Tuesday, August 16, 2022

 'आला रे हरी आला रे’ हा ‘समायरा’तील अभंग प्रेक्षकांच्या भेटीला

         

       पंढरीचा वास ,चंद्रभागेचे स्थान आणि विठोबाच्या दर्शनाची आस, जिथे एकत्र येते ती म्हणजे पंढरीची वारी. याच वारीचा आभास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे ,  

वारकऱ्यांमध्ये आणि विठ्ठलामध्ये असणाऱ्या जिव्हाळ्यावर भाष्य करणारे निहार शेंबेकर संगीत दिग्दर्शित 'समायरा' चित्रपटातील 'आला रे हरी आला रे' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. संत तुकारामांचे शब्द लाभलेल्या या गाण्याला जुईली जोगळेकर आणि निहार शेंबेकर यांचा सुमधूर आवाज लाभला आहे. एक अनोखा प्रवास वारीमार्फत पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन निघालेली  'समायरा' येत्या २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संत ज्ञानेश्वरांनी शब्दबद्ध केलेल्या या अभंगाला सुमित तांबेंनी आधुनिकतेची जोड दिली आहे. समायराच्या भूमिकेत केतकी नारायण असून अंकुर राठीची प्रमुख भूमिका आहे.


  चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषी श्रीकृष्ण देशपांडे गाण्याविषयी म्हणतात, " वारी ही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ‘समायरा’ आणि तिचा वारीचा प्रवास प्रेक्षकांसाठी त्याच प्रवासाचे एक अनोख रूप घेऊन येणार आहे. म्युझिक टीमने या चित्रपटातील सर्व अभंगांना दिलेले नवीन रूप प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल,  याची मला खात्री आहे."

  ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, आद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, 'समायरा'ची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली असून या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Dhanda Nyoliwala drops an explosive new track- Ego Killer

  Dhanda Nyoliwala drops an explosive new track- Ego Killer   Fresh off the thunderous success of his hit track "Block" and blowin...