Thursday, August 18, 2022

                                                                         संजोग

अंजान है वो माँ की बेटी किसी और की कोक से आयी है…

 

‘झी टीव्ही’वरील ‘संजोग’ या कौटुंबिक मालिकेत पाहा दोन भिन्न सामाजिक स्तरांतील दोन माता आपल्या मुली आपल्यापेक्षा अगदी वेगळ्या स्वभावाच्या कशा झाल्या आहेत, याचा शोध घेताना!

22 ऑगस्टपासून रात्री 10 वाजता ‘झी टीव्ही’वर प्रसारित होणार्‍्या या मालिकेत शेफाली शर्मा, काम्या पंजाबी, रजनीश दुग्गल आणि रजत दाहिया यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका!


 गेल्या तीन दशकांत ‘झी टीव्ही’ वाहिनीने प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणार्‍्या मालिका आणि त्यात प्रेमात पडावीत अशा व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. भारताच्या कानाकोपर्‍्यातील प्रेक्षकांना भावतील अशा अनेक सुंदर कथा सादर केल्यानंतर ‘झी टीव्ही’ आणि ‘रश्मी शर्मा टेलिफिल्म्स’ पुन्हा एकदा एकत्र आले असून त्यांनी निर्मिलेली ‘संजोग’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांपुढे सादर केली जाईल. अमृता आणि गौरी या दोन भिन्न स्तरांतील मातांचे आपल्या मुलींशी असलेल्या नात्यावर ही कौटुंबिक मालिका आधारित आहे. या मालिकेचे कथानक जोधपूरमध्ये घडते. आपल्या मुली आपल्यापेक्षा अगदी वेगळ्या स्वभावाच्या कशा झाल्या आहेत, याचा शोध घेणार्‍्या या मातांची नात्यातील वाटचाल ‘संजोग’ या मालिकेत चित्रीत करण्यात आली आहे. पण या मातांना हे ठाऊक नसते की आपली मुलगी म्हणून त्यांनी ज्या मुलीला वाढविले आहे, त्यांच्या त्या जन्मदात्रीच नसतात! येत्या 22 ऑगस्टपासून दर सोमवार ते शुक्रवारी रात्री 10.00 वाजता ‘संजोग’ ही मालिका ‘झी टीव्ही’ वाहिनीवरून प्रसारित केली जाईल.

जोधपूरमध्ये घडणार्‍्या या मालिकेत शेफाली शर्मा आणि काम्या पंजाबी या नामवंत अभिनेत्री अनुक्रमे अमृता आणि गौरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या तारा आणि चंदा या मुलींच्या भूमिकेत अनुक्रमे उगवत्या अभिनेत्री हेझल शहा आणि हेतवी शर्मा या आहेत. दुसरीकडे मॉडेलिंगकडून अभिनयाकडे वळलेला कलाकार रजनीश दुग्गल आणि रजत दाहिया हे दोघे अनुक्रमे राजीव कोठारी (अमृताचा पती) आणि गोपाळ (गौरीचा पती) या व्यक्तिरेखा रंगविणार आहेत.


‘झी टीव्ही’च्या व्यावसायिक विभागप्रमुख अपर्णा भोसले म्हणाल्या, “रात्री 10 वाजताच्या वेळेत संजोगसारखी मालिका प्रेक्षकांपुढे सादर करण्यात आम्हाला आनंद वाटतो. ही एक गंभीर विषयावरील दोन भिन्न सामाजिक स्तरातील मातांची कौटुंबिक मालिका असून आपली मुलगी आपल्या स्वभावापेक्षा पूर्णपणे भिन्न स्वभावाची कशी आहे, या प्रश्नाचा शोध या माता घेत आहेत. पण आपल्या या मुलीच्या आपण जन्मदात्री नाही आहोत, ही गोष्ट त्यांना ठाऊक नाही. यानंतरची कथा ही खरं मातृत्त्व कशाला म्हणतात, त्याचं उदाहरण ठरेल. शेफाली शर्मा, काम्या पंजाबी, रजनीश दुग्गल आणि रजत दाहिया यांच्यासारखे तगडे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच चाळविली जाईल.”

या मालिकेच्या पहिल्या प्रोमोचे प्रसारण झाल्यापासूनच या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असून मुंबईत अलीकडेच एका शानदार कार्यक्रमात ‘संजोग’ मालिकेचे प्रसार माध्यमांसमोर अनावरण करण्यात आले. यावेळी राजस्थानी पारंपरिक पध्दतीचा सेट उभा करण्यात आला होता. त्याद्वारे पत्रकारांना या मालिकेची संकल्पना, राजस्थानी संस्कृती आणि परंपरा यांची कल्पना यावी, हा त्यामागील उद्देश होता. मालिकेतील ताराच्या सातव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमित्त साधून पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी काम्या पंजाबी आणि शेफाली शर्मा यांनी  मालिकेची संकल्पना उलगडून दाखविणारी एक नाटिका सादर केली. त्यानंतर त्या दोघींनी प्रसिध्द घूमर या पारंपरिक राजस्थानी नृत्यावर अन्य नर्तिकांसह नृत्यही सादर केले.

