Tuesday, August 26, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठी चित्रपट ‘अरण्य’च्या पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. अमोल दिगांबर करंबे लिखित व दिग्दर्शित हा चित्रपट सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणारी प्रभावी कहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ‘अरण्य’ हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहांत येणार आहे.


सामान्य कुटुंबातील एका बापाची आणि त्याच्या मुलीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात एका नक्षलवाद्याच्या आयुष्यातील मानवी पैलू आणि त्याचे आपल्या लहान मुलीशी असलेले नाते प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.

एस. एस. स्टुडिओ निर्मित आणि एक्सपो प्रेसेंट या चित्रपटाची निर्मिती शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी केली असून, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे फेम हार्दिक जोशी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत हिृतीका पाटील, वीणा जगताप, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, अमोल खापरे आणि चेतन चावडा यांच्याही भूमिका आहेत. आदिवासी लोककलेवर आधारित संगीत या चित्रपटाची खासियत असून, प्रेक्षकांना अस्सलपणा सोबत सिनेमॅटिक अनुभव देखील देईल.


यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सिनेमात परिवर्तनाची कथा सांगण्याची ताकद आहे. ‘अरण्य’ हा अशा लोकांचा प्रवास दाखवतो, ज्यांनी हिंसेऐवजी शिक्षण आणि शांततेचा मार्ग स्वीकारला. हा चित्रपट प्रेक्षकांवर नक्कीच प्रभाव टाकेल, असा मला विश्वास आहे. यांची 'एक तिकीट, एक वृक्ष ' लावायची ही संकल्पना मला विशेष भावली.'' 


चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांनी सांगितले, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चे पोस्टर अनावरण होणे हा आमच्या टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. हा चित्रपट महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहातील सिनेमापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मनापासून केलेला प्रयत्न आहे.”

वडापाव'मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी प्रसाद ओक यांच्या अभिनयाची ‘शतकपूर्ती’

 वडापाव'मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी प्रसाद ओक यांच्या अभिनयाची ‘शतकपूर्ती’

वडापाव म्हटलं की जिभेला पाणी सुटतं. वडा जसा तिखट-चुरचुरीत असतो तसंच नात्यांमध्येही गोडवा आणि तिखटपणा असला तरच ती नाती खरी रंगतदार होतात. अगदी हाच अनुभव देणारा कौटुंबिक चित्रपट 'वडापाव' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाल टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून टीझरवरून हा चित्रपट एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असणार हे स्पष्ट होतंय. ही रुचकर पाककृती प्रसाद ओक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रसाद ओक यांच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट असल्यामुळे ते पहिल्यांदाच एकाच वेळी दिग्दर्शक आणि अभिनेते अशा दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे हा प्रवास अधिकच संस्मरणीय ठरणार आहे.

टीझर अत्यंत सुटसुटीत आहे. धमाल मनोरंजन आणि कौटुंबिक मूल्यांचा संगम असलेली ही कथा प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनर अंतर्गत, प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटाचे अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत. तर सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल असून संजय मेमाणे हे चित्रपटाचे छाया दिग्दर्शक आहेत. तर सिद्धार्थ साळवी यांनी चित्रपटाचं लेखन केले आहे.

दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, ‘’ 'वडापाव' एक अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतेच. हाच आमच्या चित्रपटाचा गाभा आहे. कुटुंब, त्यांच्या नात्यांतील गोडवा-तिखटपणा आणि त्यातून मिळणारा भावनिक व विनोदी अनुभव अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडावा, असाच आमचा प्रयत्न आहे.’’


निर्माते अमेय खोपकर म्हणतात, ''मराठी प्रेक्षक कौटुंबिक चित्रपटांवर नेहमी प्रेम करतात. ‘वडापाव’ ही कथा त्यांच्या मनात नात्यांची खरी चव रुजवेल. टीझरवरूनच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आलं, हेच आमचे पहिले यश आहे. हा सिनेमा हसवणार, रडवणार आणि विचार करायलाही लावणार.'' 

