Monday, August 8, 2022

 नवी मुंबईत मॉरिशस मधील 'रुबेला सिंड्रोम' ग्रस्त लहान बाळाला मिळाले जीवनदान


जीवघेण्या हृदयविकारामुळे बाळाला दूधसुद्धा पाजता येत नव्हते, हृदयातील विकारामुळे हृदय निकामी झाले होते

नवी मुंबई, ८ जुलै २०२२: अकाली जन्म झालेल्या जीवघेणा हृदयविकार असलेल्या मॉरिशसमधील लहान बाळाला अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे मिळाले नवजीवन. हृदयविकारामुळे बाळाला दूधसुद्धा पाजता येत नव्हते आणि रक्तसंचय हृदविकाराचा त्रास होत होता म्हणून चार महिन्यांच्या बाळाचे पालक मॉरिशस ते अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई असा ५००० किमी. विमानाचा लांबचा प्रवास करत इथे आले. बाळाला जन्मजात रुबेला सिंड्रोम असल्याचा संशय होता, ज्यामुळे बाळाला जन्मजात डक्टस आर्टेरिओसिस हा हृदयाचा विकार होता. या हृदयाच्या विकाराचा परिणाम म्हणून रक्तसंचय हृदयविकार यासह व्हॉल्युम ओव्हरलोड (द्रव अधिभार) होता. अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी वेळेवर निदान करुन पुढाकार घेतला, हृदयातील विकार बंद करण्यासाठी त्यांनी अनेक आव्हानांवर मात केली आणि अखेर बाळाला नवजीवन मिळवून दिले.


डॉ. भुषण चव्हाण, सल्लागार-बालरोग हृदयविकार, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले की, "हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे होते. अर्भक मॉरिशसमध्ये दोन महिन्यांसाठी एनआयसीयूमध्ये होते. बाळाची वाढ होऊ शकली नाही आणि चार महिन्यांचा असताना त्याचे वजन २.५ किलो म्हणजे जन्माच्या वेळी जेवढे होते, तेव्हढेच होते. बाळाचं नशीब बलवत्तर होतं म्हणून त्या बाळाला कोणतीही मोठी समस्या उद्भवली नाही आणि त्याने मॉरिशस ते नवी मुंबई असा मोठा प्रवास सुखरुप केला. आमच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर, बाळाचे कसून मूल्यमापन करण्यात आले आणि बाळासाठी पीडीए लक्षणीय आकाराचे असल्याचे आढळले. लक्षणीय रक्तप्रवाह असलेल्या मोठ्या पीडीएसाठी उपचार करण्याचे मानक म्हणजे शस्त्रक्रिया किंवा ट्रान्सकॅथेटर पद्धती वापरुन बंद करणे. कमी वजनामुळे असा निर्णय घेण्यात आला की आमच्या प्रगत कॅथ-लॅबमध्ये पीडीए कमीतकमी वेदनादायक इंटरवेशनल क्लोजर (हस्तक्षेपात्मक बंद) करण्यात यावे."

बाळाचे कमी वजन आणि (थ्रोम्बोस्ड) नसांची उपस्थिती यामुळे ही प्रक्रिया अधिक आव्हानात्मक होती. या विषयावर भाष्य करताना डॉ. भुषण चव्हाण म्हणाले की, "जरी पायांच्या उर्विका नसांमधूल क्रिया केली जात असली तरी या प्रकरणात ते शक्य नव्हते. बाळाची अवस्था नाजूक असल्यामुळे, आमच्याकडे पुरेसा वेळ नव्हता म्हणून आम्ही नवीन मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला. आम्ही मानेच्या उजव्या बाजूच्या अंतर्गत कंठाच्या शिरांमधून मार्ग काढला. लहान बाळांना हाताळताना शक्यतो चूक करु नये आणि आवरणातून सुरुवातीला वायरचा वापर केल्याने हृदयाची गती घसरते आणि कमी होते. म्हणूनच नंतर लगेच नाविन्यपूर्ण पद्धत वापरण्याचा निर्णय घेण्यात आला, बंदिस्त उपकरणासह (ऑक्ल्युडिंग डिव्हाइससह) वायरला मार्गदर्शन करण्यासाठी लवचिक कॅथेटर वापरण्याचा निर्णय झाला. आम्ही ३×५ मिमी. एवढे लाईफटेक ऑक्ल्युड असे सर्वात लहान उपकरण वापरले आणि मार्गदर्शन करणाऱ्या कॅथेटरद्वारे आणि पीडीएवर ठेवून यशस्वीरित्या बंद केले आणि त्यावरील प्रवाह अवरोधित केला."


इकोकार्डिओग्रामद्वारे उपकरणाच्या स्थितीची पुष्टी केली गेली, इकोकार्डिओग्राम म्हणजे हृदय आणि आजूबाजूच्या रक्तवाहिन्या पाहण्यासाठी वापरले जाणारे स्कॅन, ज्यामध्ये हृदयातील विकार पूर्णपणे बंद झाल्याचे दिसून आले. दोन तास चाललेल्या या प्रक्रियेनंतर बाळाला बरे वाटले म्हणून त्याला दूध पाजता आले. डॉ. भुषण चव्हाण यांच्यासह अपोलो हॉप्सिटल्सच्या वैद्यकीय चमूमध्ये (टीममध्ये) ऍनेस्थेटिस्ट डॉ. लीना पवार आणि बालरोग अतिदक्षता तज्ञ डॉ. नरजोहन मेश्राम यांचा समावेश होता

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

GLOBAL PRIDE OF SINDHI AWARDS 2024: A GLORIOUS CELEBRATION OF SINDHI HERITAGE

  GLOBAL PRIDE OF SINDHI AWARDS 2024: A GLORIOUS CELEBRATION OF SINDHI HERITAGE Awardees and guests- Ramesh Taurani, Ghanshyam Vaswani,Lille...