We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Friday, December 2, 2022
SANJAY LEELA BHANSALI WOWS AUDIENCES IN LONDON AS PART OF GANGUBAI KATHIAWADI’ BAFTA CAMPAIGN!
Time to be Deewana for Vishal Mishra's latest from Maarrich!
Time to be Deewana for Vishal Mishra's latest from Maarrich!
Watch now- https://m.youtube.com/watch?v=
The latest song, Deewana, from the upcoming Bollywood movie, Maarrich is out! A groovy party song that will ensure you can't stop yourself from hitting the dance floor. Written, composed and sung by Vishal Mishra the song gives a glimpse into the inside world of Maarrich where Everyone is A Suspect.
With the party season setting in, Deewana will surely make it to being the "Club Anthem of the Year".
Tusshar Kapoor says "It is nothing like the traditional party and love songs. Deewana is a perfect combo of both. You can feel each beat and lyrics. Vishal Mishra has done an amazing job!"
Vishal Mishra says “We didn't want a loud party number or slow love song, we wanted to create something upbeat yet sensuous, also something that fits the plot of the film"
Maarrich is an upcoming thriller movie set to release on 9 Dec 2022. A Dhruv Lather directorial featuring Naseeruddin Shah, Tusshar Kapoor, Anita Hassanandani and Rahul Dev in lead.
Watch now- https://m.youtube.com/watch?v=
#Deewana #New #Song #TipsMusic #Maarrich #NarendraHirawat #GirishJohar #ShubhanshTiwari #AbhishekSortey #TapasSahoo #CatchTheEvil
गोष्ट एका पैठणीची'साठी सायली, सुव्रतने केली 'ही' गोष्ट
गोष्ट एका पैठणीची'साठी सायली, सुव्रतने केली 'ही' गोष्ट
आपल्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय मिळावा, याकरता प्रत्येक कलाकार हर प्रकारे प्रयत्न करत असतो, अभ्यास करत असतो आणि त्यातूनच ती भूमिका अधिक बहरते. असेच प्रयत्न सायली संजीव आणि सुव्रत जोशीनेही केले आहेत. शंतनू रोडे दिग्दर्शित 'गोष्ट एका पैठणीची'मध्ये सायली संजीवने शिवणकाम करण्याऱ्या गृहिणीची भूमिका साकारली आहे तर सुव्रत जोशीने फुलवाल्याची. या भूमिका दिसताना जरी साध्या, सोप्या दिसत असल्या तरी यासाठी दोघांनीही अभ्यास केला आहे. ज्यामुळे या व्यक्तिरेखा या पात्रांशी हुबेहूब मिळत्याजुळत्या वाटतात. सायलीला कोणतीही भूमिका साकारताना त्या भूमिकेशी एकरूप व्हायला आवडते. तर सुव्रतलाही भूमिकेचा अभ्यास करणे महत्वाचे वाटते.
सायली याबद्दल सांगते, '' या चित्रपटात मी शिवणकाम करणारी साधी गृहिणी आहे, जी आजूबाजूच्या बायकांच्या साड्यांना फॉल बिडिंग करून देते, ब्लाऊज शिवून देते. अभिनयाच्या जोरावर ही भूमिका नक्कीच साकारता आली असती. परंतु त्यात नैसर्गिकता आणण्यासाठी, त्या भूमिकेशी एकरूप होण्यासाठी मी दोन दिवसांचा शिवण क्लास लावला. 'गोष्ट एका पैठणीची’मध्ये मी अतिशय जुन्या काळातील मशीनवर काम करतेय. त्यामुळे मला शिलाई मशीन हाताळणे, सुईमध्ये दोरा भरणे, तेल टाकणे या सगळ्या गोष्टी माहित असणे, गरजचे होते. कुठेही माझा अभिनय अनैसर्गिक वाटू नये, असे मला मनापासून वाटत होते. म्हणूनच कोणालाही कळू न देता मी हा क्लास लावला होता. ज्यामुळे मला शिवणकामातील बारकावे शिकता आले. ज्याचा मला 'गोष्ट एका पैठणीची'मध्ये फायदा झाला. मुळात कोणतीही भूमिका साकारताना त्यात मन ओतून काम केले तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.'' तर सुव्रत जोशी म्हणतो, '' मी एका फुलवाल्याची भूमिका साकारत आहे. वरवर पाहता या भूमिका अगदी सहज करता येण्यासारख्या असल्या तरी यासाठी निरीक्षण आवश्यक आहे. गजरे, हार विणण्याची पद्धत, हाताच्या हालचाली या सगळ्याच गोष्टी आत्मसाद करायच्या होत्या. म्हणूनच मी तासनतास फुलवाल्यांच्या बाजूला उभं राहून त्यांचे निरीक्षण करायचो. जेणे करून ती व्यक्तिरेखा साकारताना त्यात सहजता यावी.''
