फेविक्रिएटने काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये केले 10 फूट उंच ‘फेविकोल A+ घोडा’ चे अनावरण
मुंबई, 01-फेब्रुवारी-2019: फेव्हिक्रिएट या शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचार रुजवण्याच्या हेतूने आखलेल्या पिडिलाइटच्या उपक्रमाने ‘फेविकोल A+ घोडा’ – रॅम्पार्ट रो येथील 10 फूट क्राफ्ट हॉर्स इन्स्टॉलेशन – या संवादात्मक कलाकृतीसाठी या वर्षी काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हलशी (केजीएएफ) भागीदारी केली आहे.
‘प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकणे’ हा दृष्टिकोन अंगिकारून लहान मुलांना सर्जनशील विचार करण्यास उत्तेजन देणे, हे फेविक्रीएटचे उद्दिष्ट आहे. या विचारसरणीच्या अनुषंगाने, फेविक्रीएटने अंशतः पूर्ण केलेल्या स्वरूपातील घोड्याचे अनावरण केले आहे. केजीएएफला भेट देणारी मुले फेस्टिव्हलच्या कालावधीदरम्यान ही कलाकृती पूर्ण करणार आहेत.
1 फेब्रुवारी 2020 रोजी अनावरण केली जाणारी ही कलाकृती ज्युट, फोम, लाकूड, कागद, मोती असे क्राफ्टचे विविध प्रकारचे साहित्य वापरून तयार केली आहे – फेविकोल A+ हे फेविकोलचे नवे मल्टि-सरफेस अधेसिव्ह वापरून हे सर्व साहित्य एकत्र चिकटवले आहे. ही कलाकृती 9 फेब्रुवारी 2020 पर्यंत दर्शवली जाणार आहे.
फेविक्रीएट स्लाइम वर्कशॉपचे आयोजनही करत असून, त्यामध्ये लहान मुलांना फेविगमचा वापर करून स्लाइम तयार करता येईल व त्याबरोबर खेळता येईल.
याबरोबरच, पिडिलाइटचा आर्ट ब्रँड फेविक्रिल विनामूलय फेविक्रील एक्रिलिक पोरिंग वर्कशॉपचे आयोजन करणार आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांना 9 फेब्रुवारी रोजी कला प्रकाराची विविध तंत्रे शिकवली जाणार आहेत. याबरोबरच, यामध्ये फेविक्रिल आर्ट डिस्प्ले एरिया असणार आहे. या क्षेत्रामध्ये फेविक्रिलच्या मदतीने निरनिराळ्या कला कल्पना दर्शवल्या जातील.
पिडिलाइट इंडस्ट्रीज लि.चे कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी 'kkaruq भांजा यांनी सांगितले, “थोड्याश्या विश्रातीनंतर काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हलशी पुन्हा सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्यांना फेस्टिव्हलमध्ये सर्जनशील पद्धतीने वेळ घालवता यावा, या आमच्या शुभेच्छा. पिडिलाइटमध्ये, आम्ही आर्ट व क्राफ्ट याद्वारे शिक्षण घेण्याला सातत्याने उत्तेजन देतो. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता विकसित करण्यासाठी हे आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळेल आणि त्याच वेळी, त्यांच्यातील क्षमता पूर्णपणे ओळखण्यासाठी त्यांच्या आत्मविश्वासालाही प्रोत्साहन दिले जाईल. या वर्षी आम्ही केजीएएफमधील विविध उपक्रमांद्वारे आर्ट व क्राफ्ट सोल्यूशनमधील आमची निरनिराळी उत्पादने दर्शवणार आहोत.”
काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हलच्या (केजीएएफ) फेस्टिव्हल कोऑर्डिनेटर निकोले मोडी यांनी सांगितले, “सर्जनशील व्यक्तींना एकत्र येण्यासाठी आणि कल्पना मांडण्यासाठी केजीएएफ एक आदर्श व्यासपीठ उपलब्ध करते. लहान मुलांना सर्जनशील विचार करण्यास उत्तेजन देण्याचा फेविक्रीएटचा उपक्रम फेस्टिव्हलच्या संपूर्ण उद्दिष्टाला अनुसरून आहे. व्हिजिटरना घोड्यासारखी कलाकृती पूर्ण करताना धमाल येणार आहे."
पिडिलाइटविषयी:
पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील आघाडीची अधेसिव्ह व सीलंट, कन्स्ट्रक्शन केमिकल्स, क्राफ्ट्समन उत्पादने, डीआयवाय (डू-इट-युवरसेल्फ) उत्पादने व पॉलिमर इमल्शन्स उत्पादक कंपनी आहे. आमच्या उत्पादनांमध्ये पेंट केमिकल्स, ऑटोमोटिव्ह केमिकल्स, आर्ट मटेरिअल्स व स्टेशनरी, फॅब्रिक केअर, मेंटेनन्स केमिकल्स, इंडस्ट्रीअल अधेसिव्ह, इंडस्ट्रीअल रेझिन्स आणि ऑरगॅनिक पिग्मेंट्स व प्रिपरेशन्स यांचा समावेश आहे. बहुतेकशी उत्पादने इन-हाउस संशोधन व विकास याद्वारे तयार केली आहेत. फेव्हिकोल हा आमचा ब्रँड भारतातील लाखो जणांसाठी अधेसिव्हसाठी समानार्थी शब्द बनला आहे. आमचे काही प्रमुख ब्रँड आहेत – एम-सील, फेव्हिक्विक, फेव्हिस्टिक, रॉफ, डॉ. फिक्सिट, फेव्हिक्रिल.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST