Tuesday, August 23, 2022

    
             जिओ स्टुडिओजने त्यांच्या आगामी  '४ ब्लाइंड मेन'                                   (4 Blind Men) या चित्रपटाची घोषणा केली.


जिओ स्टुडिओज नुकत्याच तीन वेगवेगळ्या चित्रपटांची घोषणा केल्यानंतर आता आणखी एका थ्रिलर चित्रपटाची घोषणा करीत आहे. चित्रपटाचे नाव '४ ब्लाइंड मेन' (4 Blind Men) असे आहे. हा चित्रपट ४ अंध व्यक्ती आणि हत्ती यांवर आधारित प्रसिद्ध बोधकथेवर चित्रित केला आहे. या  चित्रपटात ४ वेगवेगळ्या वळणावरती असणाऱ्या या अंधव्यक्ती काही असामान्य परिस्थितीत सापडल्या असून नशीब त्यांना एकत्र घेऊन येते . एकामागोमाग  एक अशा  घडलेल्या खूनांमुळे त्यांच संपूर्ण आयुष्य कायमच बदलून जाते. प्रेक्षकांना हा थ्रिलर चित्रपट खुर्चीवर खिळवून ठेवणारा आहे. 

नितीन वैद्य निर्मित आणि अभिषेक मेरुकर दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत झळकत असून सोबतच शुभंकर तावडे, संकर्षण कऱ्हाडे, शेखर दाते व मृण्मयी देशपांडे या दिग्गज कलाकारांची फौज झळकत आहे.

दिग्दर्शक अभिषेक मेरूकर चित्रपटाबद्दल सांगतात, " जेव्हा मला या चित्रपटावर काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी मला मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त कलाकारांची फौज हवी होती, जे कलाकार चित्रपटातील पात्रांची भूमिका योग्य प्रकारे पार पाडतील, असे कलाकार मला भेटले. मराठी चित्रपसृष्टीत पहिल्यांदाच थ्रिलर हा चित्रपटाचा प्रकार अनुभवला जात आहे. सर्वच कलाकारांनी आपआपल्या भूमिकेला चांगलाच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांनी  हा चित्रपट पाहिल्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रियेची  मला उत्सुकता लागलेली आहे ."

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...