Friday, August 26, 2022

 एनसीपीए प्रस्तुत करत आहेत राधा’ कम्पॅनियन; बिलव्ह्‌ड; आराध्या -डॉबीएनगोस्वामींतर्फे सचित्र चर्चा 

~ 30 ऑगस्ट 2022 | संध्याकाळी 6.30 वाजता | एक्सपेरिमेंटल थिएटर ~

प्रवेश - मेंबर प्राईज - Rs. 270/- पासुन | नॉन मेंबर प्राईज - Rs. 300/- पासुन

 पंधराव्या शतकातील कवी विद्यापती यांचे हे गीत व्रजा ह्या सुंदर मुलीच्या तोंडी असून अन्य अगणित मुलींप्रमाणे तीसुद्धा अतिशय गोड असा माधव म्हणजेच कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे. पण अखेरीस विचारण्यात आलेला प्रश्न कृष्णाची दैवी सखी राधालासुद्धा विचारला जाऊ शकतो. कारण ती सर्वत्र आहे कविता आणि चित्रांमध्ये संगीत आणि नृत्यामध्ये आणि त्यासगळ्‌याहूनही वर भक्ताच्या हृदयामध्ये तरीही तिच्याबाबतीत खूप कमी माहिती उपलब्ध आहे आणि खासकरून तिच्या मूळांबाबत. ती नक्की कोण आहे सखी? प्रेयसी? देवी?

प्रख्यात कला इतिहासकार आणि लघुचित्रकलेचे अभ्यासक डॉ. बी. एन. गोस्वामी (ब्रिजिंदर नाथ गोस्वामी) हे कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील एक विख्यात नाव आहे. ते एक नावाजलेले कला समीक्षक असून कथा आणि भावनांनी समृद्ध अनेक चित्रांना जीवंत करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.

आपल्या कथा आणि ज्वलंत दूरदृष्टी सांगताना नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्‌स (एनसीपीए), मुंबई हे छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय आणि सहचारी फाऊंडेशन इव्हेंट्‌स यांच्यासह डॉ. बी. एन. गोस्वामी यांच्यातर्फे सचित्र चर्चेचे आयोजन करण्यात येत असून ते भारतातील चित्रकार आणि कविंच्या नजरेतील राधेबद्दल बोलतील.

कला आणि संस्कृतीवर 20 पुस्तकांचे प्रस्थापित लेखक डॉ.गोस्वामी यांना 1998 मध्ये पद्‌मश्री पुरस्काराने तर 2008 मध्ये पद्‌भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ह्या कार्यक्रमाबद्दल एनसीपीएच्या नृत्य विभागाच्या प्रमुख श्रीमती स्वप्नोकल्पा दासगुप्ता म्हणाल्या, “आपण पाहत असलेल्या प्रत्येक चित्रामागे अनेकदा एक वेगळी कथा दडलेली असते. पहिल्या दृष्टीक्षेपात कदाचित हे लक्षात येणार नाही पण कलाकाराने वापरलेल्या रंगांच्या आणि त्याने खेचलेल्या ओळींच्या पलीकडे अर्थ लावण्याचा वाव नेहमीच असतो. आमचा आगामी कार्यक्रम हा असाच राधेच्या असाधारण चित्रांमागे लपलेल्या कथेचा शोध घेण्याबद्दल असून खुद्द डॉ.बी.एन.गोस्वामी हे ह्या कथा त्यांच्या शब्दांत सांगतील. कला ज्याप्रमाणे दिसते त्यापेक्षा कितीतरी अधिक असते ह्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी त्यांचे हे भाष्य निश्चितपणे उद्‌बोधक ठरेल.

ह्या कार्यक्रमाचे आयोजन 30 ऑगस्ट रोजी एक्सपेरिमेंटल थिएटर येथे संध्याकाळी 6.30 वाजता करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Dhanda Nyoliwala drops an explosive new track- Ego Killer

  Dhanda Nyoliwala drops an explosive new track- Ego Killer   Fresh off the thunderous success of his hit track "Block" and blowin...