Saturday, August 6, 2022

 स्थलांतरित – थिएटर अकादमी, पुणे यांच्या सहकार्याने एनसीपीएची प्रस्तुती ह्या नाटकाचा मुंबई प्रीमिअर करण्यात येत आहे.


नववर्षाची संध्या. एका समृद्ध आणि प्रजासत्ताक देशातील इमारतीतील अंधारी तळघर. ते दोघे तिथे राहतात. असे दोन स्थलांतरित, जे केवळ योगायोगाने एकत्र आले आहेत. त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये त्यांची कधीही भेट झाली नाही. एकाचे हात एवढे बळकट आहेत की दिवसभर इमानदारीने काम करण्यासाठी ते कचरत नाहीत तर दुसऱ्याकडे विचार करण्याची क्षमता असलेले डोके आहे. पण त्यांचा देश ना त्या बळकट हातांसाठी काही काम देतो आणि ना विचार मांडण्यासाठीचे स्वातंत्र्य. त्यामुळे ह्या दोन विरूद्ध शक्ती एकाच छताखाली एकत्र येतात. त्यानंतर निर्माण होतो तो एक कष्टकरी आणि बुद्धिवंत यांच्यातील न सोडवता येणारा आणि अगम्य संघर्ष. त्यात असेल समाजातील एकमेकांसाठी वेळ नसलेल्या दोन घटकांचे प्रतिनिधित्व करणारा विनोदी, उत्कट आणि अनेकदा आपली बाजू उघड करणारा संवाद.

स्लावोमीर म्रोझेक (पोलिश) यांच्या इमिग्रंट्‌स ह्या नाटकावर आधारित

लेखन: माधुरी पुरंदरे

दिग्दर्शन: शिवराज वायचळ

कलाकारः चिन्मय पटवर्धन आणि गौरव बर्वे

दिनांक – 7 ऑगस्ट 2022

वेळ - संध्याकाळी 6 पासून

गोदरेज डान्स थिएट

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...