Friday, April 25, 2025

वारसा विश्वासाचा - स्टॉक ब्रोकिंगमधील एचडीएफसी सिक्युरिटीजची 25 वर्षे

 वारसा विश्वासाचा - स्टॉक ब्रोकिंगमधील एचडीएफसी सिक्युरिटीजची 25 वर्षे

 

·         एचडीएफसी सिक्युरिटीजने ठरवलेल्या कठोर मानकांनुसार, शाश्वत वाढीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या 25 परिवर्तनकारी गुंतवणूक शिफारसी

 

·         आर्थिक साक्षरता वाढवण्याच्या उद्देशाने संपूर्ण भारतात 'नो युअर मनी' हा सीएसआर उपक्रम सुरू केला.

 

o   अंमलबजावणी भागीदार म्हणून वॅगन्स स्किल फाउंडेशन, एम्पॉहर फाउंडेशन आणि अ‍ॅक्सेस लाईव्हलीहूड्स फाउंडेशनसोबत भागीदारी.

 

o   देशभरातील वंचित समुदायांना लक्ष्य करून जवळपास 25 दशलक्ष व्यक्तींना आर्थिक साक्षर करण्याचे ध्येय.

 

मुंबई, 25 एप्रिल 2025 : भारतातील आघाडीच्या स्टॉक ब्रोकरपैकी एक असलेल्या एचडीएफसी सिक्युरिटीज स्टॉक ब्रोकिंग उद्योगातील आपला 25वा वर्धापन दिन अभिमानाने साजरा करत आहे. गेल्या काही वर्षांत कंपनी भारतातील पहिली पारंपरिक स्टॉक ब्रोकिंग फर्म ते नवोपक्रमाने प्रेरित डिजिटल-फर्स्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित झाली आहे. या संपूर्ण प्रवासात, एचडीएफसी सिक्युरिटीजने तंत्रज्ञान आणि ग्राहक अनुभवात धोरणात्मक गुंतवणूक केली - ज्यासाठी इन्व्हेस्टराईट ऍप आणि एचडीएफसी स्काय - विशेषतः तरुण, डिजिटली जाणकार गुंतवणूकदारांसाठी डिझाइन केलेले मोबाइल-फर्स्ट डिस्काउंट ब्रोकिंग प्लॅटफॉर्म लाँच करून दिले आहे.

2000 मध्ये स्थापनेपासून, एचडीएफसी सिक्युरिटीजने उल्लेखनीय वाढ अनुभवली आहे, सातत्याने नवीन टप्पे गाठले आहेत. कंपनीचे ब्रोकरेज उत्पन्न 1,260 कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहे. जे सुरू झाल्यापासून अंदाजे 3.5 कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेने वाढले आहे. त्याचप्रमाणे, एकूण उत्पन्नात प्रभावी वाढ दिसून आली आहे, ज्यामुळे आर्थिक वर्षाच्या अखेरीस 3,265 कोटी रुपये झाले आहेत, जे 25 वर्षांपूर्वी 7.7 कोटी रुपये एवढे होते.


संस्थेने तिच्या नफ्यात लक्षणीय आणि सातत्यपूर्ण सुधारणा देखील साध्य केल्या आहेत, करानंतरचा नफा (PAT) हा 1,125 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे आणि प्रति शेअर कमाई (ईपीएस) 638 च्या सर्वकालीन उच्चांकावर आहे. गेल्या 25 वर्षांत एकूण ग्राहकसंख्या सातत्याने वाढत आहे, जी आता 6.8 दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या प्रगतीत ग्राहककेंद्रितता ही एक मध्यवर्ती थीम आहे. भौगोलिक विस्ताराकडे लक्ष देण्याऐवजी, कंपनीने ग्राहकांशी संबंध अधिक दृढ करण्यावर आणि त्यांच्याशी संवाद वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच 31 मार्च 2019 रोजी असलेल्या 278 शाखांवरून त्यांची संख्या 31 मार्च 2025 रोजी 134 शाखांवर आली आहे. व्यवस्थापन तसेच लवचिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्णता आणि डिजिटल उपायांमध्ये गुंतवणूक करून तसेच ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या 3,647 पर्यंत वाढवली.

 

भारतातील गुंतवणुकीच्या संधींचे लोकशाहीकरण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, 25 परिवर्तनीय गुंतवणूक कल्पनांचा समावेश असलेला एक महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध करताना एचडीएफसी सिक्युरिटीजला आनंद होत आहे. हा व्यापक दस्तऐवज गुंतवणूकदारांना सक्षम बनवण्यासाठी आणि देशभरात आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी कंपनीच्या समर्पणावर भर देतो.