निर्माते निनाद बत्तीन म्हणतात, ‘’ वडापावचा जसा घरातील तीन पिढ्या मनसोक्त आस्वाद घेतात तसाच आमचा चित्रपट ‘वडापाव’ तीन पिढ्यांची गोष्ट सांगतो. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे. तो घराघरांत पोहोचेल आणि लोकांना आवडेल यात शंका नाही.’’

निर्माते अमित बस्नेत म्हणाले, ''मी मुळात नेपाळचा असून मला मराठी संस्कृती, खाद्यपदार्थ, साहित्य, कला यांबद्दल नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. यापूर्वी मी ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाची निर्मिती केली होती आणि आता ‘वडापाव’ची निर्मिती करत आहे. मराठी खाद्यपदार्थ हे मुळात भावनांशी जोडले गेलेले आहेत. वडापाव त्यापैकीच एक. जीवनात आपुलकीसोबत थोडा तिखटपणा हवाच. नाहीतर नातं फिकं पडतं. हाच बॅलन्स दाखवणारा हा चित्रपट आहे. टीझर पाहूनच प्रेक्षकांना जाणवलंय की, ही कथा अगदी त्यांच्या घरासारखीच आहे. ओळखीची, तरीही नव्या चवीची.''

पर्वतांच्या कुशीत सुरू होणार ‘मना’चे श्लोक’ चा प्रवास १० ॲाक्टोबरला होणार प्रदर्शित

 पर्वतांच्या कुशीत सुरू होणार ‘मना’चे श्लोक’ चा प्रवास १० ॲाक्टोबरला होणार प्रदर्शित 

आयुष्य हा एक प्रवास आहे, कधी सोपा, कधी कठीण, तर कधी भावनांनी भरलेला. या प्रवासाला पर्वतांची साथ आणि मनाच्या नात्यांची ऊब मिळाली तर तो प्रवास खास ठरतो. अशीच एक वेगळी गोष्ट ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात मनवा आणि श्लोक यांचा प्रवास दाखवला असून, त्यात त्यांची नाती, विचार आणि स्वप्नं यांचा सुंदर संगम दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये ते दोघे पर्वतांच्या दिशेने चालत निघाल्याचं दिसत असून, त्यांचे पाठमोरे रूप या प्रवासाच्या कहाणीची उत्सुकता वाढवतं. या प्रवासात त्यांचं प्रेम फुलणार का, त्यांच्या सोबत आणखी कोण असेल, ते काय मागे सोडून आले आहेत आणि डोंगर त्यांना कोणत्या नव्या दिशेने नेत आहेत, हे जाणून घेणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे.

या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब यांची भूमिका आहे.

‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून, याचे लेखन व दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा असून, हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स व नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांनी सादर केला आहे.

कोकणच्या लाल मातीत , मनात कोरला जाणारा ‘दशावतार’ संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

                                      कोकणच्या लाल मातीत , मनात कोरला जाणारा ‘दशावतार’                                      संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!


स्टुडिओज प्रस्तुत ‘दशावतार’ या बहुचर्चित चित्रपटाबाबत असाच अनुभव सध्या येत आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ येथील काही निसर्गप्रेमी रसिक प्रेक्षकांनी आपल्या मनातील उत्साहाला आकार देत कुडाळच्या लाल मातीवर तब्बल चाळीस फुटी ‘दशावतार’ ही अक्षरे रेखाटली. या अनोख्या उपक्रमातून प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेली आगळी-वेगळी मानवंदना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. यातून चित्रपटाबद्दलचा उत्साह आणि आत्मीयता किती खोलवर रुजली आहे याची प्रचिती येत आहे. 

