राम कृष्ण हरी 🚩
माऊली,
आपल्या महाराष्ट्राला संगीताचा जो महान वारसा पूर्वापार लाभला आहे, त्यातलं वारकरी संगीताचं योगदान फार मोलाचं आहे. त्यामुळे ही मौल्यवान परंपरा जपत संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात तब्बल १२ अभंगांची योजना करण्यात आली आहे.
हे संगीत सगळ्या महाराष्ट्राचे आहे. आणि महाराष्ट्र पांडुरंगाच्या पायी आम्ही हे संगीत दि. १२ एप्रिल २५ रोजी सायंकाळी अर्पण करण्याचे योजले आहे. या भव्य कार्यक्रमात आपल्याला भेटणार आहेत अनेक संत, प्रकटणार आहेत चांगदेव, आपण साक्षीदार होणार आहोत ७ नामवंत गायकांच्या सुरातून साकारणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीचे...
या माऊली या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होऊया.
दि. १२ एप्रिल २०२५
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर , मुंबई
वेळ : दुपारी ३ वाजता
|| पंढरीनाथ भगवान की जय ||
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST