Friday, January 17, 2025

इंडियन आयडॉल 15 मध्ये बादशाहची बहीण अपराजिताने आपल्या लहानपणीच्या हृदयस्पर्शी आठवणी शेअर केल्या

इंडियन आयडॉल 15 मध्ये बादशाहची बहीण अपराजिताने आपल्या लहानपणीच्या हृदयस्पर्शी आठवणी शेअर केल्या

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 15 या लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये ‘भाई-बहन’ विशेष भागात भावंडांच्या प्रेमातील गोडवा साजरा करण्यात येणार आहे. मान्यवर परीक्षक श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाह यांच्या आकर्षक अस्तित्वामुळे आणि त्यांच्यातील खेळकर सांभाषणामुळे वातावरण हलकेफुलके होईल तर स्पर्धक आपल्या व्यक्तिगत कहाण्या सांगून ही रजनी हास्य, भावुक क्षण आणि प्रेमाच्या उमाळ्याने भरून टाकतील.

एका हलक्या फुलक्या क्षणी सर्व जण आंधळी कोशिंबीरीच्या मजेदार खेळात सामील झाले, आणि जेव्हा बादशाहच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती, तेव्हाच त्याचा सुखद धक्का देण्यासाठी त्याची बहीण अपराजिता मंचावर उपस्थित झाली.

लहानपणीची काही गुपिते सांगताना अपराजिताने सांगितले की, बादशाहला घरात प्रेमाने बिट्टू म्हणतात आणि तिचे टोपण नाव कटोरी आहे. तिने सांगितले की बिट्टू पहिल्यापासून त्यांच्या आई-वडीलांचा विशेष लाडका होता. त्याची आणखी एक वाईट सवय तिने सांगितली, ती म्हणजे तो सगळ्या गोष्टींना ‘हो’ म्हणतो आणि मग गडप होऊन जातो.

तिने गंमतीत सांगितले की, बादशाह ‘पार्टी अँथम मेकर’ म्हणून ओळखला जात असला, तरी प्रत्यक्षात तो घरकोंबडा आहे, जो घरात काम करतो किंवा झोपतो. सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही होती की, नववर्षाच्या पूर्व संध्याकाळी तो झोपून राहिला होता!

जेव्हा त्याने आपल्या घरात सांगितले की, त्याला रॅपर व्हायचे आहे, तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया कशी  होती, हे सांगताना ती म्हणाली, आमचे नातेवाईक त्याला म्हणाले होते, “तू हे काय करत आहेस? आपल्या आई-वडीलांशी असे वागू नकोस.” त्यानंतर आपल्या बहिणीला चिडवत बादशाहने एक किस्सा सांगितला. तो सहा वर्षांचा असताना तिने तब्बल 500 रु सोबत घेऊन त्याला बाहेर घेऊन जाण्याचा प्रस्ताव मांडला होता, पण त्यांच्या वडीलांनी त्या दोघांना फटकारले होते. जेव्हा बादशाहने आपल्या वडीलांना हातात बेल्ट घेऊन येताना पाहिले, तेव्हा त्याने आपल्या बहिणीला सोडून तेथून पळ काढला होता. 

एकमेकांची  भरपूर थट्टा-मस्करी करून झाल्यानंतर अपराजिताने सांगितले की तिला आपल्या भावाचा किती अभिमान वाटतो! त्याचा प्रवास, त्याचे यश याविषयी कौतुकाने बोलताना ती म्हणाली, “हा एक खूप मोठा मंच आहे. मला खूप अभिमान वाटतो. तो इकडे या लोकांसोबत (श्रेया आणि विशाल) परीक्षक म्हणून काम करत आहे. आम्ही तुमच्याकडे मोठे स्टार म्हणून बघतो, आणि आज हा माझा भाऊ तुमच्या पंक्तीत बसला आहे.”

बघत रहा इंडियन आयडॉल 15 दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...