१२ वर्षाच्या बालकीर्तनकार ह.भ.प. यशस्वीताई आडे महाराज समजावणार कीर्तनाची गोडी बंजारा भाषेतून
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार! च्या मंचावरील सर्वात लहान कीर्तनकार ह.भ.प. यशस्वीताई आडे महाराज
Press Note:
Mumbai, April 9, 2025:
सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' च्या मंचावर वेगवेगळ्या वयोगटाचे अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. या सहभागी स्पर्धकांमध्ये सर्वात लहान स्पर्धकही आली आहे, जिने आपल्या कीर्तनातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कीर्तनकारांना उत्तम व्यासपीठ मिळून देणारा हा मंच आणि सहभागी स्पर्धक यांची चांगलीच चर्चा रंगली आहे
कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ।।
कोणी व्हारे अधिकारी । त्यासी हरी देईल ।।
आंगी वैराग्याचे बळ । साही खळ जिणावे ।।
उरेल ना उरी । तुका करी बोभाट ।।
केवळ भाषेच्या बंधनात अडकून न राहता कीर्तनाचा प्रसार आणि प्रचार वेगवगळ्या भाषांच्या माध्यमातून होत ज्या वयात मनसोक्त खेळायचं, बागडायचं, आईवडिलांकडे हट्ट करायचा असं ह. भ. प. यशस्वीताई आडे हिचं वय. मात्र, ही चिमुरडी आज आपल्या रसाळ वाणीतून वारकरी संप्रदायाची महती साता समुद्रापार पोहचावी यासाठी प्रयत्न करतेय.
'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार...' हा रिअॅलिटी शो सोमवार ते शनिवार, रात्री ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST