Thursday, July 21, 2022

          अभंगवारी'त रंगणार शास्त्रीय गाण्यांची मैफल 


२०१८- २०१९ मध्ये मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा 'अभंगवारी'ची संगीत मैफल रंगणार आहे. २३ जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राहुल देशपांडे आपल्या सुरेल गायकीने अवघे सभागृह मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी जमेनीस करणार असून  संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहून या 'अभंगवारी'ची शोभा वाढवणार आहेत.



   नुकतीच भक्तीमय वातावरणात सर्वत्र आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. हेच भक्तिमय वातावरण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे खास या शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अभंग, भक्तिगीते यांचा संगीत नजराणा श्रोत्यांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बुकमायशोवर तिकीटे उपलब्ध आहेत.


     "अनन्या: एका धाडसी मुलीची गोष्ट"


जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अशक्यला शक्य करण्यासाठी मनात जिद्द आणि आत्मविशावस हवा . अशाच एक मुलीची गोष्ट आहे टी म्हणजेच अनन्या . अनन्या एक सामान्य मुलगी आहे . तिने लाहानपणसुनं एकच स्वप्न बगीतळ ते म्हणजे ca बनायच . खूप सुंदर आणि आर आयुष टी जगत होती सर्वसमयांसारखी पण एका आपघहाताने तिचे संपूर्ण आयुषच बदलून गेले संपूर्ण चित्रच बदलून गेले 

त्या अपघातात तिचे हात गमावले. तीच CA बनण्याच स्वप्न सुद्धा तिच्यापासून दूर गेलं. तरीपण तिने ह्यावर मत देऊन खरं स्वतच्या पायावर कस उभ राहतात ते दाखवल.  जन्मता अपांगत्व आणि अपघाती अपांगत्व खूपच वेगळ्या गोष्टी आहेत. जनमत अपांगत्व ची सवय होऊन जाते पण अपघाती अपांगत्व खूप काही शिकून जात. आपलं कुटुंब आपल्याळ कश्या पद्धतीने साथ देतो.

 

त्यांच्या बरोबर आपली नाती काशी बदलतात हे या चित्रपटात खूपच सुंदर पणे चित्रित केल आहे. ही भूमिका जितकी सोपी दिसत होती तितकी नव्हती. एखाद्याच अपंगत्व सादर करण ह्यासाठी खूपच धाडस लागत. त्यासाठी त्यागोष्टी जगाव्या लागतात. अनन्या चित्रपटाच चित्रीकरण ज्या पद्धतीने केलं गेल आहे टी सोपी गोष्ट नही आहे. ह्या चित्रीपटतील छोटया-छोटया गोष्टीतून आपल्याला खूपच काही शिकायला मिळेल. खूपच संदर चित्रपट आहे. एक भावनिक चित्रपट जो नक्कीच तुम्हांन आपल्याकधे जे आहे त्याची किंमत दाखवेल. कारण या चित्रपटात अनन्या नावची मुलगी एका अपघातात तिचे हात गमावून बसते . ज्या गोष्टीची आपल्याला किंमत नसते त्या गोष्टीची किंमत नक्कीच हा चित्रपट बघीतल्यावर कळेल. त्याच बरोबर संपूर्ण टीमने खूप संदर काम केले आहे. 

खर अपांगत्व काय असत ते या चित्रपटातून दिगदशर्क प्रताप फंड यांनी जगासमोर आणल आहे त्याबरोबेर अभिनेत्री हृता दुर्गवळे हिने खूपच चयन अभिनय करून चित्रपटश्रूषती आपले पदार्पण केले आहे.

Tuesday, July 19, 2022

Karam Batth in association with Slay Records presents the new song 'Tera Nakhra' of the New Punjabi movie 'Padma Shri Kaur Singh' sung by Nachattar Gill and Gurlej Akhtar. Features Karam Batth and Prabh Grewal.


Monday, July 18, 2022

 

                          Porsche India
records its best ever half year sales result




Porsche India recorded a 118 per cent sales growth for the first half of 2022 compared to last year with 378 new car deliveries. Overcoming continual challenges that impact the automotive industry worldwide, Porsche India delivered more cars between January to June this year than the individual full year figures from 2018, 2019 and 2020.

The arrival of Porsche’s all-electric Taycan and a strong desire for SUVs carried the momentum through the first half of the year with 167 Cayenne and 125 Macan accounting for 77 per cent of all sales, followed by the Taycan with 37 units. Porsche’s iconic 911 Coupé recorded 27 units and the family-sized limousine Panamera accounted for 19 sales.

Manolito Vujicic, Brand Director, Porsche India said the figures are an encouraging sign that the industry is recovering with demand for high-end sports cars returning to pre-pandemic levels: “July marks 10 years of Porsche India serving this region and there’s no better way to acknowledge this than with our best ever half year sales performance for the first half of 2022.

“With the continued push towards electrification, we are heartened to see strong demand for the Taycan from day one, making it our third best-seller so far this year. Our customers and stakeholders have been outstanding and continue to be the backbone that lets Porsche India thrive. We strongly believe that success breeds success and building on our 2021 performance which was our best full year since 2014 and our strong 2022 first half, we are delighted to welcome two new retail partners to the Porsche India network which will be announced in the coming months.” Earlier this year, KUN Premium Cars Pvt. Ltd has been appointed as the dealer partner in Chennai and VST Supercars Pvt. Ltd. as the dealer partner in Bengaluru.
Porsche India
Porsche India records 118 percent increase in new car deliveries in the first half over the same period in 2021
Deliveries of the all-electric Taycan began in the first half of the year
Porsche's SUV models Cayenne and Macan continue their success and remain the most sold models with 77 percent contribution
Manolito Vujicic, Brand Director, is delighted to announce the best ever half year sales result for Porsche India
 

     

      वातावरणातला गारवा वाढवणारं ‘टाईमपास ३’ चं कोल्ड ड्रिंक सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला     

             

झी स्टुडिओजच्या टाइमपास ३ या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांचा सध्या समाजमाध्यमांवर एकच बोलबाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने केवळ तरुणाईचं नाही तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शिवाय साई तुझं लेकरू आणि लव्हेबल या गाण्यांनाही प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे. यामुळे टाइमपास ३ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढविण्यासाठी आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ‘कोल्ड ड्रिंक वाटतेस’ हे नवीन गाणं प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे यांच्यावर चित्रित झालेलं हे धम्माल गाणं गायलं आहे अमितराज आणि हिंदीमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या शाल्मली खोलगडे यांनी. याचं संगीत अमितराज यांचं असून गाण्याचे शब्द क्षितीज पटवर्धनचे आहेत.

टाइमपास चित्रपटाच्या यापूर्वीच्या दोन्ही भागाच्या यशामध्ये त्यांच्या संगीताचा महत्त्वाचा वाटा होता. दोन्ही भागातील गाणी रसिकांमध्ये आजही लोकप्रिय आहेत. हीच परंपरा टाइमपास ३ नेही कायम ठेवली आहे. साई तुझं लेकरू या गाण्याने सोशल मीडियावर एकच कल्ला केला आहे. यात आता कोल्ड सॉंग नव्याने धुमाकूळ घालणार आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे याचे भन्नाट शब्द आणि चाल आणि त्याला न्याय देणारं तेवढंच धम्माल नृत्य दिग्दर्शन. राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी रचलेल्या कोरिओग्राफीवर प्रथमेश आणि हृता यांनी भन्नाट डान्स केला आहे. याशिवाय या गाण्यासाठी संतोष फुटाणे यांनी अतिशय सुरेख असं कला दिग्दर्शन केलं आहे. 

सध्या पावसामुळे सगळीकडे गार गार वातावरण झालंच आहे. हा गारवा अधिक वाढवण्याचं काम हे कोल्ड ड्रिंक सॉंग करणार आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या टाइमपास ३ चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. येत्या २९ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 चाहत्याकडून हृताला 'ही' अनोखी भेट


रंगभूमी, मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. 'अनन्या' चित्रपटाच्या माध्यमातून हृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर हृताने अल्पावधीतच आपला फॅन फॉलोअर्स वाढवला. हृताचे असंख्य चाहते असून तिची एक झलक पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. बरेच चाहते तिच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही संवाद साधतात आणि हृताही आपल्या चाहत्यांना अगदी आनंदाने प्रतिसाद देते. हृताच्या अशाच एका चाहत्याने तिला एक अनोखी भेट दिली आहे. या चाहत्याने हृताला 'अनन्या' नावाची एक सुंदर अंगठी भेट देऊन तिला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

  

  हृताला मिळालेल्या या सुंदर भेटीबद्दल हृता  म्हणते, "चाहत्यांचे असे प्रेम बघून खरेच खूप भारावून जायला होते. आपल्यावर, आपल्या कामावर कोणी इतके प्रेम करते, ही भावनाच खूप आनंद देणारी आहे आणि याच प्रेमामुळे आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची ऊर्जा मिळते. 'अनन्या'मधून मी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. चित्रपट तर माझ्यासोबत आयुष्यभर असणारच आहे. मात्र 'अनन्या'ची ही अंगठीही माझ्यासोबत कायम असेल.'' 

   येत्या २२ जुलै 'अनन्या' प्रदर्शित होणार असून एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे, तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया या चित्रपटाचे निर्माता आहेत.

                          गायिका 'योगिता बोराटे' यांचे 'तारणहार' हे भक्तीमय गीत प्रदर्शित



प्रसिद्ध गायिका 'योगिता बोराटे' यांची संगीत क्षेत्रात आघाडीची गायिका म्हणून ओळख आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांनी संगीत कला जोपासली आहे. त्यांची स्वामी समर्थ यांच्यावरची अपार भक्ती पाहता, त्यांनी नुकतचं 'तारणहार' हे भक्तीमय गीत प्रदर्शित केलं आहे. तसेच योगिता बोराटे यांनी हे गीत गायलं असून 'शंतनू हेरलेकर' यांनी या गाण्याचे संगीत व‌ संगीत संयोज केले आहे. तर 'दिपाली आसोलकर' हीने हे गीत शब्दबद्ध केले आहे. या गीतामध्ये 'तबला' वादन 'प्रसाद पाध्ये' यांनी केले असून 'बासरी' 'अवधूत फडके' यांनी वाजवली आहे. या गीताचे चित्रीकरण 'समीर बोराटे' यांनी केले आहे.


गायिका 'योगिता बोराटे' या गेली २५ वर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्या 'स्वरमेघा क्रिएशन्सच्या' संस्थापिका आहेत. त्यांची 'स्वरमेघा म्युझिक' अकॅडमी देखिल आहे. 'स्वरमेघा क्रिएशन्सच्या' अंतर्गत त्यांनी याआधी ६ संगीत कार्यक्रम केलेले आहेत. याआधी त्यांची 'दिल लगी ये तेरी' आणि 'हम हात जोडे दोनो' ही ओरिजनल हिंदी गाणी प्रसिद्ध आहेत. तर 'घोर अंधारी रे' हे गुजराती गाणं देखिल सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. भारतातच नव्हे तर भारताबाहेर त्यांनी अनेक संगीत कार्यक्रम केले आहेत. युगांडा तसेच लंडनमध्ये त्यांनी २ ते ३ महिने संगीत कार्यक्रम केलेले आहेत.  


गायिका योगिता बोराटे 'तारणहार' या गीताविषयी म्हणतात, ''मला लहानपणापासूनच अध्यात्मिक भक्ती गीतांची आवड आहे. शालेय शिक्षणासोबतच मी संगीताचे शिक्षण घेतले. स्वामी समर्थांना मी माझे गुरू मानते. यंदाच्या गुरूपौर्णिमेच्या निमीत्ताने मी 'तारणहार' हे गाणं प्रदर्शित करायचं ठरवलं. त्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. परंतु ते म्हणतात ना योग्य वेळी त्या गोष्टी ठरलेल्या असतात. आणि हे गीत प्रदर्शित झालं.''

पुढे योगिता, या गीताच्या रेकॉर्डींग दरम्यानचा किस्सा सांगतात, ''मी जेव्हा हार्मोनी स्टुडिओ येथे हे गीत  रेकॉर्ड करत होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं मागेच स्वामींची मूर्ती आहे. त्यानंतर अवघ्या 'वन टेक' मध्येच मी हे गीत गायले. 'तारणहार' गीताच्या रेकॉर्डींगचा अविस्मरणीय अनुभव कायम माझ्या स्मरणात राहील. या गाण्यात ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली. त्या सर्वांचे मी ऋणी आहे."

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...