Thursday, April 10, 2025

लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’चा ट्रेलर

 लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’चा ट्रेलर

लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित – उत्कंठावर्धक, भावनांनी भरलेला थरारक अनुभव देण्याची हमी

लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सच्या 'देवमाणूस' या पहिल्या मराठी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


मुंबईत पार पडलेल्या भव्य ट्रेलर लॉन्च सोहळ्याला दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर, कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, अभिजीत खांडकेकर, लेखिका नेहा शितोळे तसेच निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. हा क्षण लव फिल्म्सच्या मराठी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

 ट्रेलरमध्ये ‘देवमाणूस’च्या रहस्यपूर्ण, गूढ आणि भावनिक कथानकाची झलक पाहायला मिळते. दमदार अभिनय, दाट भावनांचा प्रवाह आणि उत्कंठा वाढवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असून ‘देवमाणूस’ मराठी प्रेक्षकांमध्ये जागतिक स्तरावर आपली छाप सोडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणतात, “देवमाणूस माझ्यासाठी अत्यंत जवळचा चित्रपट आहे. भावना, नाट्य आणि थरार यांचा सुरेख संगम या चित्रपटात आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. संपूर्ण टीमच्या अथक मेहनतीमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. प्रेक्षक या कथेशी आणि पात्रांशी कसा संवाद साधतात हे पाहाण्याची उत्सुकता लागली आहे.”

निर्माते लव रंजन म्हणाले, “देवमाणूस हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला मनापासून दिलेला आदर आहे. त्यातील कला, संगीत आणि कथा सांगण्याची शैली यांचा सन्मान आहे. मराठी चित्रपटसृष्टीत उंबरठा ओलांडताना, हा केवळ आरंभ नसून दर्जेदार कथा सादर करण्याचा आमचा नवा संकल्प आहे.”


निर्माते अंकुर गर्ग म्हणाले, “देवमाणूस हा लव फिल्म्सच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तेजस देऊस्कर यांचे प्रभावी दिग्दर्शन, तसेच महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि संपूर्ण टीमच्या दमदार कामगिरीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकणार आहे. आम्ही या चित्रपटाचा भाग होण्याचा अभिमान बाळगतो आणि २५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहोत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी अधिक अर्थपूर्ण आणि आकर्षक चित्रपट देण्याचा आमचा निर्धार 'देवमाणूस'मधून अधोरेखित होतो.”

लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’, लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित, हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘गुलकंद’ चित्रपट


 १ मे रोजी ढवळे आणि माने कुटुंब घेऊन येणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’

‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’

येत्या १ मे रोजी ढवळे आणि माने कुटुंब घेऊन येणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’!

मागील काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात होते, त्या ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज आहे.


चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी ढवळे फॅमिली म्हणजेच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांनी स्कुटरवर, तर माने फॅमिली म्हणजे ईशा डे आणि प्रसाद ओक यांनी बुलेटवर शानदार एंट्री घेतली. पुष्पवृष्टीने कलाकारांचे स्वागत करण्यात आले आणि ‘चल जाऊ डेटवर’ या धमाल गाण्यावर कलाकारांनी थिरकत रंगतदार माहोल निर्माण केला.

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सई आणि प्रसाद यांच्या एका खास सीनमुळे प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. आता ट्रेलरमधून “प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं” या प्रसादच्या संवादाने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कथेत ढवळेंची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नासाठी दोन कुटुंबं एकत्र येतात. पण या भेटीत अजून एक वेगळंच नातं निर्माण होतं. आता ढवळे आणि माने कुटुंबांमध्ये काय गोंधळ उडणार? आणि ही गुंतागुंत सुटेल का? याचं उत्तर १ मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहे.


‘गुलकंद’ हा एक हलकाफुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून, नात्यांमधली गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ ट्रेलरमध्ये दिसून येतो. ढवळे-माने कुटुंबांच्या संसारात मुरलेला ‘गुलकंद’ प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव ठरेल, याची खात्री आहे.

चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे.

दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात, “नातं जेव्हा एकसुरी होतं, तेव्हा त्यातला गोडवा टिकवणं महत्त्वाचं ठरतं, आणि हाच गोडवा ‘गुलकंद’ चित्रपटात आहे. प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटेल. आजवर आम्ही अनेक विनोदी प्रोजेक्ट्स केले, पण या चित्रपटात भावना, नाती, प्रेम आणि विनोद यांचा सुंदर संगम आहे. एव्हरेस्टचे संजय छाब्रिया या कुटुंबाचा भाग झाले, हे आमचं भाग्य. ही टीम एकमेकांना ओळखते, त्यामुळे ‘गिव्ह अँड टेक’ अप्रतिम झाला आहे. हाच अनुभव प्रेक्षकांना मिळेल.”

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “‘गुलकंद’ हे आमचं एक खास सिनेमॅटिक गिफ्ट आहे. दर्जेदार आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा चित्रपट आम्ही आणत आहोत. कलाकार, दिग्दर्शक, सगळ्यांनी कमाल काम केलं आहे. मला विश्वास आहे की, प्रेक्षकांना या गोडसर अनुभवाचा नक्कीच आनंद मिळेल.”

Wednesday, April 9, 2025

कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार! च्या मंचावरील सर्वात लहान कीर्तनकार ह.भ.प. यशस्वीताई आडे महाराज

 १२ वर्षाच्या बालकीर्तनकार ..यशस्वीताई आडे महाराज समजावणार कीर्तनाची गोडी बंजारा भाषेतून
 

कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकारच्या मंचावरील सर्वात लहान कीर्तनकार ..यशस्वीताई आडे महाराज


Press Note:

Mumbai, April 9, 2025:

 

सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकारच्या मंचावर वेगवेगळ्या वयोगटाचे अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेतया सहभागी स्पर्धकांमध्ये सर्वात लहान स्पर्धकही आली आहेजिने आपल्या कीर्तनातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेतकीर्तनकारांना उत्तम व्यासपीठ  मिळून देणारा हा मंच आणि  सहभागी  स्पर्धक यांची चांगलीच चर्चा रंगली आहे

कीर्तनाची गोडी  देव निवडी आपण ।।

कोणी व्हारे अधिकारी  त्यासी हरी देईल ।।

आंगी वैराग्याचे बळ  साही खळ जिणावे ।।

उरेल ना उरी  तुका करी बोभाट ।।



तुकाराम
 महाराज म्हणतातदेव स्वतःहून कीर्तन करणाऱ्यांच्या कीर्तनात गोडी आहे की नाही ते ठरवितो  गोडी मिळाल्यास तेथे स्वतःजातीने हजर राहतो अन्यथा  नाही.  आजवर  प्रत्येकाने कीर्तन  ऐकलं  असेल  मात्र  बंजारी  भाषेत  कीर्तन  हे ऐकून सगळ्यांच्या  भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीतसोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकारच्या  मंचावर  सर्वात चिमुरड्या १२ वर्षीय .यशस्वीताई आडे महाराजांचं बंजारा भाषेतलं कीर्तन ऐकण्याची सुवर्णसंधी या शो च्या  निमित्ताने  महाराष्ट्राला उपलब्ध झाली आहेघरातील धामिर्क कार्यक्रमांमुळे  यशस्वीताई आडे लहानपणापासूनच कीर्तनाची गोडी लागलीया मंचावर . यशस्वीताई आडे यांनी बंजारा भाषेतील संत सेवालाल यांचं कीर्तन करून उपस्थित प्रेक्षक आणि परीक्षकांना  मंत्रमुग्ध  केलं. ‘छोटी मुक्ताई’ असा गौरव परीक्षकांनी यावेळी केलासंत नामदेवांचं  कीर्तनही  तिने यावेळी सादर केलं . गुरुवारी हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे

केवळ भाषेच्या बंधनात अडकून  राहता  कीर्तनाचा प्रसार आणि प्रचार वेगवगळ्या भाषांच्या माध्यमातून होत ज्या वयात मनसोक्त खेळायचंबागडायचंआईवडिलांकडे हट्ट करायचा असं यशस्वीताई आडे  हिचं वयमात्रही  चिमुरडी आज आपल्या रसाळ वाणीतून वारकरी संप्रदायाची महती साता समुद्रापार पोहचावी यासाठी प्रयत्न करतेय.

'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार...' हा रिअ‍ॅलिटी शो सोमवार ते शनिवाररात्री .०० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे




Feel the Beat! Get Ready to Groove with the Electrifying Thomkiya!

 Feel the Beat! Get Ready to Groove with the Electrifying Thomkiya!



Tips Music Ltd. and Legacy Collective Roots are set to introduce "Thomkiya", a high-energy dance number that blends infectious rhythms, captivating performances, and a music video brimming with joy and celebration. Launching on March 28, 2025, the song promises to be the season’s most vibrant musical experience.
 
Kumar Taurani, Producer at Tips Music Ltd., shared, "At Tips Music, we aim to create soundtracks that resonate with people’s lives. Thomkiya is a seamless fusion of rhythms and contemporary pop, delivering an energetic and refreshing sound. Collaborating with Legacy Collective has brought a new dimension to the track, and we can’t wait for audiences to experience this joyful creation."
 
Sreekanta Dash, Senior Brand Lead- Domestic Dark Spirits, Bacardi India – “At Legacy Collective, we believe in pushing creative boundaries and celebrating cultural diversity through music. Thomkiya is a perfect blend of tradition and modernity, capturing the vibrancy of Bengali and Hindi pop music. This collaboration has been an exciting journey, and we can’t wait for audiences to experience its infectious energy."
 
Papon, singer and one of the featuring artist commented, "This song is a delightful fusion of contemporary sounds and traditional folk elements that Payal Dev has beautifully incorporated. It carries the charm of the ’90s with its nostalgic melody and heartfelt lyrics, making it a perfect blend of fun, romance, and celebration. The energy and vibrancy in the composition set the mood for a great time, making it an enjoyable experience for listeners."
 
Payal Dev, the music composer and Singer, expressed, "Composing 'Thomkiya' was an exciting creative process. We wanted to create a track that is a blend of modern beats and the rich folk of Bengal that people want to dance, smile, and feel the pure happiness of the moment. The collaboration brought together some of the most talented artists in the industry."
 
Nussrat Jahan, who stars in the music video, said, "The song and video are a perfect representation of joy and energy. 'As an artist, I see this as a beautiful opportunity to showcase the evolving essence of modern Bengali pop culture."
 
Priyank Sharma, also the lead in the video, added, "Working on 'Thomkiya' was an absolute blast. I got the opportunity to showcase & experience a culture that I've not done before which was immensely amazing. The chemistry, the music, and the entire creative process was something I'll always cherish."
 
Directed by Sneha Shetty Kohli, the music video is a vibrant visual experience that complements the track's high-energy soundscape. The song seamlessly blends Hindi and Bengali musical influences, creating a dynamic dance number that celebrates cultural diversity.
 
Thomkiya will be available on all major streaming platforms from March 28, 2025, setting the stage for celebrations across the country.

About TIPS Music Ltd-  Since its establishment in 1988, Tips has consistently invested in music production, amassing an impressive collection of more than 30,000 songs spanning various genres and languages. Committed to crafting music with broad appeal, Tips Music takes pride in delivering high-quality productions. Over the years, our popularity has surged, earning us essential recognition from partners who now consider Tips a vital source of must-have hits for their platforms.

Tuesday, April 8, 2025

वीर मुरारबाजी चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र

 वीर मुरारबाजी चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र

छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत

प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा मिळवली आहे. या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. श्रीरामनवमीच्या निमित्ताने या दोघांचे एक आकर्षक पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ‘वीर मुरारबाजी.. पुरंदरकी युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी  हिंदी चित्रपटात ही जोडी छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केले आहे.


ऐतिहासिक चित्रपटात एकत्रित काम करण्याचा योग या निमित्ताने जुळून आला असून या भूमिकेसाठी आम्ही तितकेच उत्सुक होतो, असं हे दोघे सांगतात. छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका करायला मिळणं आमच्यासाठी खूपच आनंददायी होतं. ज्या उत्तुंग व्यक्तिमत्वांनी आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते, असं प्रांजळ मत या दोघांनी व्यक्त केलं.    


पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ नरवीर मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा ‘वीर मुरारबाजी...पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज होत असून  लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा होणार आहे.

संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ नेत्रदीपक लघुदर्शन सोहळा

 संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ नेत्रदीपक लघुदर्शन सोहळा



हरिनामाच्या गजरात , टाळ-मृदुंगाच्या तालावर फुगड्या खेळत दंग झालेले  कलाकार, वारकऱ्यांच्या पायांनी धरलेला ठेका,  अंभगांच्या स्वरात चिंब  झालेले मायबाप प्रेक्षक, आणि कृतज्ञता सन्मान अशा भक्तिमय  वातावरणात ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या भव्य आध्यात्मिक  चित्रपटाचा नेत्रदीपक लघुदर्शन सोहळा (ट्रेलर) आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला. अल्पावधीतच या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य चित्रपट  १८ एप्रिलला  आपल्या भेटीला येतोय.  रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.  

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती परोपकारी।।

 संत  पंरपरेत संत ज्ञानेश्वर महाराजांचे अद्वितीय योगदान आहे. मराठी भाषेचा अभिमान, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी, तत्त्वज्ञ, संतकवी अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी  अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग सर्वसामान्यांना दाखवला. तसेच आध्यात्मिक समतेचा आधार घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायची सुरुवात केली. ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या तिन्ही भावंडांना आयुष्यभर समाजाकडून वाईट वागणूक मिळाली. परंतु, खचून न जाता त्यांनी आणि त्यांच्या भावंडांनी भागवत संप्रदायाच्या शिकवणीत आपले स्थान निर्माण केले.  या भावंडांच्या संतपणाची महती सांगत मुक्ताईच्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा हा  चित्रपट  आहे.  विश्वाला मांगल्य प्रदान करणाऱ्या या  भावंडांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी  याप्रसंगी सांगितले. 

संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे दिसणार असून संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक हिने साकारली आहे. संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर तर संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी केली आहे. यासोबत  समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासुद्धा  चित्रपटात भूमिका आहेत.

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.



PREETY BHALLA INVITES THE DIVINE SOULS TO A TRANSCENDENTAL JOURNEY WITH HER NEW MASTERPIECE – FAKIRI

 PREETY BHALLA INVITES THE DIVINE SOULS TO A TRANSCENDENTAL JOURNEY WITH HER NEW MASTERPIECE – FAKIRI

Watch the song here- https://youtu.be/Q_3iWYmZM7k?si=Q1zosiDfY7puSE68 

An ode to the soul’s eternal quest for oneness, cloaked in the mystique of Sufi fervour

The ethereal voice that has long echoed through the corridors of spiritual devotion and musical excellence, Preety Bhalla, returns with her latest offering, “Fakiri,” a soul-stirring symphony for seekers of light, truth, and transcendence.


This Sufi song, composed and sung by Preety Bhalla, brings the timeless poetry of Sant Kabir Das to life with a fresh twist. It blends deep spiritual verses with trippy vibes, groovy rhythms, and new-age electronic sounds. This unique mix appeals to both modern youth and lovers of timeless classics who cherish depth, devotion, and rich musical heritage  bridging generations through rhythm and wisdom.



With celestial melodies entwined with Preety Bhalla’s mesmerising vocals, Fakiri transports listeners into a realm where the self dissolves, and only love remains. The lyrics, steeped in mysticism and longing, echo the teachings of the great Sufi saints – where the annihilation of ego births the true awakening. It is a ballad of divine madness, of losing oneself only to be found by the Beloved.

Speaking of her latest creation, Preety Bhalla shares“Fakiri is a feeling, a way of life. It is my humble tribute to the path of divine love, of living beyond material illusions, and embracing the ecstatic truth of the soul’s journey” 

From the first note to the last breath of the track, Fakiri unfurls like a silken prayer – powerful, gentle, and profound. This musical sanctum resonates with the fragrance of Ishq-e-Haqiqi (divine love)

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...