Friday, January 31, 2025

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ १८ एप्रिलला भेटीला



‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ 

भक्त संप्रदायातील अगदी लहान वयात मान्यता पावलेली देदीप्यमान शलाका म्हणजे संत मुक्ताबाई!

बुद्धिमान, ज्ञानी अशा संतांना आपल्या प्रखर विद्वत्तेने आणि अधिकारवाणीने गुरुमंत्र देऊन ही शलाका तळपती झाली. अशा संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. 

सप्रेम निवृत्ती आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलचरणी ।

-संत चोखामेळा

आदिमाया आदिशक्ती संत मुक्ताईला भेटूया १८ एप्रिल २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात..  अशा कॅप्शनसह आलेल्या या  पोस्टरमधून चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. या पोस्टरमध्ये संत ‘मुक्ताई’ विठूरायाची आराधना करताना दिसते आहे.  

देहरूपाने संपले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताबाईंच्या कार्य व विचारांना जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी मुक्ताई’ने  निभावलेल्या माता ,भगिनी, गुरु अशा विविध भूमिकांचे पदर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहेत. स्त्री-पुरुष भेदापलीकडे जगणे शिकविणाऱ्या संत मुक्ताईंचा खडतर आणि भक्तीरसाने परिपूर्ण जीवनप्रवास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा यासाठी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’  हा वेगळा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात.  

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन  निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

आमिर खानच्या उपस्थितीत रंगला 'इलू इलू’ चित्रपटाचा प्रिमियर

 आमिर खानच्या उपस्थितीत रंगला 'इलू इलू’ चित्रपटाचा प्रिमियर




फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा बॉलीवूड स्टार आमिर खान यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या प्रिमियर सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली.  ‘फाळके या नावातच एक स्पार्क आहे. अतिशय सुंदर चित्रपट अजिंक्य फाळके यांनी केला असल्याचे आमीर खान यांनी यावेळी सांगितले’. चित्रपटाची निर्मीती आणि अजिंक्य फाळके यांच्या दिग्दर्शनाचे मनापासून कौतुक करत चित्रपट पसंतीची पोचपावती आमिर खान यांनी यावेळी दिली. उत्तम कथा असल्यास एखादा मराठी चित्रपट करायला नक्कीच आवडेल असं आमिर खानने याप्रसंगी आवर्जून सांगितलं.   


‘आमिर खान सरांचं मार्गदर्शन या चित्रपटासाठी लाभलं ते आमच्यासाठी मोलाचं होतं. त्यांची ही कौतुकाची थाप आमचा हुरूप  वाढवणारी असल्याचं दिग्दर्शक अजिंक्य फाळके याने यावेळी सांगितलं’.  'इलू इलू’ या चित्रपटाबाबत तरुण वर्गामध्ये विशेष उत्सुकता पहायला मिळतेय. चित्रपटाच्या गाण्यांनी आणि संगीताने याआधीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  ‘इलू इलू’ चित्रपटात बॉलीवूड गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री एली आवराम सोबत वीणा जामकर, आरोह वेलणकर,वनिता खरात, मीरा जगन्नाथ, आनंद कारेकर, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, निशांत भावसार, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार आहेत.

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.  छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार

 भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार




प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांच्या आवाजातील "स्वामी" या गाण्याचे १ मिलीयन व्ह्यूज पूर्ण, गाण सोशल मीडियावर ट्रेंडिंग 

स्वामींचा संदेश तुमच्या आत्मविश्वासाला जागृत करणार भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाणं हृदयस्पर्शी, भावनिक, आणि प्रेरणादायी असून या गाण्यात अभिनेता प्रशांत गवळी, अभिनेत्री पुनम पाटिल, बालकलाकार शंभो आणि गायक अवधूत गांधी हे प्रमुख कलाकार आहेत. हे गाणं सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी गायलं असून ब्रम्हा यांनी या गाण्याच संगीत दिग्दर्शन, गीतरचना, रॅप गायलं आहे. या गाण्याचे दिग्दर्शन मनिष महाजन याने केलं आहे. या गाण्याची निर्मिती प्रशांत गवळी यांनी केली आहे.


गायक अवधूत गांधी 'स्वामी' गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यानचा किस्सा सांगताना म्हणाले, "स्वामी हे गाण प्रदर्शित होताच या गाण्याचे १ मिलियन व्ह्यूज पूर्ण होणे म्हणजेच स्वामींनी दिलेला आशीर्वाद अस मला वाटतं. श्रद्धा असली आणि कष्ट घेतले की देव हा पावतोच असं म्हणतात. मी कोणतही काम करायला जाण्याअगोदर आई वडिलांचा आणि स्वामींचा आशीर्वाद घेतो. या गाण्याच्या रेकॉर्डींगला जाण्याआधी मी आई वडिलांचा आणि स्वामींचा आशीर्वाद घेतला. स्वामींचं स्मरण केलं. गाण्याच्या प्रमोशन दरम्यान काही प्रेक्षक मला भेटले. त्यांना हे गाणं आवडतं आहे. तसचं सोशल मीडियावर गाण्याला नुकतेच १ मिलीयन व्ह्यूज पूर्ण झाले आहेत. त्याबद्दल गाण्यातील सर्व टीमचे अभिनंदन आणि गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार.”


दिग्दर्शक मनिष महाजन ‘स्वामी’ या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, ”स्वामी गाण्याच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये खूप मजा आली. या गाण्याचं चित्रीकरण पुण्यात करण्यात आलं आहे. या गाण्याला फार कमी दिवसात १ मिलीयन व्ह्यूज मिळाले. याचा आनंद तर आहेच पण या गाण्याची प्रोसेस सुरू होती तेव्हापासूनच खूप सकारात्मक वाटतं होतं. मला वाटतं २०२५ वर्षातील आमच्या भैरवा फिल्म्सचं पहिलंच गाण आहे आणि ते ही १ मिलियन पार गेलं आहे. याहून सुंदर काय असू शकतं. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की आमच्यावरचं त्यांचं  प्रेम कायम असचं राहू देत. आणि आम्ही त्यांच्यासाठी नवनविन गाणी लवकरच घेऊन येऊ."

 https://www.youtube.com/watch?v=WY7mogD-o3I

कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आनंद देणारा दिवस - सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

 कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आनंद देणारा दिवस - सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

अभिनेते रमेश देव मार्गाचा नामकरण सोहळा संपन्न


मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी चतुरस्र कामगिरी तब्बल सहा दशके करणारे ज्येष्ठ अभिनेते कै. रमेश देव यांच्या ९६ व्या जयंती दिनानिमित्ताने अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा गौरव करण्यासाठी निर्मिलेल्या ‘मराठी चित्रपट कट्टा’ चे लोकार्पण आणि रस्त्याचे नामकरण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अमित साटम यांच्या संकल्पनेतून हे नामकरण करण्यात आले. 

‘मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते रमेश देव यांची महती खूप आहे, या महान कलाकाराच्या नावाचा मार्ग होणे हे समस्त महाराष्ट्रासाठी आणि कलेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना आनंद देणारा दिवस असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केली. ‘मराठी चित्रपट कट्टा’च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आमदार अमित साटम, नगरसेवक रोहन राठोड  या  प्रत्येकाने आपल्यापरीने केलेलं काम महत्त्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न आज यशस्वी झाले त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.  


याप्रसंगी बोलताना अभिनेते अजिंक्य देव म्हणाले, ‘आज संपूर्ण देव कुटुंबियांसाठी हा स्वप्नपूर्तीचा आणि आनंदाचा दिवस आहे. आज बाबांच्या प्रेमापोटी इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. बाबांच्या नावाचा मार्ग झाला याचा खूप आनंद झाला आहे.  यासाठी मी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, भाजप नेते विनोद तावडे, आमदार अमित साटम, नगरसेवक रोहन राठोड यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या प्रस्तावावर त्यांनी विचार करून पुढाकार घेत यासाठी परवानगी दिली. हे बाबांचे आशीर्वाद आहेत. याचा त्यांना ही निश्चितच आनंद झाला असेल.   

याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ गायिका वैशाली सामंत, दिव्या खोसला कुमार, कांचन घाणेकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Vicky Kaushal and Rashmika Mandanna Launch the First Song ‘Jaane Tu’ From Chhaava in Hyderabad; Composed by A.R Rahman, Vocals By Arijit Singh

 Vicky Kaushal and Rashmika Mandanna Launch the First Song ‘Jaane Tu’ From Chhaava in Hyderabad; Composed by A.R Rahman, Vocals By Arijit Singh

National. 31st  January 2025:  The Academy Award-winning legend A.R. Rahman and India’s most sought-after singer Arijit Singh have reunited  for the song ‘Jaane Tu’ from the, most awaited film Chhaava. This enchanting song, chronicles the eternal bond of Chhatrapati Sambhaji Maharaj and Maharani Yesubai, portrayed by Vicky Kaushal and Rashmika Mandanna respectively. "Chhaava," produced by the visionary Dinesh Vijan and Maddock Films, and directed by the talented Laxman Utekar, brings to life an iconic figure from India's history in a way never seen before. The film is set to roar in theatres on 14th of February worldwide.

 The song was launched in Hyderabad by the starcast amidst their fans and media

The teaser of the song has already garnered an incredible response, and the full track is sure to live up to the hype, delivering an unforgettable experience.  ‘Jaane Tu’ is a song that echoes the sentiments of a bond that has won over odds. A.R. Rahman’s composition carries his trademark brilliance - intricate, otherworldly, yet universal. With poetic lyrics by Irshad Kamil, the song captures the beauty of love with Arijit Singh’s heart touching vocals is all set to create waves of love amongst the audience. Arijit Singh says, “Jaane Tu is divine and sincere. The melody hits right in the centre. I feel blessed that Rahman sir has given me the opportunity I am grateful. I feel his music transcends time and I feel lucky to experience his music. singing this song I felt pure and passionate.”

Director Laxman Utekar shares, “A R Rahman and Arijit Singh’s collaborations have always been more than chartbusters – they’re emotional touchstone for listeners. Jaane Tu promises to be one of those classics—an anthem of love that has been through unimaginable odds. This song is a tribute to the kind of love that moves mountains and stands the test of time. Rahman sir’s music has the rare ability to take you to another plane, and Arijit’s voice grounds that journey in human emotion. Both Rahman Sir and Arijit Singh along with Irshad Kamil’s lyrics elevated the narrative, conveying the pulse of Chhatrapati Sambhaji Maharaj and Maharani Yesubai’s love and sacrifices to be together.”

Lyricist Irshad Kamil says “With Jaane Tu, we wanted to capture a feeling that transcends time—a love so pure, so effortless, that it feels eternal. Collaborating with A.R Rahman is always special as he weaves in emotional depth with his music that turned the lyrics into something more than just words—into a timeless memory, one that would connect with listeners long after they hear it.”

With the brilliant A. R. Rahman composing the music, the film is a celebration of storytelling brilliance. The charismatic Vicky Kaushal stars as Chhatrapati Sambhaji Maharaj, the son of the lion, portraying the legendary leader's unmatched courage and resolve. Opposite him, the intense Akshaye Khanna takes on the role of the formidable Mughal emperor, Aurangzeb, setting the stage for an epic clash of rulers. Adding grace and strength to the story is the versatile Rashmika Mandanna, who brings to life Maharani Yesubai Bhonsale, the Queen of Swarajya and Chhatrapati's queen, embodying elegance and resilience. Music of the film is presented by Sony Music Entertainment India.


Linkfire - Jaane Tu : https://smi.lnk.to/JaaneTu

YouTube: - https://www.youtube.com/watch?v=d6KJkavA8zk

Actors Reveal Their Alternate Career Passions!

 Actors Reveal Their Alternate Career Passions!

Have you ever wondered what your favorite actors would be doing if they weren't in the entertainment industry? It turns out these talented individuals have unique skills and passions that could have led them to completely different career paths! From teaching and singing to dancing, &TV actors share how their alternate professions would still reflect their creativity, dedication, and desire to inspire. Here's a look at the professions they might have pursued if not acting, featuring Neeta Mohindra (Kailasha Bua from Bheema), Sonal Panwar (Malaika from Happu Ki Ultan Paltan), and Shubhangi Atre (Angoori Bhabhi from Bhabiji Ghar Par Hai). Neeta Mohindra, known for her role as Kailasha Bua in Bheema, says, "If I weren’t an actor, I would have fully committed myself to   teaching acting and the art forms that I hold dear. Alongside my acting career, I 've been fortunate to teach students, especially in acting and Kalaripayattu, an ancient Indian martial art that blends discipline, strength, and grace. With a master’s degree in fine arts and a Ph.D. in Tribal Art Forms, I am passionate about preserving and passing on our cultural heritage. Teaching allows me to guide aspiring artists, helping them discover their potential and refine their craft. Had acting not been my main focus, I would have devoted my time entirely to nurturing the next generation of performers, combining my love for art, storytelling, and education into a fulfilling teaching career. "

