Monday, August 1, 2022

                                           'आय हेट यू डॅडी'
        'दगडी चाळ २' मध्ये 'डॅडी आणि सूर्या' मध्ये नेमकं काय झालं?


मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर 'चुकीला माफी नाही' असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं'ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. 

'दगडी चाळ १' ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचे दुसरे पर्व १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाचे नवं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून यात पुन्हा एकदा अंकुश चौधरी आपल्याला सूर्याच्या भूमिकेत दिसतोय. ‘डॅडी’ आणि सूर्याचे नाते आपण याआधीच पाहिले. 'डॅडीं'च्या गुंडांसोबत होणाऱ्या भांडणानंतर सूर्या-डॅडींची होणारी मांडवली, 'डोकॅलिटी' वापरून काम करणारा 'सूर्या' डॅडींचा उजवा हात बनला, त्यात सूर्याचा कौटुंबिक ताण, हे सगळं आपण यापूर्वी पाहिलं. 
 
मात्र यावेळी 'आय हेट यू डॅडी' असे म्हणत, सूर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतोय, आता तो डॅडींचा तिरस्कार का करतोय?, याचे उत्तर 'दगडी चाळ २' पाहिल्यावरच मिळेल. 

या चित्रपटात मकरंद देशपांडे 'डॅडीं'ची भूमिका साकारत आहेत.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...