केवळ जन्म देणे महत्त्वाचे नसून आपल्या अपत्याची काळजी घेणे आणि त्याचे संगोपन करणे हेच खरे मातृत्त्व असते, ही मालिकेच्या कथानकाची संकल्पना आहे. झी टीव्हीने ह्यावेळी संपूर्ण बाल देखभाल आणि विकास क्षेत्रात काम करणाऱ्या भारताच्या सर्वांत मोठ्‌या स्वयंसेवी संघटना एसओएस चिल्ड्रन्स व्हिलेजेस ऑफ इंडियाच्या काही मुलांना ही मालिकेच्या नायिका अमृता (शेफाली शर्मा) आणि गौरी (काम्या पंजाबी) याची लाँच इव्हेंटच्या वेळेस भेट घेण्यासाठी निमंत्रित केले. ह्या दोघींनी मुलेमाता आणि सर्व सहकारी यांच्याशी बातचीत केली आणि त्यांच्या हृद्य कथा ऐकल्या आणि त्यांना अनेक आकर्षक भेटवस्तू आणि खूप प्रेम दिले. त्यामुळे हा दिवस सगळ्‌यांसाठीच अतिशय खास बनला. दत्तक मुलांची पुरेशी काळजी घेण्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास ‘एसओएस चिल्ड्रन्स व्हिलेजेस ऑफ इंडिया’ या संस्थेशी https://www.soschildrensvillages.in. या वेबसाइटवर संपर्क साधावा.

शेफाली शर्मा म्हणाली, “या मालिकेत अमृताची महत्त्वपूर्ण भूमिका देऊ केल्याबद्दल झी टीव्ही आणि रश्मी शर्मा फिल्म्स यांची मी खूप आभारी आहे. अमृताच्या व्यक्तिरेखेला वैशिष्ट्यपूर्ण पैलू असून मी या भूमिकेला न्याय देऊ शकेन, अशी आशा करते. अमृता ही उच्चभ्रू समाजातील असली, तरी मनाने प्रेमळ आहे. तिच्यात मातृत्त्वाची ओढ आहे. प्रेक्षकांना ही व्यक्तिरेखा अगदी आपलीशी वाटेल आमि तिच्यावर ते प्रेम करतील, याची मला खात्री आहे. मी पडद्यावर प्रथमच मातेची भूमिका साकारणार असल्याने माझ्यासाठी ही मालिका अधिकच खास ठरते. मी अमृताची व्यक्तिरेखा साकारण्यास खूप उत्सुक बनले आहे.”

काम्या पंजाबी म्हणाली, “एक अभिनेत्री म्हणून मला आव्हान देणार्‍्या भूमिका रंगविताना मला खूप आनंद होतो. गौरीच्या व्यक्तिरेखेचं रेखाटन फार छान करण्यात आलं असून तिच्या स्वभावाला अनेक पदर आहेत. ती कणखर मनाची, स्वतंत्र महिला असून आपल्या कुटुंबियांवर प्रेम व्यक्त करण्याची तिची शैली अगदी वेगळी आहे. संजोग ही अमृता आणि गौरी या दोन मातांची कथा आहे. त्यांना आपल्या मुली आपल्यापेक्षा अगदी भिन्न स्वभावाच्या कशा यामागच्या कारणाची कल्पना नसते. त्यावर प्रेक्षकांचा प्रतिक्रिया पाहण्यास मी उत्सुक बनले आहे.”

‘रश्मी शर्मा टेलिफिल्म्स’च्या निर्मात्या रश्मी शर्मा म्हणाल्या, “झी टीव्ही वाहिनीबरोबर आमचे संबंध सहज दहा वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत. आतापर्यंत आम्ही तयार केलेल्या मालिकांवर प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर उमटविली असून आता संजोगद्वारे पुन्हा तीच जादू निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या या आगामी मालिकेत माय-लेकींच्या गुंतागुंतीच्या नात्याची कथा असून त्यातील संवेदनशीलता आम्ही तपासणार आहेत. माता होण्यासाठी केवळ जन्म देणं पुरेसं नसतं, तर त्या अपत्याचं संगोपन प्रेम आणि काळजी यांनी करायचं असतं, ही यामागील संकल्पना आहे. मालिकेत काही दिग्गज कलाकार भूमिका साकारणार असल्याने प्रेक्षक आमच्यावर भरभरून प्रेम करतील, अशी आम्ही आशा करतो.”

एसओएस चिल्ड्रन्स व्हिलेजेस इंडियाचे सेक्रेटरी जनरल श्रीसुमंत कर म्हणाले अशा प्रकारचे व्यासपीठ मुलांना आयुष्यातील विभिन्न स्तरांवर असलेल्या लोकांसोबत बातचीत करण्याची उत्तम संधी प्रदान करतात आणि त्यांना आनंदी करतातत्यांना प्रेरणा देतात. त्याशिवाय हे अशा प्रकारचे एक्सपोजर हे ह्या मुलांच्या संपूर्ण देखभाल आणि विकासासाठी अतिशय महत्त्वाचे असते. आमच्या देखभालीत असलेल्या प्रत्येक मुलाला हे देण्याचा आमचा प्रयत्न असतो. एसओएस चिल्ड्रन्स व्हिलेजेसमध्ये एसओएस आई ही ह्या मुलांच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यास मदत करते.

शेफाली शर्मा, काम्या पंजाबी, रजनीश दुग्गल आणि रजत दाहिया या प्रमुख कलाकारांशिवाय वैशाली ठक्कर आणि डॉली मट्टू या कलाकारांनीही त्यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हे गुणी कलाकार प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप निश्चितच पाडतील, पण आपल्या मुली आपल्या स्वभावापेक्षा अगदी भिन्न का वागतात, यामागील खरे कारण अमृता आणि गौरी यांना शोधता येईल का, हे पाहणे रंजक ठरेल.

या गंभीर कौटुंबिक मालिकेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी 22 ऑगस्टपासून पाहा ‘संजोग’ सोमवार ते शुक्रवार रात्री 10.00 वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर!


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...