गजेंद्र अहिरे... आर्तता प्रतिध्वनीत करणारा दिग्दर्शक
OR
गजेंद्र अहिरेंच्या ५०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५०वा सिनेमा ‘बिडी बाकडा’चे पोस्टर प्रदर्शित
OR
एका स्त्री भोवती, तिच्या बाईपणाभोवती, तिच्या संघर्षांभोवती फिरतो गजेंद्र अहिरेंचा सिनेमा.
OR
गजेंद्र अहिरे त्यांच्या सिनेमातून बाईतलं बाईपण अगदी प्रभावीपणे मांडतात
OR
‘बिडी बाकडा’मुळे गजेंद्र अहिरेंची हाफ सेंच्युरी पूर्ण
एखादी कलाकृती दीर्घकाळ लक्षात राहते. पुन्हा पुन्हा आठवते. मनात रूंजी घालत राहते...असं कधी होतं तर जेव्हा ती कलाकृती आपल्याशी वैयक्तिक पातळीवर जोडली जाते. त्यातला भावनाविष्कार आपल्याला आपला स्वतःचा वाटू लागतो. त्यातला आनंद, त्यातली स्वप्नं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातली वेदना आपल्याला आपली वाटते. एका संवेदनशील मनाला जाणवलेली संवेदना जेव्हा दुस-या संवेदनशील मनापर्यंत पोहचते तेव्हा ती दीर्घकाळ टिकून राहते. अशा अनेक संवेदना आपल्यापर्यंत पोहचवल्या आहेत लेखक, गीतकार आणि कवीमनाचा दिग्दर्शक असलेल्या गजेंद्र अहिरे यांनी.
गजेंद्र अहिरेंच्या प्रत्येक सिनेमात एक नवी गोष्ट असते. आणि ती प्रत्येक गोष्ट फिरत असते एका स्त्री भोवती, तिच्या बाईपणाभोवती, तिच्या संघर्षांभोवती. ‘गुलमोहोर’ मधली विद्या असो किंवा ‘सरीवर सरी’ मधली मनी, ‘मिसेस राऊत’ असो किंवा ‘बयो’. प्रत्येक जण एका तीव्र संघर्षातून जात सामाजिक चौकटी ओलांडत जगते. बाईतलं बाईपण इतक्या प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक असलेलं अत्यंत संवेदनशील मन फार कमी पुरुषांकडे असतं. आणि ते गजेंद्र अहिरेंकडे आहे.
गेल्या रविवारी १६ फेब्रुवारीला स्वतः गजेंद्र अहिरे आणि त्यांची फिल्म दोघांनी ५० वर्षांच्या मैलाचा दगड गाठला आहे. अवघ्या सतरा वर्षांमधे ५० फिल्म्स करणं आणि त्यातली प्रत्येक फिल्म ही अत्यंत संवेदनशील गोष्ट मांडणारी असणं ही आज आपल्या सिनेजगतात अप्रूप वाटण्यासारखी आणि म्हणूनच नोंदवून ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ५० फिल्म्स मधल्या ५० वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला तर लक्षात येतं की गजेंद्र अहिरेंनी केवळ फिल्म्स नाही बनवल्या तर त्यातून एक नवीन स्त्रीसाहित्य निर्माण केलं आहे.
या समोर येणा-या ५० गोष्टींमागे समोर न येणा-या २५० गोष्टीही आहेत. केवळ कथा आणि दिग्दर्शनाशिवाय गीतकार म्हणून, नाटककार म्हणून आणि श्रीमान श्रीमती सारख्या मालिकांसाठी केलेलं लिखाण हे गजेंद्र अहिरेंच्या आजवरच्या कारकिर्दीतील अजून एक वेगळं पण अत्यंत महत्वाचं अंग आहे. जगभरच्या अनेक फिल्म फेस्टीवल्समध्ये असंख्य पारितोषिके गजेंद्र अहिरेंच्या फिल्म्सनी मिळवली आहेत. अत्यंत कमी वेळात दर्जेदार आणि प्रभावी फिल्म बनवण्याची त्यांची जी शैली आहे तिची विशेष दखल स्वीडन मधील एका प्रतिष्ठीत विद्यापिठाने घेतली. मराठी चित्रपट क्षेत्रात ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.
