'सिंघम' अजय देवगणसह अवघ्या बॉलिवूडला लव फिल्म्सच्या 'देवमाणूस'ची भुरळ
ट्रेलर शेअर करत दिल्या शुभेच्छा
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेजस देऊस्कर दिग्दर्शित 'देवमाणूस' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतूनही या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगणलाही या ट्रेलरने भुरळ घातली आहे. आपल्या सोशल मीडियावर ट्रेलर पोस्ट करत त्याने निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या मराठीतील पदार्पणाबद्दल अभिनंदन करत, ट्रेलर खूपच उत्कंठावर्धक आहे, देवमाणसाची सटकली की काय होते...?, असे म्हणत संपूर्ण टीमला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर राजकुमार राव, अर्जुन कपूर, सनी सिंग यानेही या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.
लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांच्या भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST