Thursday, August 4, 2022

 भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचा सोहळा साजरा करत कौन बनेगा करोडपतीचे 14वे सत्र सुरू होणार 


एक विशेष तारा-मंडित एपिसोड आझादी के गर्व का महापर्व प्रसारित होणार 7 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

 

भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चाललेल्या ज्ञान-आधारित गेम शो, कौन बनेगा करोडपतीचे नवीन सत्र लवकरच सुरू होत आहे. या शोचे 14वे सत्र केवळ हॉटसीटपर्यंत पोहोचणार्‍या स्पर्धकांसाठीच नाही, तर प्रेक्षकांसाठीही अधिक आकर्षक आणि समाधान देणारे असणार आहे. स्टुडिओ नेक्स्ट द्वारा निर्मित या शोचा शुभारंभ रविवारी 7 ऑगस्ट रोजी होणार असून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता हा शो प्रसारित करण्यात येईल.

 

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचे औचित्य साधून हा शो आझादी के गर्व का महापर्व या धमाकेदार इव्हेंटच्या रूपात सुरू होणार आहे. श्री. अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन लाभलेल्या या विशेष भागात कारगिल युद्धातील वीर मेजर डी. पी. सिंह, सेना पदक विजेती कर्नल मिताली मधुमिता तसेच जगप्रसिद्ध भारतीय खेळाडू पद्मविभूषण एम सी मेरी कॉम आणि पद्मश्री सुनील छेत्री तसेच पद्मभूषण अभिनेता आमीर खान हे मान्यवर उपस्थित असणार आहेत.

                           

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद द्विगुणित करत या शोमध्ये 15व्या प्रश्नावर एक पडाव दाखल करण्यात आला आहे. धन अमृत नामक हा पडाव पार केल्यास स्पर्धकाला 75 लाख रु. बक्षीस रक्कम मिळण्याची हमी असेल! शिवाय, यापूर्वीच दाखल केलेल्या जॅकपॉट प्रश्नाची बक्षिसाची रक्कम देखील वाढवून आता 7.5 कोटी रु. करण्यात आली आहे. प्ले अलॉन्ग मार्फत या खेळात सहभागी होणार्‍या प्रेक्षकांना दर शुक्रवारी थेट हॉटसीटपर्यंत पोहोचण्याची संधी देखील या सत्रात मिळणार आहे.

 

बघा कौन बनेगा करोडपती, नवीन सत्र सुरू होत आहे, 7ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...