Friday, August 12, 2022

 सलमान खानने दिल्या 'दगडी चाळ २'ला शुभेच्छा 

'मंगलमूर्ती फिल्म्स' आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' ची सध्या जोरदार चर्चा आहे. 'दगडी चाळ' मध्ये 'डॅडीं'चा विश्वासू सूर्या 'दगडी चाळ २'मध्ये अचानक तिरस्कार करू लागला आहे, याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना लागली आहे. त्यातच नुकतेच या चित्रपटातील 'राघू पिंजऱ्यात आला' हे एक जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यातून बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह हिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यामुळे या चित्रपटाची एकंदरच सर्वत्र हवा आहे. आता तर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान यानेही सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. 


 डॅडी आणि सूर्याचे नाते आपण 'दगडी चाळ' मध्ये यापूर्वीच पाहिले आहे. डोकॅलिटीचा वापर करून सूर्या अल्पावधीतच डॅडींचा उजवा हात बनला. मात्र 'दगडी चाळ २' मध्ये असे काय घडले की, सूर्या डॅडींचा इतका रागराग करतोय. या सगळ्यामागचे नेमके कारण काय, हे १८ ऑगस्टला उलगडणार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...