Friday, August 26, 2022


 समायरा एक धाडसी मुलगी....

 
 जिला वयाच्या चौथ्या वर्षापासून आपले आईबाबा कोण? असा प्रश्न पडला त्या मुलीची कहाणी. समायरा हा एक भावनिक आणि ह्रदयापर्यन्त पोहोचवणारा चित्रपट आहे.एक धाडसी मुलगी जी आपल्या ब्लॉग मधून आजच्या जेनेरेशनला प्रोत्साहित करते. जी आपल्या आयुष्याचा अर्थ शोधायला निघाली आहे. 

केतकी नारायण समायरा या चित्रपटात खूपच बिनधास्त आणि धाडसी आशा भूमिकेत बघायला मिळेल. ती धाडसेने  प्रवास करते त्याचे ब्लॉग करते आणि लोकाना प्रोत्साहित करण्याचे काम  ती करते.  ती या चित्रपटात मोटर सायकल (बाइक ) चालवताना दिसणार आहे.

 केतकी नारायण हिचे  पात्र ह्रदयाला स्पर्श करणारे  आहे. ती आजच्या मुलींना काहीतरी नवीन करण्यासाठी  प्रोत्साहित  करते. चित्रपटाची सुरुवात समायारा आपल्या ट्रॅवल ब्लॉग मधून देश आणि विदेश भर जाऊन आपले किस्से  लोकांना शेअर करते.पुढे जावून तिला हा प्रश्न सारखा तिच्या भूतकाळात नेतो की माझे आईबाबा कोण? 

आणि म्हणूनच आपल्या आई-बाबांच्या शोधत समायरा पंढरपूरच्या यात्रेला निघते. त्या दारम्यत तिला खूप लोक मिळतात आणि त्यात मिळतो तिचा एक मित्र जो तिला नाही  ओळखत आणि ती त्याला  पण तो तिच्या  मदतीसाठी शेवट पर्यन्त असतो. लहानपणापासूनच समायाराने  तिच्या आयुष्यात खूप काही बघितले असते आणि ते  सारे प्रसंग समायराला नव्याने अजून काहीतरी करण्याचे धाडस देते.

 आपले आई-बाबा आणि आयुष्यंच्या शोधत निघालेली ही समायरा आपल्या खऱ्या आई-बाबांना भेटते की नाही हे  बघण्यासाठी आपल्या जवळच्या  चित्रपटपटगृहात बघयला विसरू नका.  




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...