'गोष्ट एका पैठणीची'ची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता यांनी केली असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता अक्षय विलास बर्दापूरकर, पियुष सिंग, गोल्डन रेशो फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन आहेत. सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
नेहा पेंडसे लवकरच देणार सरप्राईस
नेहा पेंडसे लवकरच देणार सरप्राईस
हिंदी, मराठी अशा दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आज वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या चाहत्यांसाठी एक सरप्राईस घेऊन येणार होती. आपल्या नवीन चित्रपटाची ती घोषणा करणार होती. मात्र आपल्या दमदार अभिनयाने मराठी, हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे या घोषणेची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. रोहित मित्तल दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शार्दूल सिंग बायस, नेहा पेंडसे बायस आणि निखिल महाजन यांनी केली असून चित्रपटाचे लेखन श्रीपाद देशपांडे आणि रोहित मित्तल यांचे आहे. सध्या जरी या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात असले तरी लवकरच ते प्रेक्षकांसमोर येणार आहे.
सगळ्यांचे आभार मानत नेहा पेंडसे म्हणते, '' माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटुंबीयांनी, मित्रमंडळींनी, चाहत्यांनी माझ्यावर जो शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, त्यासाठी मी सर्वांची खूप आभारी आहे. खूप छान वाटते जेव्हा आपल्यावर कोणी इतके प्रेम करते. या खास दिनी मी माझ्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार होते, मात्र सध्या चित्रपटाच्या घोषणेची ही योग्य वेळ नाही असे मला वाटते. आपल्या सर्वांचे लाडके, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे नुकतेच निधन झाले. सिनेसृष्टीने एक उत्कृष्ट कलाकार गमावला आहे. त्यामुळे या घोषणेसाठी आम्ही थोडी प्रतीक्षा करणार आहोत.''
निर्माते निखिल महाजन म्हणतात, '' नेहाच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही आमच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणणार होतो. यापूर्वी मी नेहासोबत 'जून' मध्ये काम केल्याने तिच्या कामाची पद्धत मला माहित आहे. ती एक हरहुन्नरी अभिनेत्री तर आहेच याशिवाय ती उत्तम निर्माती आहे. त्यामुळे तिच्यासोबत आणखी एक नवा प्रोजेक्ट मी करतोय. मात्र ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे आमच्या या नव्या प्रोजेक्टची घोषणा आम्ही लांबणीवर नेली आहे. विक्रम सर आणि माझे अनोखे नाते आहे. 'गोदावरी' आणि आज ज्या चित्रपटाची घोषणा होणार होती, त्या चित्रपटातही विक्रम सरांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आज ते आपल्यात नाही, परंतु त्यांच्या आठवणी आमच्यासोबत कायम असतील. हा नवीन चित्रपट आम्ही त्यांना समर्पित करणार आहोत.''
