Friday, August 12, 2022

 अखेर तुफान व्यक्तिमत्वावर आधारित तुफान चित्रपटाचा दणकेदार ट्रेलर प्रदर्शित.

मुंबईतील गॅंगवॉरमधील सर्वात मोठे नाव म्हणजे 'अरुण गुलाब गवळी' उर्फ 'डॅडी'. त्यांच्या 'दगडी चाळी'वर आधारित 'दगडी चाळ' हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याप्रमाणे डॅडींनी अवघ्या मुंबईवर राज्य केले तसेच या चित्रपटानेही अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केले. आता पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्रावर राज्य करायला 'दगडी चाळ २' सज्ज झाला असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरचे अनावरण ‘रिअल डॅडीं’च्या हस्ते दगड चाळीत झाले असून ट्रेलर पाहून चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित 'दगडी चाळ २' या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले असून रत्नकांत जगताप कार्यकारी निर्माता आहेत. येत्या १९ अॅागस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

'दगडी चाळ २'मध्ये आपल्याला सूर्या आणि डॅडी यांच्यातील एक वेगळे नाते पाहायला मिळणार आहे. एकेकाळी डॅडींचा उजवा हात असणारा सूर्या आता त्याच्या कुटुंबासोबत गॅंगवॉरच्या विळख्यातून बाहेर पडून एक साधं सोप्पं आयुष्य जगताना दिसत आहे. मात्र डॅडी आणि सूर्या यांच्यात असे काही घडले आहे, ज्याने सूर्या डॅडींचा तिरस्कार करू लागला आहे. आता त्यांच्यात नेमके काय घडले आहे, त्यांच्या नात्यात कडवटपणा का आला आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 

दिग्दर्शक चंद्रकांत कणसे चित्रपटाबद्दल म्हणतात की, "मकरंद देशपांडे यांनी साकारलेली डॅडींची भूमिका खूपच वजनदार असून 'दगडी चाळ २' हा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर वेगळीच छाप पाडेल, अशी खात्री आहे. या वेळी या चित्रपटात गॅंगवॅारसोबत राजकारणही पाहायला मिळणार आहे. चित्रपटाबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, ‘’ प्रेक्षकांनी ‘दगडी चाळ’ला भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही याचा सिक्वेल काढण्याचा निर्णय घेतला. जसे प्रेम आमच्या प्रेक्षकांनी ‘दगडी चाळ’ला दिले तसेच प्रेम आमचे हक्काचे प्रेक्षक ‘दगडी चाळ २’लाही देतील, अशी मला अपेक्षा आहे. लवकरच ‘दगडी चाळ २’ आपल्या भेटीला येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी तुमच्या जवळच्या चित्रपगृहात येतोय.

Link - https://bit.ly/DaagdiChaawl2Trailer

 समायरा'तील 'सुंदर ते ध्यान' गाण्याला आधुनिकतेचा साज

  वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा. याचा अनुभवच अतिशय अनोखा असतो. असाच एक  सुंदर अनुभव देणारे निहार शेंबेकर संगीत दिग्दर्शित 'समायरा' चित्रपटातील 'सुंदर ते ध्यान' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सुंदर गाण्याला आधुनिकतेचा साज चढवण्यात आला आहे. संत तुकाराम यांचे शब्द लाभलेल्या या गाण्याला जुईली जोगळेकर हिचा मंत्रमुग्ध करणारा आवाज लाभला आहे.  स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेली 'समायरा' आणि तिच्या त्या प्रवासात तिला झालेला बोध या गाण्यातून उलगडत आहे. ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा’ चित्रपट येत्या २६ ऑगस्टपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 चित्रपटाचे दिग्दर्शक  ऋषी श्रीकृष्ण देशपांडे गाण्याविषयी म्हणतात, '' प्रत्येक वारकऱ्याची आपली एक कहाणी असते. तशीच समायराची सुद्धा आहे. समायराची ही अनन्यसाधारण कथा, व्यथा आणि त्यातून तिला झालेली विठूची प्रचिती म्हणजे हे गाणे. विठ्ठल सर्वांची माउली. सर्वांचा तारणहार आहे आणि याची प्रचिती समायरालाही येत आहे. तिचा आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन, अनेक प्रश्नांनी व्याकुळ झालेले तिचे अस्थिर मन विठूचरणी येऊन असे  शांत झाले आहे, हे आपल्याला या गाण्यातून दिसते. या गाण्याला जुईली यांनी खूप सुंदर सादर केले आहे. कीर्तनाला दिलेले हे नवीन रूप श्रोत्यांना नक्कीच भावणारे आहे.''

    ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, आद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, 'समायरा'ची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली असून या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत

                'कोण होणार करोडपती'- विशेष भागशनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

लोककलावंतांसाठी अजय-अतुल  खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ!

'कोण होणार करोडपतीहा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतोया कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमुळेत्यांच्या संघर्ष कहाण्यांमुळे कायमच इतरांना प्रेरणा मिळतेतर दर शनिवारी रंगणाऱ्या विशेष भागांमुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार होतोया शनिवारच्या विशेष भागात अवघ्या देशाला आपल्या गाण्यांनी ठेका धरायला लावणारे संगीतकार अजय - अतुल या कार्यक्रमात सहभागी होणार आहेतया शनिवारी 'कोण होणार करोडपती'च्या या पर्वाचा शेवटचा भाग असून अजयअतुल यांच्या उपस्थितीत या पर्वाची सांगता होणार आहेजेजुरी येथील  शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ स्मृती मंच या लोकवंतांसाठी कार्यरत असणार्या संस्थेसाठी अजय-अतुल हा खेळ खेळणार आहेत.

'कोण होणार करोडपती'च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी झालेसमाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येतेया पर्वात आत्तापर्यंत प्रसिद्ध अभिनेत्री काजोलतनुजाज्येष्ठ समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्तीसदाबहार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफसंदीप वासलेकरअधिक कदमडॉतात्याराव लहानेद्वारकानाथ संझगिरी  या भागांमध्ये सहभागी झाले होतेज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष रंगलाआता या पर्वाची सांगता अजय-अतुल या लोकप्रिय जोडगोळीने होणार आहे. 'कोण होणार करोडपतीया कार्यक्रमाची म्युझिकल थीम आणि अजय अतुल यांचं विशेष नातं आहे त्याबद्दल त्यांनी या भागात त्या आठवणींना उजाळा दिला.  'शाहीर साबळेशाहीर विठ्ठल उमपअण्णाभाऊ साठेप्रल्हाद शिंदे या सगळ्या लोककलावंतांनी  मराठी साहित्य आणि संस्कृतीचे जतन करून अमूल्य वारसा आपल्याला उपलब्ध करून दिलाआमच्यावरही गाण्याचे संस्कार या लोकलावंतांनी केले आहेत', असे मनोगत अजय अतुल यांनी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर व्यक्त केलेत्याचबरोबर संगीत ही शिकत राहण्याची गोष्ट आहेत्यामुळे शिकत राहाअसा सल्ला त्यांनी तरुण कलाकरांना यावेळी दिला.


'कोण होणार करोडपती'चे हे पर्व खऱ्या अर्थाने अद्भुत ठरलेविविध वयोगटातील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पर्धक या पर्वात सहभागी झाले होतेअनेकांचा संघर्ष पाहून डोळ्यात पाणी दाटून आले तर अनेकांचे अनुभव ऐकून निःशब्द व्हायला झालेकाही स्पर्धकांची पहिली कमाई या मंचाने मिळवून दिली तर अनेकांनी आपल्या कामातून इतरांना प्रेरणा दिलीअशा या गाजलेल्या पर्वाची भैरवी अजयअतुल या प्रसिद्ध संगीतकार जोडीसह होणार आहेयावेळी अजयअतुल यांनी मनमोकळेपणाने वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्याघरी संगीतकार व्हायचंय असं म्हणल्यानंतर आलेली प्रतिक्रिया काय होतीगणपती बाप्पावरची श्रद्धापुण्यातील गणेशोत्सवातील आठवणीमुंबई शहराबद्दल ऋण अशा अनेक विषयांवर अजय अतुल व्यक्त झाले आहेतत्यामुळे हा शेवटचा भाग प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.

 

पाहा, 'कोण होणार करोडपती'- विशेष भागशनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


Wednesday, August 10, 2022

 सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कलाकार यंदा धडाक्यात आणि अधिक उत्साहाने साजरा करणार रक्षाबंधन! 

भावंडे म्हणजे मस्ती, खोड्या, चेष्टा-मस्करी आणि अगदी मारामारीसुद्धा! पण ती लोहचुंबकासारखी असतात, त्यामुळे एकमेकांपासून दूर राहूच शकत नाहीत. भाऊ आणि बहीण यांच्यातील हे सुंदर नाते साजरे करण्याचा सण म्हणजेरक्षाबंधन. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कलाकार आपल्या भावंडांच्या गोड आठवणी आणि यावर्षी राखीपौर्णिमेचा सण साजरा करण्याचे आपले प्लॅन्स उत्साहाने सांगत आहेत.

 

बडे अच्छे लगते हैं 2 मालिकेत नंदिनी कपूरची भूमिका करणारी शुभावी चोक्सी म्हणते, “राखी पौर्णिमा हा असा सण असतो, जेव्हा सगळे कुटुंबीय एकत्र होऊन आनंदाने हा सण साजरा करतात. माझा धाकटा भाऊ शुभेन्द्र आणि त्याचा खास मित्र आनंद (जो माझ्या दुसर्‍या एका आईचा मुलगा आहे) माझ्या घरी जेवायला येतात. मी त्यांना राखी बांधते. लहान असताना माझे शुभेन्द्रशी खूप भांडण व्हायचे. पण, तो इतका गोड आहे की, तो नुसता हसायचा. मी नेहमी त्याच्या ताटातून जेवायचे, त्याच्या ताटातली मिठाई उडवायचे. आता मागे वळून बघते तेव्हा माझ्या या खोडीचे मलाच हसू येते. खरं सांगायचं तरजसजशी वर्षं उलटली, तसा या उत्सवाचा आनंद तसाच राहिला पण आमच्यातील भाऊ-बहिणीचे नाते मात्र आणखी दृढ होत गेले. आमच्या कामाच्या व्यापामुळे मी भावाला वरचे वर भेटू शकत नाही, पण माझ्या मनात ही खात्री असते की मला एखादा सल्ला हवा असेल, किंवा आधार हवा असेल, तर तो नेहमी माझ्या सोबत असेल. तो माझा फक्त भाऊ नाही, तर प्रसंगी वडिलांसारखा आधारस्तंभ देखील बनतो. आम्ही आपापल्या जीवनात कितीही गुंतलेले असलो, तरी या मंगल दिवशी आम्ही आवर्जून भेटतो.”

अपनापन... बदलते रिश्तों का बंधन’ मालिकेत पल्लवीची भूमिका करणारी राजश्री ठाकूर म्हणते, “दर वर्षी मी माझ्या परिवारासह रक्षाबंधन सण साजरा करते. आमचे संयुक्त कुटुंब आहे. मला दोन भाऊ आहेत, त्यापैकी एक सख्खा आणि एक चुलत भाऊ आहे. माझ्या लहानपणापासून हा सण आमच्याकडे खूप थाटात साजरा होत आहे. सगळे जण माझ्या मोठ्या भावाच्या घरी जमतात. त्या दिवशी नारळी पौर्णिमा देखील असल्याने आमच्याकडे नित्यनेमाने नारळी भाताचा भेत असतो. दर वर्षी मी स्वतः नारळ आणि भाताचा हा गोड पदार्थ स्वतः रांधते. हा एक मस्त कार्यक्रम असतो आणि आम्ही तो थाटामाटात साजरा करतो. यावर्षीही त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत आहे.”

