Friday, August 12, 2022

 अखेर तुफान व्यक्तिमत्वावर आधारित तुफान चित्रपटाचा दणकेदार ट्रेलर प्रदर्शित.

मुंबईतील गॅंगवॉरमधील सर्वात मोठे नाव म्हणजे 'अरुण गुलाब गवळी' उर्फ 'डॅडी'. त्यांच्या 'दगडी चाळी'वर आधारित 'दगडी चाळ' हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याप्रमाणे डॅडींनी अवघ्या मुंबईवर राज्य केले तसेच या चित्रपटानेही अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केले. आता पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्रावर राज्य करायला 'दगडी चाळ २' सज्ज झाला असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरचे अनावरण ‘रिअल डॅडीं’च्या हस्ते दगड चाळीत झाले असून ट्रेलर पाहून चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित 'दगडी चाळ २' या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले असून रत्नकांत जगताप कार्यकारी निर्माता आहेत. येत्या १९ अॅागस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

'दगडी चाळ २'मध्ये आपल्याला सूर्या आणि डॅडी यांच्यातील एक वेगळे नाते पाहायला मिळणार आहे. एकेकाळी डॅडींचा उजवा हात असणारा सूर्या आता त्याच्या कुटुंबासोबत गॅंगवॉरच्या विळख्यातून बाहेर पडून एक साधं सोप्पं आयुष्य जगताना दिसत आहे. मात्र डॅडी आणि सूर्या यांच्यात असे काही घडले आहे, ज्याने सूर्या डॅडींचा तिरस्कार करू लागला आहे. आता त्यांच्यात नेमके काय घडले आहे, त्यांच्या नात्यात कडवटपणा का आला आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 

दिग्दर्शक चंद्रकांत कणसे चित्रपटाबद्दल म्हणतात की, "मकरंद देशपांडे यांनी साकारलेली डॅडींची भूमिका खूपच वजनदार असून 'दगडी चाळ २' हा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर वेगळीच छाप पाडेल, अशी खात्री आहे. या वेळी या चित्रपटात गॅंगवॅारसोबत राजकारणही पाहायला मिळणार आहे. चित्रपटाबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, ‘’ प्रेक्षकांनी ‘दगडी चाळ’ला भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही याचा सिक्वेल काढण्याचा निर्णय घेतला. जसे प्रेम आमच्या प्रेक्षकांनी ‘दगडी चाळ’ला दिले तसेच प्रेम आमचे हक्काचे प्रेक्षक ‘दगडी चाळ २’लाही देतील, अशी मला अपेक्षा आहे. लवकरच ‘दगडी चाळ २’ आपल्या भेटीला येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी तुमच्या जवळच्या चित्रपगृहात येतोय.

Link - https://bit.ly/DaagdiChaawl2Trailer

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...