पहिल्याच दिवशी 'अथांग'ने जिंकली प्रेक्षकांची मनं आतापर्यंतचे सगळे रेकॅार्ड मोडत, ठरली सर्वाधिक पाहिलेली वेबसीरिज
पहिल्याच दिवशी 'अथांग'ने जिंकली प्रेक्षकांची मनं
आतापर्यंतचे सगळे रेकॅार्ड मोडत, ठरली सर्वाधिक पाहिलेली वेबसीरिज
प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झालेली जयंत पवार दिग्दर्शित 'अथांग' ही वेबसीरिज सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या वेबसीरिजचे पहिले दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या रहस्यमय वाड्याचे दरवाजे आता उघडले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी इतकं रेकॅार्ड ब्रेकिंग यश मिळवणारी ही प्लॅनेट मराठी ओटीटीवरील पहिलीच वेबसीरिज ठरली आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी ‘अथांग’ ही वेबसीरिज पाहिली. या वाड्यातील गूढ हळूहळू उडगडत असतानाच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढील भागांची.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहून खूप समाधान वाटले. ‘अथांग’ला प्रेक्षकांची पसंती मिळणार, हे ठाऊक होते. परंतु पहिल्याच दिवशी असा प्रतिसाद मिळणार हे अपेक्षित नव्हते. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आम्हाला असा कॅान्टेन्ट प्रदर्शित करण्याची प्रेरणा मिळते.’’
निर्माती तेजस्विनी पंडित म्हणते, " आज माझ्या मनात काय भावना आहेत, त्या मी शब्दांत व्यक्त करूच शकत नाही. निर्माती म्हणून हा माझा पहिलाच प्रोजेक्ट, त्यामुळे हा माझ्यासाठी सुखावणारा क्षण आहे. मात्र याचे सारे श्रेय ‘अथांग’च्या संपूर्ण टीमला जाते. यामागे सगळ्यांचीच मेहनत आहे. प्रेक्षकांच्या खूप सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आता पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत.’’
'अथांग' या वेबसिरीजमध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी - सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत 'अथांग'चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत.
पैठणी नेसून, मनमोहक अदांनी घायाळ करणार गिरीजा ओक 'गोष्ट एका पैठणीची' मधील ठसकेबाज लावणी प्रेक्षकांच्या भेटीला
पैठणी नेसून, मनमोहक अदांनी घायाळ करणार गिरीजा ओक
'गोष्ट एका पैठणीची' मधील ठसकेबाज लावणी प्रेक्षकांच्या भेटीला
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. ही गोष्ट आहे एका अशा गृहिणीची, जिचे पैठणी घेण्याचे स्वप्न आहे. या सर्वसामान्य स्वप्नाची पूर्तता करताना तिच्या आयुष्यात येणाऱ्या काही अनपेक्षित घटनांचा हा रंजक प्रवास आहे. नुकतीच 'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटातील एक ठसकेबाज लावणी सर्वांच्या भेटीला आली आहे. 'तुमच्यासाठी रेडी राया नेसून पैठणी' असे या गाण्याचे बोल असून बेला शेंडे यांच्या आवाजाने या लावणीला चारचांद लागले आहेत. तर या गाण्याचे बोल आणि संगीत माणिक - गणेश यांचे आहे. गिरीजा ओक -गोडबोले आणि मिलिंद गुणाजी यांच्यावर चित्रित या गाण्यात पैठणीचे सौंदर्य अधोरेखित करण्यात आले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू रोडे म्हणतात, " महाराष्ट्राचे महावस्त्र असणाऱ्या पैठणीचे सौंदर्य प्रत्येकाला भारावणारे आहे. या चित्रपटात 'पैठणी' सुद्धा एक महत्वाची व्यक्तिरेखा आहे. पैठणीचे सौंदर्य आम्ही या लावणीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर बोल असणारी ही लावणी ठेका धरायला लावणारी आहे. गाण्याच्या रेकॅार्डिंगदरम्यान बेलाही खूप एन्जॅाय करून गात होती. त्यामुळे तिला बघून आम्हीही हे गाणं तितकंच एन्जॅाय केले.’’
