इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर भाग्यश्री टिकलेचा जबरदस्त कमबॅक
पाहा, 'इंडियन आयडल मराठी', सोम.-बुध., रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.
सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. 'इंडियन आयडल मराठी ' हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. अजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतो आहे. या आठवड्यात स्पर्धकांची खरी परीक्षा होती. कारण स्पर्धकांना गायचं होतं परीक्षकांच्या आवडीचं गाणं! हे आव्हान सगळ्या स्पर्धकांनी अगदी चोख उचललं. भाग्यश्री टिकले हिला परीक्षकांनी 'जिवलगा' हे अतिशय अवघड गाणी दिलं होत आणि या गाण्याला तिनी पुरेपूर न्याय देऊन 'झिंगाट परफॉर्मन्स' मिळवलं आहे.
भाग्यश्री आता हा मिळालेला सूर असाच जपणार का हे बघण्यासाठी पाहा, फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'इंडियन आयडल मराठी', सोम.-बुध.,रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.