Saturday, August 27, 2022

जिओ स्टुडिओजच्या एका थरारक आणि ॲक्शन पॅक वेब शो ‘कालसूत्र’ची घोषणा!

 जिओ स्टुडिओजच्या एका  थरारक आणि ॲक्शन पॅक वेब शो ‘कालसूत्र’ची घोषणा!सुबोध भावे, सयाजी शिंदे, भाऊ कदम, उर्मिला कोठारे आणि अनंत जोग अशी दमदार स्टारकास्ट लवकरच आपल्या भेटीस !

मराठी मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज असणाऱ्या जिओ स्टुडिओजने गेल्या काही दिवसात अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची घोषणा केली. आता जिओ स्टुडिओने एका नव्या वेब-शोची घोषणा केली आहे. सलील देसाई यांच्या ‘मर्डर माईलस्टोन’ कादंबरीवर आधारीत ‘कालसूत्र’ हा रोमांचकारी थरारक वेब-शो लवकरच आपल्या भेटीला येणारं आहे.

एक कर्तबगार पोलीस अधिकारी, फाशीच्या शिक्षेवर असणारा एक सिरियल किलर, त्याच्या क्रूरतेचा बळी पडलेली आठ लोकं, आणि त्याचा अदृश्य असलेला शिष्य, अश्या गुंतागंतीची चौकट असणारी ही कथा आहे.

कथानकातील वेगळेपण, रहस्यमयता आणि थरार यामुळे ‘कालसूत्र’चा हा पहिला सीजन प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास निर्माते व्यक्त करतात. 

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार सुबोध भावे, सयाजी शिंदे, अनंत जोग, उर्मिला कानेटकर-कोठारे, भाऊ कदम, पुष्कराज चिरपुटकर, शुभंकर तावडे, उमेश जगताप आणि अश्विनी कासार अशी कलाकारांची तगडी स्टारकास्ट ‘कालसूत्र’मध्ये झळकणार आहेत. भीमराव मुडे यांनी या वेब-शोच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून, जिओ स्टुडिओजसह मंजिरी सुबोध भावे यांच्या नेतृत्वाखालील कान्हा निर्मिती संस्थेने या वेब-शोची निर्मिती केली आहे.

या वेब-शोबद्दल सुबोध भावे सांगतात, ‘‘एखाद्या बेस्टसेलर पुस्तकावर आधारित काम करणे ही माझ्यासाठी नवीन गोष्ट होती. आणि म्हणूनच ‘कालसूत्र’ या शोमध्ये मुख्य पोलीस अधिकारी म्हणून काम करणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. ही मालिका प्रेक्षकांना त्याच्या कथानकाने नक्कीच भुरळ घालेल याची मला खात्री आहे. महत्वाचं म्हणजे मोठ्या स्केलवर, चित्रपटाच्या धर्तीवर याची आम्ही निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे.”


Link:- https://youtu.be/2z1d2h-q4I4

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...