Thursday, August 18, 2022

आता करूया नवीन वर्षाची आनंददायी सुरूवात, आई, आजी, पत्नी, बहीण, सासू, मावशी…


करूया नववर्षाची आनंददायी सुरूवात, जिओ स्टुडिओजची नवं वर्षाची खास भेट, केदार शिंदे दिग्दर्शित आपल्या सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची सुपर कथा  "बाईपण भारी देवा" प्रदर्शित होणार ६ जानेवारी २०२३ ला !

आपल्या आयुष्यात असलेल्या या सर्व जीवाभावाच्या मैत्रिणींना समर्पित असलेला असा हा चित्रपट आहे.

घे डबल' आणि 'गोदावरी' या दोन मराठी चित्रपटांच्या घोषणेनंतर, जिओ स्टुडिओजने त्यांच्या सलग तिसऱ्या चित्रपटची, 'बाईपण भारी देवा' च्या प्रदर्शनाची

तारीख जाहीर केली आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या खुमासदार शैलीने नटलेला हा चित्रपट येत्या नव वर्षात, ६ जानेवारी २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती MVB Media च्या माधुरी भोसले यांनी केली असून बेला शिंदे आणि अजित भुरे याचे सह-निर्माते आहेत.

आणि महत्वाचं आकर्षण म्हणजे या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर अश्या सहा उत्तम कलाकारांची धमाल आपल्याला बघायला मिळणार आहे.

काही कारणास्तव एकमेकांपासून विभक्त झालेल्या आणि त्याचबरोबर कौटुंबिक, वैयक्तिक तसंच आर्थिक समस्या अश्या गोष्टींचा सामना करणाऱ्या सहा बहिणींची ही कथा आहे. 



चित्रपटाच्या संकल्पनेबद्दल बोलताना, दिग्दर्शक केदार शिंदे सांगतात, “आपल्या सर्वांच्या दररोजच्या आयुष्यात अशा स्त्रिया आहेत ज्या अशा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात, परंतु आपणच कळत नकळतपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. ‘बाईपण भारी देवा' हा चित्रपट अशाच महिलांना समर्पित आहे. या सहा बहिणींची ही गोष्ट सर्वांना नक्कीच आवडेल. आणि नवीन वर्षाची सुरुवात एका आशादायी आणि आनंदाने होईल याची मला खात्री आहे.”



जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले निर्मित आणि केदार शिंदे  दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' येत्या नव वर्षात ६ जानेवारी २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...