Saturday, August 6, 2022

सिने सन्मान ला कलाकारांची मांदियाळी

मराठी मनोरंजन सृष्टी ही नेहमीच नावाजली जाते ती म्हणजे तिच्या बहूआयामी विषय आणि आशय घनतेमुळे, माध्यम कोणतंही असो वा कोणतीही कलाकृती मनोरंजन सृष्टीतला प्रत्येक जण एकत्र येऊन तो विषय ती कला साजरी करत असतो. असाच एक सोहळा कलाकारांनी एकत्र येऊन साजरा केलाय तो म्हणजे 'फक्त मराठी सिने सन्मान २०२२'. मनोरंजन सृष्टीत लॉकडाऊन नंतर सुरू झालेल्या नव्या पर्वाला सलाम करत आणि नव्याने मनोरंजन सृष्टीच्या दिग्गजाचा सन्मान करणारा हा 'फक्त मराठी सिने सन्मान २०२२' च्या पूर्वार्धात प्रदर्शित झालेल्या प्रत्येक चित्रपटाचा सन्मान करत आहे.


 दिमाखदार सोहळ्यात अनेक कलाकारांनी लावलेली हजेरी ही या सोहळ्याचं आकर्षण तर आपल्या अभिनयाने संपूर्ण देशाला आपल्या प्रेमात पाडणाऱ्या 'विद्या बालन' ने या सोहळ्यात लावलेली हजेरी ही या सोहळ्याला चार चांद लावणारी होती. सोहळा जरी कलाकाराचा असला तरी या कलाकाराच्या सोहळ्यात पडद्या मागच्या कलाकाराचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. हा गौरव करणे हाच या पुरस्कार सोहळ्याचा विशेष गुणधर्म आहे. आपल्या आयुष्याची अनेक वर्षे या मनोरंजन सृष्टीला दिलेले आणि रंगभूषेत सातत्याने नवनवीन प्रयोग करणारे 'विद्याधर भट्टे' यांचा विशेष पुरस्कार देऊन या गौरव करण्यात आला, हा गौरव विद्या बालन यांच्या हस्ते करण्यात आला तर हा गौरव सुपूर्त करताना विद्या बालन ने विद्याधर भट्टे यांच कौतुक करत त्यांच्या सोबत सवांद ही साधला. तर याच सोहळ्याच्या मंचावर अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीच्या जीवन प्रवासाचा गुणगौरव करण्यात आला तो ही त्यांचे मित्र आणि चित्रपट सृष्टीचे नामांकित सचिन पिळगावकर यांच्या आईच्या हस्ते, तब्बल ५० हुन अधिक वर्ष सिनेसृष्टीत आपलं स्थान अटल करण्यासाठी तसेच लहानापासून ते थोरांपर्यंत प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात वसलेल्या 'अशोक सराफ' यांचा विशेष सन्मान या सोहळ्यात झाला तर वर्षा उसगावकर आणि किशोरी शहाणे यांनी चंद्रमुखीच्या गाण्यांवर ताल धरला. याच बरोबर आजच्या तरुण कलाकारानी रंगविलेले एक स्किट हे पूर्णतः अशोक सराफ यांच्याबर आधारीत होत. या सोहळ्याच अजून एक खास बाब म्हणजे तरुण पिढीचे २ मुख्य कलाकार अमेय वाघ आणि ओंकार भोजने यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन केले. अनेक सोहळ्याचा सूत्र संचालन केलेल्या अमेय वाघ आणि पहिल्यांदा सूत्र संचालन करणाऱ्या ओंकार भोजने यांची विशेष मैत्री रंगमंचावर पाहायला मिळाली. पहिल्यांदाच होणाऱ्या फक्त मराठी सिने सन्मान २०२२ च्या निमित्ताने धर्मवीर तसेच सरसेनापती हंबीरराव या सिनेमांची स्टारकास्ट प्रवीण तरडे, प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, क्षितिज दाते तसेच सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, स्नेहल तरडे, राहुल देशपांडे, मृण्मयी देशपांडे, प्रियदर्शन जाधव असे अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते.


'फक्त मराठी सिने सन्मान सोहळा' हा फक्त मराठी वाहिनीवरील पहिला वहिला सोहळा प्रेक्षकांना समोर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. दिग्गज कलाकारांनी जितकं भरभरून प्रेम या सोहळ्यावर केलं तितकच प्रेम महाराष्टातील जनता देखील करेल अशी मला खात्री आहे. फक्त मराठी या वहिनी मार्फत नवनवीन कार्यक्रम सादर करून   महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.

शिरीष पटनशेट्टी (एम. डी - फक्त मराठी)



मराठी चित्रपट सृष्टीला पुरस्कार सोहळे हे काय नवे नाहीत म्हणूनच 'फक्त मराठी सिने सन्मान सोहळा' सादर करताना नावीन्यपूर्ण दृष्टिकोन महत्वाचा होता. नवनवीन कल्पना व आपल्या आवडत्या कलाकारांना पहिल्यांदाच आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी फक्त मराठी सिने सन्मान सोहळाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणारं आहे. 'फक्त मराठी सिने सन्मान सोहळा' हा मराठी चित्रपट सृष्टीच्या शिरेपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवून प्रेक्षकांचं मनोरंजन करेल यात शंका नाही.
पल्लवी मयेकर (बिझनेस हेड - फक्त मराठी)

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

GLOBAL PRIDE OF SINDHI AWARDS 2024: A GLORIOUS CELEBRATION OF SINDHI HERITAGE

  GLOBAL PRIDE OF SINDHI AWARDS 2024: A GLORIOUS CELEBRATION OF SINDHI HERITAGE Awardees and guests- Ramesh Taurani, Ghanshyam Vaswani,Lille...