Saturday, August 13, 2022

             'महाराष्ट्राची हास्यजत्रापरत येतेय हास्याचा चौकार घेऊन!

 

पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- चार वार हास्याचा चौकार१५ ऑगस्टपासून सोमवार ते गुरुवाररात्री  वासोनी मराठी वाहिनीवर!

 

पूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा१५ ऑगस्टपासून परत येतो आहेआठवड्यातले चारही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे.  काही दिवसांची क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर जत्रेकरी आता रसिकांना हसवण्यासाठी पुन्हा  सज्ज झाले आहेतहास्यजत्रा ब्रेक घेतेय हे समजल्यावर रसिकांनी हळहळ व्यक्त केलीटेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखला जाणारा हा कार्यक्रम खरोखच रसिकांच्या घराघरांत पोचला आहे.


 

'महाराष्ट्राची हास्यजत्राह्या मंचाने रसिकांना निखळ आनंद दिला आहेहास्यजत्रेतील एकेक पात्र रसिकांना त्यांच्या घरातलं वाटतं.  रसिकमायबाप प्रेक्षक कलाकारांना त्यांच्या कामामुळे ओळखतातजेव्हा संपूर्ण जग कोवीडसारख्या महामारीने हैराण होतंतेव्हा या कार्यक्रमानी रसिकांना दुःखत्रासटेन्शन सगळं विसरायला भाग पाडलंअनेकांना हास्याचा डोस देऊन ठणठणीत बरं केलंत्यामुळे हास्यजत्रा पुन्हा सुरू होतेय ही रसिकांसाठी पर्वणी असणार आहेयेणाऱ्या नव्या पर्वात रसिकांना अनेक गोष्टी बघायला मिळतीलनवीन सेटस्कीटचे वेगळे विषयनवीन पात्रं आणि बरंच काही.  निवेदिका प्राजक्ता माळी हिचं 'वाह दादा वाहपुन्हा एकदा ऐकायला मिळेलहास्यरसिक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचं दर्जेदार परीक्षण बघायला मिळेलसमीरगौरवनम्रताप्रसाददत्तू आणि इतर कलाकार यांचे दमदार अभिनय बघायला मिळतीलत्यामुळे हास्यजत्रा पुन्हा कधी सुरू होतेय आणि कधी रसिकांना खळखळून हसायला मिळतंय याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

 

त्यामुळे टेन्शन विसरण्यासाठीदुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- चार वार हास्याचा चौकार१५ ऑगस्टपासून सोमवार ते गुरुवाररात्री  वासोनी मराठी वाहिनीवर!


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...