Sonal Panwar, who plays Malaika in Happu Ki Ultan Paltan, shares, "If I weren’t an actor, I would have pursued a career as a singer. Music has been a constant part of my life since childhood, and I’ve been learning to sing for as long as I can remember. The power of music to express emotions and connect with people deeply resonates with me. Singing brings me immense joy and allows me to convey feelings that words often can’t. I find myself humming tunes or singing my favourite songs during my free time—it’s like therapy for me. If I hadn’t been performing on screen, I would have loved to perform on stage or even teach music, sharing the magic of melodies with others. Singing will always be an integral part of who I am." Shubhangi Atre, known for her portrayal of Angoori Bhabhi in Bhabiji Ghar Par Hai, reveals, "If I hadn’t become an actor, I would have definitely pursued a career as a Kathak dancer and teacher. Dancing has been a part of my life since childhood, and Kathak holds a special place in my heart. The rhythm, expressions, and grace of this classical dance form have always fascinated me. I’ve spent countless hours practicing, and it has brought me immense joy and peace. Teaching Kathak would have been a dream come true, as it would allow me to share my passion for this beautiful art form with others and inspire them to embrace our rich cultural heritage. Even now, whenever I get the chance, I love performing Kathak, and it reminds me of the timeless beauty of Indian classical arts."



Watch their stellar performances in Bheema at 8:30 PM, Happu Ki Ultan Paltan at 10:00

PM, and Bhabiji Ghar Par Hai at 10:30 PM, every Monday to Friday, only on &TV!

Mhatre March Continues as Singams Roar Past Srinagar Ke Veer

 Mhatre March Continues as Singams Roar Past Srinagar Ke Veer

Opener Ketan Mhatre continued to tonk the opposition bowlers out of the mark and captain Sumeet Dhekale came good after missing out in the first two games. The duo’s sensational effort laid the foundation for the Chennai Singams as the in-form team outplayed Srinagar Ke Veer by 18 runs in the Indian Street Premier League (ISPL) Season 2 on Thursday. Riding on Mhatre’s quickfire 37 (21b, 3x4, 2x6) and his two vital contributions of 49 runs for the first wicket with Jagat Sarkar and 38 runs with Dhekale (24, 16b, 4x4) for the second, Chennai Singams crossed the three-figure mark for the second consecutive match to tally 107 for five off its 10 overs at the Dadoji Konddev Stadium in Thane.
The all-round bowling attack then ensured that Sagar Ali and Sanskar Dhyani could not convert their starts into big scores as Srinagar Ke Veer were restricted to 89 for four. The win was the Singams’ second consecuctive victory of the season after opening its account against Bangalore Strikers two days earlier. Mhatre, the destructive opener, and Sarkar started off virtually from where they had left during their 62-run stand against the Strikers. The opening duo was harsh on the Veer bowlers before Sarkar perished in the fifth over – the second and the last over with the ISPL Ball – with the scoreboard reading 49.

Mhatre was then joined by another southpaw Dhekale, the veteran who had unfortunately been unable to get off to a start in the first two games. But with Dhekale timing the ball sweetly, it took the pressure off Mhatre before the opener perished in the ninth over. V. Vignesh’s unbeaten cameo of 14 runs off five balls meant the Singams crossed the hundred-run mark for the second time in three nights. While Vignesh continued his exploits with the ball in hand, left-arm pacer Jignesh Patel – who has been impressive in his debut season – ensured the Srinagar batters did not get off the blocks quickly. As a result, despite being unable to pick wickets, the Singams remained in control of the game all through the second half.
The Singams will take on Tigers of Kolkata on Friday.
Chennai Singams 107/5 in 10 overs (Ketan Mhatre 37; Sumeet Dhekale 24; Manish Waghmare 3/20) bt Srinagar Ke Veer 89/4 in 10 overs (Sagar Ali 25, Sanskar Dhyani 22; Anurag Sarshar 1/16, Jignesh Patel 1/19).

अनिता दाते साकारणार 'जारण'मध्ये साकारणार महत्वपूर्ण भूमिका

  अनिता दाते साकारणार 'जारण'मध्ये साकारणार महत्वपूर्ण भूमिका 'जारण'मधील अनिता दातेच्या पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष  हृषीकेश...