Friday, January 31, 2025

भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार

 भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार




प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांच्या आवाजातील "स्वामी" या गाण्याचे १ मिलीयन व्ह्यूज पूर्ण, गाण सोशल मीडियावर ट्रेंडिंग 

स्वामींचा संदेश तुमच्या आत्मविश्वासाला जागृत करणार भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाणं हृदयस्पर्शी, भावनिक, आणि प्रेरणादायी असून या गाण्यात अभिनेता प्रशांत गवळी, अभिनेत्री पुनम पाटिल, बालकलाकार शंभो आणि गायक अवधूत गांधी हे प्रमुख कलाकार आहेत. हे गाणं सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी गायलं असून ब्रम्हा यांनी या गाण्याच संगीत दिग्दर्शन, गीतरचना, रॅप गायलं आहे. या गाण्याचे दिग्दर्शन मनिष महाजन याने केलं आहे. या गाण्याची निर्मिती प्रशांत गवळी यांनी केली आहे.


गायक अवधूत गांधी 'स्वामी' गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यानचा किस्सा सांगताना म्हणाले, "स्वामी हे गाण प्रदर्शित होताच या गाण्याचे १ मिलियन व्ह्यूज पूर्ण होणे म्हणजेच स्वामींनी दिलेला आशीर्वाद अस मला वाटतं. श्रद्धा असली आणि कष्ट घेतले की देव हा पावतोच असं म्हणतात. मी कोणतही काम करायला जाण्याअगोदर आई वडिलांचा आणि स्वामींचा आशीर्वाद घेतो. या गाण्याच्या रेकॉर्डींगला जाण्याआधी मी आई वडिलांचा आणि स्वामींचा आशीर्वाद घेतला. स्वामींचं स्मरण केलं. गाण्याच्या प्रमोशन दरम्यान काही प्रेक्षक मला भेटले. त्यांना हे गाणं आवडतं आहे. तसचं सोशल मीडियावर गाण्याला नुकतेच १ मिलीयन व्ह्यूज पूर्ण झाले आहेत. त्याबद्दल गाण्यातील सर्व टीमचे अभिनंदन आणि गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार.”


दिग्दर्शक मनिष महाजन ‘स्वामी’ या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, ”स्वामी गाण्याच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये खूप मजा आली. या गाण्याचं चित्रीकरण पुण्यात करण्यात आलं आहे. या गाण्याला फार कमी दिवसात १ मिलीयन व्ह्यूज मिळाले. याचा आनंद तर आहेच पण या गाण्याची प्रोसेस सुरू होती तेव्हापासूनच खूप सकारात्मक वाटतं होतं. मला वाटतं २०२५ वर्षातील आमच्या भैरवा फिल्म्सचं पहिलंच गाण आहे आणि ते ही १ मिलियन पार गेलं आहे. याहून सुंदर काय असू शकतं. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की आमच्यावरचं त्यांचं  प्रेम कायम असचं राहू देत. आणि आम्ही त्यांच्यासाठी नवनविन गाणी लवकरच घेऊन येऊ."

 https://www.youtube.com/watch?v=WY7mogD-o3I

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...