गायिका बेला शेंडे म्हणतात, ‘’ या गाण्याचे बोल खूप सुंदर आहेत. संगीतही तितक्याच ताकदीचे आहे. त्यामुळे हे गाणे गाताना मलाही खूप मजा आली. हे गाणं गाताना आम्ही एवढी धमाल केली तर प्रेक्षकांना तर हे गाणं नक्कीच ठेका धरायला लावेल.’’
प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' चित्रपटाच्या कथेला साजेसे असे हे गाणे आहे. बेला शेंडे यांचा आवाज आणि माणिक - गणेश यांचे बोल, संगीत लाभलेले हे गाणे खूपच बहारदार आहे. यात अधिक भर पडली आहे ती सुंदर पैठणी नेसलेल्या गिरीजाची. गिरीजाच्या नृत्यानं या लावणीला अजून रंग चढला आहे.''
'गोष्ट एका पैठणीची'ची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता यांनी केली आहे. तर अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता अक्षय विलास बर्दापूरकर, पियुष सिंग, गोल्डन रेशो फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन आहेत. सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सरदेशमुखांच्या वाड्यातील रहस्य आता उलगडणार 'अथांग' ही वेब सिरीज प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित
सरदेशमुखांच्या वाड्यातील रहस्य आता उलगडणार
'अथांग' ही वेब सिरीज प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित
'अथांग'चा ट्रेलर झळकल्यापासून प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. या वाड्यात नक्की काय गूढ दडले आहे, ही अळवत कोण आणि तिचा सरदेशमुखांच्या वाड्याशी काय संबंध? त्या कड्यामागील रहस्य ? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. मात्र आता या प्रश्नांचा उलगडा होणार असून प्लॅनेट मराठी ओटीटीवर जयंत पवार दिग्दर्शित 'अथांग' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. 'अथांग'मध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर आपल्याला दिसणार आहेत.
'अथांग' चे दिग्दर्शक जयंत पवार म्हणतात, " 'अथांग' म्हणजे ज्याचा थांग लागत नाही असे. या वेबसीरिजचीही हीच खासियत आहे. शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही कथा आहे. 'अथांग'चा प्रत्येक भाग क्षणोक्षणी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे. 'अथांग' पाहून झाल्यावरही पुढचे काही दिवस प्रेक्षकांच्या डोक्यात तेच असेल. १९३० आणि १९६०च्या कालखंडात घडणारी ही कथा असून 'अथांग' बघताना आपणही तो काळ जगतोय, अशी जाणीव होईल. हळूहळू यातील एकेक गूढ उलगडत जाईल.''
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''ओटीटीवर प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी पिरिऑडिक ड्रामा आहे. ज्यात रहस्य दडले आहे. हा एक वेगळा विषय आहे. 'अथांग'च्या निमित्ताने तेजस्विनी पंडित पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. तेजस्विनी एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे, हे आपल्याला माहीतच आहे. आता आपल्या इतक्या वर्षांच्या अनुभवाचा उपयोग तिने निर्मिती क्षेत्रातही केला आहे. त्यामुळे अभिनय, तांत्रिक अशा सगळ्याच बाजू तिने उत्तमरित्या सांभाळल्या आहेत. प्लॅनेट मराठी सातत्याने प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणण्याच्या प्रयत्नात असते, त्यामुळे 'अथांग'ची ही वेगळी संकल्पना आम्हाला भावली.''
प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत 'अथांग'चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत.
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
DESIGNER, STYLIST SAAZISH SIDHU’S “STYLE IN THE CITY” Leading light of Indian fashion landscape, Designer, Stylist & Managing Di...
-
Whirlpool India wins prestigious Dun & Bradstreet Corporate Awards 2019 Mumbai , 3rd June, 2019 : Whirlpool India bagged the D...