Monday, August 8, 2022

 कल्याण ज्वेलर्सची ‘रक्षाबंधन आकर्षक भेट’

मुंबई, ८ ऑगस्ट २०२२:  रक्षाबंधनाचा सण अगदी जवळ आलाय, बहीणभावाच्या सुंदर नात्याचा हा सण तितक्याच दिमाखात साजरा व्हायला हवा. वर्षभर भावंडांमध्ये होणारी भांडणे, तक्रारीची जागा जिव्हाळा, लाड, एकमेकांच्या सौख्यासाठी प्रार्थना आणि एकमेकांना दिलेले आशीर्वाद यांनी घेण्याचा हा खास दिवस! एखादी व्यक्ती आपल्याला जितकी जास्त जवळची तितकेच त्या व्यक्तीसाठी सर्वात चांगली भेटवस्तू शोधणे कठीण होऊन बसते. म्हणूनच तुमच्या सोयीसाठी कल्याण ज्वेलर्स घेऊन आले आहेत सर्वात स्टायलिश आणि ट्रेंडी दागिन्यांची मिनी-लिस्ट. यातील दागिने बहिणीला भेट म्हणून द्या आणि तिला दाखवून द्या की ती तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे.

सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या ज्वेलरी ब्रँडने स्टडेड दागिने खरेदीतील प्रत्येक दागिन्यांवर सूट देऊ केली आहे. याशिवाय घडणावळीवर प्रत्येक ग्राममागे इन्स्टंट डिस्काउंट तसेच जुन्या सोन्याच्या एक्स्चेंजवर भरपूर डिस्काउंट योजना देखील कल्याण ज्वेलर्सने सुरु केली आहे. भारतात कल्याण ज्वेलर्सच्या सर्व शोरूम्समध्ये आकर्षक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतील. अभूतपूर्व आणि आकर्षक अशा या ऑफर्स ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत सुरु राहतील.

रक्षाबंधनला कल्याण ज्वेलर्सच्या ६ ग्लॅमरस दागिन्यांची कोणती अनोखी भेट द्याल :-

१) अतिशय प्रेमाने घडवलेले, निसर्गापासून प्रेरणा घेऊन डिझाईन केलेले हे सुंदर पेंडंट म्हणजे स्टडेड डायमंड्स आणि गोल्डन मॅट फिनिशचा सुरेख मिलाप आहे.  कोणत्याही परिधानावर अगदी सहज शोभून दिसेल असा हा नाजूक दागिना तुमच्या बहिणीसाठी सर्वात चांगली भेट ठरेल.

२) सोन्याचे नेकलेस कधीही आऊट ऑफ स्टाईल होणार नाहीत.  हा साधा आणि तरीही शालीन, दिमाखदार नेकपीस मौल्यवान स्टोन्सनी सजवण्यात आला आहे. फुलाचे डिझाईन असलेला, अतिशय अनोखा असा हा दागिना तुमच्या अनोख्या बहिणीसाठी उत्तम आहे. 

३) सोन्याचे ब्रेसलेट कोणत्याही परिधानावर सुबक दिसेल. अतुलनीय कारीगरी व बारकाव्यांकडे नीट लक्ष देऊन केलेले सुरेख नक्षीकाम याची खासियत आहे. रक्षाबंधनाला आपल्या बहिणीला ही छानशी भेट देऊन तिच्या मनात आनंद फुलवा.  

४) गोल्ड बीडेड ब्रेसलेट, त्याच्या शेवटी असलेले स्टडेड डायमंड्स एक क्लासी ट्विस्ट देतात. कोणत्याही इंडो-वेस्टर्न कपड्यांवर हे खूप छान दिसेल.

५) डायमंड गोल्ड ब्रेसलेट. आधुनिकतेचा सुंदर स्पर्श ल्यालेले हे ब्रेसलेट प्रत्येक महिलेच्या दागिन्यांमध्ये असायलाच हवे.

६) भौमितिक आकाराचे गोल्ड पेंडंटमध्ये परंपरा आणि आधुनिक स्टाईल यांचा छान मेळ साधला गेला आहे.  रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित करणारी ही भेट आयुष्यभर साथ देईल.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...