विप्रोने घोषित केले 31 मार्च 2025 रोजी समाप्त
होणाऱ्या तिमाहीचे परिणाम
Q4’25 मध्ये निव्वळ उत्पन्न QoQ 6.4% वाढले, तर FY’25 मध्ये ते YoY 18.9% वाढले
Q4 मार्जिन 17.5% असून ते YoY 1.1% वाढले आहे
लार्ज डील बुकिंग YoY 48.5% वाढले आहे
बंगळूर, भारत – 16 एप्रिल 2025: विप्रो लिमिटेड (NYSE: WIT, BSE: 507685, NSE: WIPRO) या आघाडीच्या टेक्नॉलॉजी सेवा आणि कन्सल्टिंग कंपनीने 31 मार्च 2025 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी इंटरनॅशनल फायनॅनष्यल रीपोर्टिंग स्टँडर्ड्स (IFRS) अंतर्गत आपले आर्थिक परिणाम घोषित केले आहेत.
1. एकंदर उत्पन्न 22,500 कोटी रु. ($2,634.2 मिलियन1) आहे, यात QoQ 0.8% आणि YoY 1.3% वाढ झाली आहे.
2. या तिमाहीचे निव्वळ उत्पन्न 3570 कोटी रु. ($417.8 मिलियन1) आहे, जे QoQ 6.4% आणि YoY 25.9% वाढले आहे.
3. एकंदर बुकिंग्ज3 $3,955 मिलियन आहेत. लार्ज डील बुकिंग्ज4 $1,763 मिलियन असून ती स्थिर चलनात2 48.5% वाढली आहेत.
4. या तिमाहीसाठी IT सेवांचे ऑपरेटिंग मार्जिन5 17.5% असून ते QoQ स्थिर आहे तर त्यात YoY 1.1% वाढ झाली आहे.
5. या तिमाहीसाठी प्रती शेअर उत्पन्न 3.4 रु ($0.041) असून त्यात QoQ 6.2% आणि YoY 25.8% वाढ झाली आहे.
विप्रोने आज जाहीर केले की, 31 मार्च 2025 रोजी समाप्त होणाऱ्या तिमाहीत कंपनीने 22,500 कोटी रु. ची एकूण प्राप्ती केली आहे आणि 3,570 कोटी रु. नफा कमावला आहे. या तिमाहीसाठी IT सेवा मार्जिन 17.5% आहे, जे YoY आधारावर 1.1%ने वाढले आहे. या तिमाहीत, कंपनीने $1,763 मिलियन ची मोठी डील्स बुक केली, जी स्थिर चलनात YoY 48.5% जास्त आहेत.
CEO आणि मॅनिजिंग डायरेक्टर श्रीनि पल्लीया म्हणाले, “दोन भली मोठी डील्स जिंकून, लार्ज डील्स बुकिंग्जमध्ये वाढ करून, आमच्या श्रेष्ठ खात्यांत वाढ करून आणि अर्थात ग्राहकांचा संतोष आणखी वाढवून आम्ही या वर्षाचे समापन केले. शिवाय, आमच्या लोकांमध्ये गुंतवणूक करण्याचे चालू ठेवत आणि कन्सल्टिंग आणि AI क्षमता वाढवत आम्ही मार्जिन सुधारली. मॅक्रो एनव्हायर्नमेंटमधील आत्यंतिक अनिश्चिततेमुळे ग्राहक सावध असल्याने आमचे लक्ष निरंतर लाभदायक वृद्धीसाठी प्रयत्न करत असतानाच त्यांना या कालावधीत मार्गदर्शन करण्यावर आहे.”

No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST