Saturday, August 27, 2022

 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे कलाकार यांची नागपूर एअरपोर्टवर ग्रेट भेट!

पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- चार वार हास्याचा चौकारसोमवार ते गुरुवाररात्री  वासोनी मराठी वाहिनीवर.

 

महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्राकार्यक्रमाला पाहिलं जातंहास्यजत्रेतील समीर चौगुलेप्रिथ्वीक प्रतापरसिका वेंगुर्लेकरवनिता खरात हे दमदार कलाकार आता नागपूरकरांच्या भेटीस आले आहेतनागपूर दौऱ्यानिमित्त विमानाने प्रवास करताना त्यांची भेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालीदेवेंद्रजी आणि आपले हास्यजत्रेचे कलाकार एकाच विमानाने प्रवास करत होतेविशेष म्हणजे देवेंद्रजी ही प्रवासादरम्यान हास्यजत्रा कार्यक्रमाचे मागील भाग पाहत होतेहा निव्वळ योगायोग म्हणावाकलाकारांना भेटल्यावर त्यांनी कलाकारांचेकार्यक्रमाचे आणि सोनी मराठी वाहिनीचे कौतुक केलेत्यांच्या बिझी शेड्युलमध्ये ही ते प्रवासा दरम्यान वा फावल्या वेळेत महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहणे पसंत करतातमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकारांची नागपूर एअरपोर्टवरील ही ग्रेट भेट कायम लक्षणीय असेल.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेला हा कार्यक्रम असून रसिक मायबाप या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत आहेतआता नागपूरकरांच्या भेटीस आलेले हे कलाकार काय कल्ला घालणार हे पाहणं रंजक ठरेल. 'महाराष्ट्राची हास्यजत्राहा मंच रसिकांना निखळ आनंद देत असून हास्यजत्रेतील एकेक पात्र रसिकांना त्यांच्या घरातलं वाटतं.

त्यामुळे टेन्शन विसरण्यासाठीदुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- चार वार हास्याचा चौकारसोमवार ते गुरुवाररात्री  वासोनी मराठी वाहिनीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...