Monday, August 29, 2022

                     'ज्ञानेश्वर माउलीमालिकेत उत्कर्ष शिंदे साकारणार संत चोखामेळा

 

पाहा, 'ज्ञानेश्वर माउली', सोम.-शनि., संध्या. 7 वा., सोनी मराठी वाहिनीवर.




 

       सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सार काही प्रेक्षकांना विशेष भावलं. अलौकिक हरिभक्तीच्या या प्रवासाचे प्रेक्षक साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल आहे. माउली, त्यांची भावंडं, इतकंच नव्हे तर मालिकेत माउलींच्या कार्याला विरोध करणारे विसोबा या व्यक्तिरेखांवरही प्रेक्षकांनी प्रेम केलं. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यांत आणखी एका संताची एंट्री होणार आहे.

 

                      या संतांच्या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झाली. माउलींच्या चमत्काराबरोबरच संतांच्या चमत्कारांची पर्वणीही प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करत आहे. संत चोखामेळा या पात्राची मालिकेत एंट्री होणार असून या भूमिकेत उत्कर्ष शिंदे झळकणार आहे. पतितांना तारणारे  उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणून संत चोखामेळा यांच्याकडे पाहिले जाते. या भूमिकेतून छोट्या पडद्यावर उत्कर्षला पाहणे प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे. अंगावर गोंघडीचे शिवलेले वस्त्र, हातात काठी अशा मोहक रूपात उत्कर्ष असेल. त्याच्या या लूकची प्रेक्षकांमध्ये नक्कीच चर्चा होईल, यांत शंकाच नाही. त्याच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. विठ्ठलाचा निस्सीम भक्त असलेला चोखामेळा आणि ज्ञानेश्वर माउली यांचे संबंध नेमके कसे होते हे पाहणे प्रेक्षकांना उत्सुकतेचे ठरेल.

 

                     

संत ज्ञानेश्र्वरांच्या प्रभावळीतले संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत चोखामेळा यांचा प्रवास पाहण्यासाठी पाहत राहा, 'ज्ञानेश्वर माउली', सोम.-शनि., संध्या 7 वा., सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...