेंनटाईन डे स्पेशल गाणं देखील तयार करण्यात आलं आहे जे लवकरच प्रदर्शित होईल."

सिनेमाची निर्मिती हा गोविंद उभे यांच्या फार जवळचा विषय असल्यामुळे 'बोनस' नंतर ते लवकरच आणखी एक मराठी सिनेमा घेऊन येणार आहेत.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...