जगण्यासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून जात असतानाही ‘केवळ मनोरंजनासाठी’ सिनेमा बनवण्याचा पर्याय न निवडता आसपास भेटणारी माणसं, स्त्रिया, त्यांचे संघर्ष मांडत अभिव्यक्त होण्याचा पर्याय गजेंद्र अहिरेंनी निवडला. सिनेमा क्षेत्रात अशा पद्धतीने टिकून राहण्यासाठी आवश्यक असतं सातत्य. सातत्याने आपल्याला जे सांगायचं आहे तेच सांगत राहणं. गजेंद्र अहिरे सांगतात की ‘हे सातत्य राखण्यासाठी, टिकून राहण्यासाठी खूप बळ आवश्यक असतं. आणि कायम असमाधानी भावना जाणवत राहण्यातून हे बळ मला मिळत राहतं. एक फिल्म पूर्ण झाली की पुढची फिल्म बनवण्याची, पुन्हा एक नवीन प्रयोग करून पाहण्याची अस्वस्थताच माझ्या निर्मितीमागची प्रेरणा असते.
गजेंद्र अहिरेंची प्रत्येक फिल्म ही त्यांच्या खास शैलीतून उलगडत जाते. नव्याने त्यांचा सिनेमा पाहणा-या प्रत्येक प्रेक्षकाला हा दिग्दर्शक समजून घेण्यासाठी त्याचे अनेक सिनेमे पहावेसे वाटतील. पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतील. तेव्हा त्यातली वेदना, त्या वेदनेतलं सौंदर्य समजू शकेल. एखादा चित्रकार जेव्हा एखादी अमूर्त रचना करतो किंवा एखादा कवी एक कविता रचतो तेव्हा तिचा आस्वाद घेणा-या प्रत्येकापर्यंत ती तशीच पोहचेल किंवा प्रत्येकाला एकसारखीच जाणवेल असं होत नाही. प्रत्येकाची जाणीव ही वेगळी असते. गजेंद्र अहिरेंची फिल्म पाहताना हिच भावना असते. एक अमूर्त चित्र किंवा एक वाहणारी कविता. जी समजली असं वाटतानाच अनोळखीही वाटू लागते आणि पुन्हा आपलीही वाटू लागते. ती कविता अखंड वाहत राहते. वेगवेगळ्या काळांच्या, वेगवेगळ्या जाणिवांच्या चौकटी ओलांडत ती रूप बदलते पण गाभा तोच राहतो.
गजेंद्र अहिरेंच्या ५० फिल्म्समधल्या ५० गोष्टी जरी वेगवेगळ्या माणसांभोवती फिरत असल्या तरी त्यांचा प्रवास समांतरच असतो. आणि तो वेदनेच्या हातात हात गुंफून होत असतो. ती पात्रं वर्षानुवर्षे आपल्या सोबत राहतात. त्यांच्या संघर्षानी वर्षानुवर्ष आपलं काळीज पिळवटत राहतं. कशा ना कशाच्या मागे सतत धावणा-या आपल्या सारख्या सामान्य माणसांच्या जगात जिथे आज संवेदना हरवत चालल्या आहेत. तिथे गजेंद्र अहिरेंचा सिनेमा त्या संवेदना पुन्हा रूजवण्याचं काम करतो आहे. आपल्या चित्रपटसृष्टीत या गुणी, प्रतिभावान दिग्दर्शकाचं असणं ही एक बहूमुल्य गोष्ट आहे.
त्यांच्या ‘द सायलेन्स’ या सिनेमातल्या रघुवीर यादवांनी साकारलेल्या भूमिकेतला बाप आपल्या लेकिने सोसलेल्या वेदनेनी व्याकूळ होऊन टाहो फोडतो. त्याची ती आर्तता प्रतिध्वनीत होत राहते. गजेंद्र अहिरेंच्या प्रत्येक सिनेमानंतर बरोब्बर हिच जाणीव होते. ती वेदना आपल्या आत प्रतिध्वनीत होत राहते... आयुष्यभर.
५०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचा ५०वा सिनेमा ‘बिडी बाकडा’ चे पोस्टर प्रदर्शित केले आहे. आता या सिनेमाविषयी तपशीलात जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना नक्कीच असणार.
This way my associate Wesley Virgin's report launches with this SHOCKING AND CONTROVERSIAL video.
ReplyDeleteAs a matter of fact, Wesley was in the army-and shortly after leaving-he unveiled hidden, "SELF MIND CONTROL" tactics that the CIA and others used to get everything they want.
These are the EXACT same SECRETS lots of famous people (notably those who "became famous out of nowhere") and top business people used to become rich and famous.
You've heard that you use only 10% of your brain.
Really, that's because most of your brainpower is UNTAPPED.
Maybe that conversation has even occurred IN YOUR very own head... as it did in my good friend Wesley Virgin's head about 7 years back, while riding a non-registered, beat-up bucket of a car without a license and with $3.20 in his bank account.
"I'm absolutely frustrated with living paycheck to paycheck! When will I get my big break?"
You took part in those types of thoughts, ain't it so?
Your very own success story is going to be written. You just have to take a leap of faith in YOURSELF.
CLICK HERE To Find Out How To Become A MILLIONAIRE