 

अहवालात अंदाजे 250 स्टॉकच्या विस्तृत विश्वातून 25 स्टॉकची बारकाईने निवड केली आहे. हे स्टॉक पुढील 3-5 वर्षांमध्ये त्यांच्या मजबूत वाढीच्या क्षमतेसाठी आणि शाश्वततेसाठी निवडले गेले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीज एका कठोर निवड प्रक्रियेवर भर देतात जी बॅलन्स शीटची गुणवत्ता, व्यवस्थापन अखंडता आणि कॉर्पोरेट प्रशासनाला प्राधान्य देते. यातील प्रत्येक शिफारस ही विविध क्षेत्रांमध्ये आणि भांडवलीकरणात मार्केट वैविध्यपूर्ण आहे याची खात्री करून घेते. ज्यामुळे एकाग्रता जोखीम कमी होते.

 

एचडीएफसी सिक्युरिटीजने त्यांच्या प्रमुख कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रम, "नो युअर मनी" लाँच करण्याची घोषणा यावेळी केली. हा अनोखा उपक्रम लाखो भारतीयांना आर्थिक साक्षरता आणि त्यांच्या समावेशनाला प्राधान्य देतो. तसेच वंचित समुदायांना सक्षम करण्याचे त्याचे ध्येय आहे. प्रभावी शिक्षण, जागरूकता मोहिमा आणि नावीन्यपूर्ण डिजिटल साधनांच्या मिश्रणासह, "नो युअर मनी" चे उद्दिष्ट संपूर्ण देशभरात आर्थिक लवचिकता निर्माण करणे आणि आर्थिक जागरूकता वाढवणे आहे.

 

25 प्रमुख स्टॉकवर प्रकाश टाकणाऱ्या या अहवालात, भारताच्या आर्थिक मार्गाशी सुसंगत दीर्घकालीन वाढीच्या संधींचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना एक महत्त्वाचे साधन देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हे प्रयत्न आमच्या ग्राहकांना समृद्ध आर्थिक भविष्याचे  मार्गदर्शन करण्याच्या एचडीएफसी सिक्युरिटीजच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते,” असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ श्री. धीरज रेल्ली म्हणाले.

 

आर्थिक साक्षरता ही आर्थिक सक्षमीकरणाची आधारशीला आहे, हे आम्ही जाणतो आणि आमच्या ‘नो युअर मनी’ या उपक्रमाद्वारे, आम्ही आर्थिक समज आणि समावेशातील अंतर भरून काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत. माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधनांनी व्यक्तींना सुसज्ज करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. भारताला आर्थिकदृष्ट्या लवचिक करण्यासोबतच देशभरातील समुदायांमध्ये अर्थपूर्ण प्रभाव पाडण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर हा उपक्रम भर देतो,” असे श्री. रेल्ली पुढे म्हणाले.

 

'नो युअर मनी' उपक्रमात एक व्यापक आर्थिक साक्षरता कार्यक्रम समाविष्ट आहे, जो ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. यात बँकिंग, गुंतवणूक आणि निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन यासारख्या मूलभूत विषयांचा समावेश आहे. या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी, एचडीएफसी सिक्युरिटीजने वॅगन्स स्किल फाउंडेशन, एम्पॉहर फाउंडेशन आणि अ‍ॅक्सेस लाईव्हलीहूड्स फाउंडेशन या तीन प्रतिष्ठित संस्थांसोबत भागीदारी केली आहे. वॅगन्स स्किल फाउंडेशनने राष्ट्रीय स्तरावर आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक अत्याधुनिक ऍप आणि वेब-आधारित लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (एलएमएस) विकसित केले आहे. एम्पॉहर फाउंडेशनने महाराष्ट्रात तळागाळात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे, 500 शाळांमधील 1,000 हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. राज्यभरातील वर्गखोल्यांमध्ये हे शिक्षक खास करून तयार केलेले आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबवत. याव्यतिरिक्त, अ‍ॅक्सेस लाईव्हलीहूड्स फाउंडेशन ही संस्था समुदाय-आधारित उपक्रम राबवते, ज्याचे उद्दिष्ट विविध राज्यांमधील 10 लाखांहून अधिक व्यक्तींना शिक्षित करण्यासाठी 300 हून अधिक 'डिजिटल सखी' प्रशिक्षित करणे, हे आहे.

 

जानेवारी 2025 मध्ये लाँच झाल्यापासून, 'नो युअर मनी' ने अनेक उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत. आर्थिक साक्षरता मॉड्यूल आता हिंदी आणि इंग्रजीसह 10 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत. आर्थिक समावेशन ऍप यशस्वीरित्या सुरू करण्यात आले आहे आणि सरकारी शाळांमधील 50,000 हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. पुढील आर्थिक वर्षात 2,50,000 व्यक्तींपर्यंत पोहोचण्याची योजना आहे. देशभरातील 2.5 कोटी लोकांना याचा फायदा करून देण्याचा या उपक्रमाचा मानस आहे.

 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...