 

अपनापन... बदलते रिश्तों का बंधन मालिकेत बरखाची भूमिका करणारी श्रद्धा त्रिपाठी म्हणते, “रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या गोड नात्याचा सण. त्यांच्यात जिवाभावाचे मैत्र असते, ते एकमेकांच्या पापाचे वाटेकरी असतात आणि एकमेकांची गुपितेही ते जपतात. भाऊ-बहिणीच्या नात्यातील मैत्री म्हणजे जणू त्या दोघांच्या हृदयाला जोडणारे सप्तरंगी इंद्रधनुष्यच! भावना, प्रेम, काळजी, आदर, आनंद, गुपिते आणि मस्तीचे हे सात रंग! माझे आणि माझ्या भावाचे नातेही असेच आहे. आमच्यात भांडणं तर होतातच पण दोन-तीन दिवसात ती मिटतात देखील. रक्षाबंधन सणाचा आनंद मात्र आम्ही भरपूर लुटतो. भाऊ असल्याची वेगळीच मजा असते, असे मला वाटते. तुम्हाला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला भावाच्या नजरेतून बघायला आणि अनुभवायला मिळतात. सगळे भाऊ आपल्या बहिणीच्या सुरक्षेविषयी फार जागरूक असतात. माझा भाऊ परदेशी राहात असल्याने आम्हाला एकमेकांची सोबत फारशी मिळत नाही. आता पडद्यावर मला एक नवे कुटुंब मिळाले असल्याने माझा सख्खा भाऊ न भेटल्याची खंत थोडी कमी होते. पडद्यावरचा माझा भाऊ, विशेषतः अनमोल हा अगदी माझ्या भावासारखा आहे. आम्ही भांडतो, हसतो आणि एकमेकांच्या खोड्या काढतो. गौतम आणि अनमोलच्या रूपाने मला दोन नवीन भाऊच भेटले आहेत!”


सुपरस्टार सिंगर 2 चा स्पर्धक आणि छोटा शेफ प्रत्युष आनंद म्हणतो, “सायली दीदीसारखी कॅप्टन मला दिल्याबद्दल मी या शोचा ऋणी आहे. या मंचावर मी पाऊल टाकले तेव्हापासून सायली दीदी माझ्यासोबत आहे आणि माझी काळजी घेत आहे. ती नेहमी मला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देत असते. मी तिचा खरोखर ऋणी आहे. आम्ही कधी कधी एकत्र जेवतो, गाणी ऐकतो, रियाज करतो आणि एकत्र वेळ घालवतो. ती माझे प्रेरणास्थान आहे आणि मी तिच्याकडून बरेच काही शिकलो आहे. मी तिला इतकेच सांगू इच्छितो की, तिने आजवर माझी काळजी घेतली आहे, तसाच मीही भविष्यात नेहमीच माझ्या सायली दीदीची काळजी घेईन. राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”

 BTS shots of ‘Teri Galiyon Se’ will take you inside the musical world of this romantic song

Since its poster release, the much-anticipated song "Teri Galiyon Se" has been generating buzz on social media. The makers decided to reveal BTS shots from the music video for their beloved audience.

Actress Arushi Nishank, is also a film producer, Kathak performer, and social worker. Arushi soon will be seen in her upcoming project Film Tarini with tseries and web series with Hotstar.

The BTS Pictures demonstrates the work that goes into producing something so stunning. This incredible BTS experience captures all of the challenges, triumphs, giggles, joy, and most importantly, the confidence that go into the song. It was filmed in Arushi's native Uttarakhand, which had pleasant weather and lovely scenery.

Speaking about the song Arushi Nishank says, “The title of my upcoming track is ‘Teri Galliyon se’ . It's love yet a patriotic song releasing on 11th August and has been shot in the beautiful valley of Uttarakhand, Dehradun and Mussorie. It’s a lovely track that will enlighten a josh in youth too, talking about my co-actor Gurmeet Chowdhary, it was great fun while working with him, he is supportive and also a good friend. After the great success of Wafa na raas aaye which was sung by melodious singer Jubin Nautiyal, it’s really nice that this song is crooned by nonother Jubin nautiyal, fingers crossed as almost we teamed up again let’s see how much love we will be gathered from the audience.”


The music video is produced by Gulshan Kumar and T-series. The voice of the music video is given by Jubin Nautiyal and music is by Meet Bros. ‘Teri Galiyon Se’ music video is slated to be released on 11th August 2022.

 Shannon K pays tribute to her father Kumar Sanu with musical rendition of his cult classic “Pehla Pehla Pyar”

Shannon K in her mesmerizing voice brings back the memories of the golden years of 2014 with the recreation of Kumar Sanu's "Pehla Pehla Pyar". She revisits the track giving it a fresh, modern aesthetic and feel.

"It is to this day Pehla Pehla Pyar's charm and melody mesmerizes us,  it teleport us to a different time and era, kicking in nostalgia and a flood of emotions. It has and it will always be a classic, no one can match up to the emotion & melody of that song" says Shannon K. It also happens to be her first hindi track where she sang maximum in hindi
 "I was scared to recreate the song but I spoke to my father and he encouraged me to go for it. Infact, he gave me the freedom to make the song my way. He was happy that, the younger generation will get a new version of the same song which will suit their taste" adds Shannon K

Singer - Shannon K , Music - Prem & Hardeep, Lyrics- Praveen Bharadwaj & Josh Sahunta, Cover Version Recorded @ Rusk Recording Studio, Hollywood, Actor - Shannon K , Director - Annabelle , DOP - Charles Guinto, Assistant DOP- Pavel Poboruev , Editor - PackHunter Media.

Tuesday, August 9, 2022

 'गुंजन' आणि 'मधुमालती'

             या शब्द स्वरमालेचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

मीडिया वर्क्स स्टुडिओ, पुणे प्रस्तुत आणि श्री. व्यंकट मुळजकर निर्मित “गुंजन” आणि “मधुमालती” या प्रासादिक, भावगंधित शब्द स्वरमालेचा लोकार्पण सोहळा पुण्यात संपन्न झाला. या कार्यक्रमाला रसिकप्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच हे दोन्ही अल्बम म्युझिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ नेते माननीय उल्हास दादा पवार हे होते. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांनी शब्द स्वरमालेचे रसग्रहण केले. या कार्यक्रमात दोन्ही ध्वनिमुद्रिकेच्या गीतकार सुवर्णा मुळजकर व संगीतकार आनंदी विकास यांची विशेष उपस्थिती होती.

'गुंजन' आणि 'मधुमालती' या दोन्ही ध्वनिमुद्रिकेचे संगीत हे आनंदी विकास यांचे असून यामध्ये पं. शौनक अभिषेकी, अंकिता जोशी, मंगेश बोरगावकर, शरयू दाते, स्वराली जोशी, सौरभ दप्तरदार, मयुरी अत्रे आणि विश्वास अंबेकर यांनी रचना गायल्या आहेत. या दोन्ही अल्बमचे निर्माते श्री व्यंकट मुळजकर आहेत.

निर्माते व्यंकटेश मुळजकर या कार्यक्रमाविषयी सांगतात,"'गुंजन' हा भक्तीगीताच्या संदर्भातील तर 'मधुमालती' हा भावगीता संदर्भातील गीतसंग्रह रसिकप्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. अतिशय खेळीमेळीचा व ऋद्यस्पर्शी असा हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक दिग्गज कलाकारांनी लावलेली उपस्थिती. मला या कार्यक्रमाची निर्मिती करून प्रचंड आनंद झाला. मीडियावर्क्स स्टुडिओचे आदित्य देशमुख, मंगेश बोरगावकर आणि डॉ.सुजित शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुरेख केले. सर्वांनी कविता आणि संगीत यांची जोड झाल्यानंतर ते पुढे किती प्रभावी होतं, तसेच सध्याच्या काळामध्ये मराठी संगीताला, मराठी साहित्याला या कार्यक्रमांची किती गरज आहे. याचं प्रतिपादन यातून केले. या अल्बममधील गाणी सर्व प्रेक्षकांना आवडतील याची मला खात्री आहे."

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...