एखादी कलाकृती किंवा एखादा चित्रपट खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात तेव्हा घर करतो ,जेव्हा सर्वसामान्य लोक आपल्या पद्धतीने त्याचा गौरव करतात, त्याची चर्चा करतात आणि त्या कलाकृतीशी एक आत्मीय नातं जोडतात. झी 

 कुडाळच्या निसर्गरम्य वातावरणात स्थानिकांनी ‘दशावतार’ कोरून आपला चित्रपटाबद्दलचा उत्साह व्यक्त केला. या उपक्रमाविषयीच्या भावना सांगताना त्यांनी म्हटले, ''या चित्रपटाची आम्ही आतुरतेने वाट पाहात आहोत. त्यामुळेच ही आगळीवेगळी कल्पना आमच्या मनात आली. निसर्गाच्या जवळ नेणारा हा चित्रपट  असल्याने त्याला निसर्गाच्या मातीतूनच मानवंदना द्यावी,असे आम्हाला वाटले आणि त्यातूनच या उपक्रमाला आकार मिळाला.'' 

महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात, गणेशोत्सवासोबतच दशावतार ही कलापरंपरा दिमाखात साजरी केली जाते. या सांस्कृतिक परंपरेला मोठा सलाम करत ‘दशावतार’ हा भव्य मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांसारख्या दिग्गज कलाकारांची भक्कम फौज लाभली आहे. तसेच या चित्रपटात विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती सुबोध खानोलकर यांनी केले आहे. गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीतलेखन केले आहे. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. तसेच सुजय हांडे, ओंकार हांडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मृणाल सहस्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे व अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत. येत्या १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नात्यांच्या संघर्षाची कथा उलगडणार 'अरण्य' उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित

                                                    नात्यांच्या संघर्षाची कथा उलगडणार 'अरण्य'                                                उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित 

गडचिरोलीच्या जंगलाचा विचार केला की, मनात दाट हिरवाई, अरण्याची भीतीदायक शांतता आणि तिथे दडलेला संघर्ष डोळ्यांसमोर उभा राहतो. या जंगलात अनेक कथा जन्माला येतात. काही भयावह, काही हृदयाला भिडणाऱ्या. याच पार्श्वभूमीवर आता मोठ्या पडद्यावर एक नवी कहाणी येत आहे. 'अरण्य' हा चित्रपट प्रेक्षकांना जंगलाच्या कठीण वास्तवाशी तसेच मानवी नात्यांच्या गुंतागुंतीशी समोरासमोर आणणार असून या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात हार्दिक जोशीची दमदार उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेतेय.  

टिझरच्या सुरुवातीलाच त्याने ‘जंगलचा वाघ’ म्हणून स्वतःला संबोधले आहे. 'बंदूक हीच माझी ओळख आहे', असे तो ठामपणे बोलताना दिसतो आणि त्यामुळे तो नक्षलवादी असल्याचे स्पष्ट होते. मात्र त्याच्या आयुष्यात मुलगी आल्यावर सर्वकाही बदलल्याचेही तो बोलत आहे. पुढे टिझरमध्ये त्याच्या मुलीच्या हातातही बंदूक दिसत असून, ती वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवते का, की या कारणामुळे कुटूंब जंगल सोडून जाणार, हा प्रश्न उभा राहतो. या प्रश्नांची उकल येत्या १९ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर होणार आहे.


एस एस स्टुडिओ निर्मित, अमोल दिगांबर करंबे लिखित व दिग्दर्शित या चित्रपटात हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा आणि चेतन चावडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर शरद पाटील आणि अंजली पाटील निर्माते आहेत. गडचिरोलीच्या दाट जंगलात प्रत्यक्ष चित्रित झाल्यामुळे चित्रपटात प्रेक्षकांना अस्सल विदर्भी लहेजा आणि वातावरण अनुभवायला मिळणार आहे.


दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे म्हणतात, '''अरण्य' ही केवळ एका नक्षलवाद्याची कथा नाही, तर नात्यांमधील गुंतागुंत आणि जंगलातील संघर्षाचे वास्तव दर्शन घडवणारी कहाणी आहे. आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण प्रत्यक्ष गडचिरोलीच्या जंगलात केले असून तेथील वातावरणाने या कथेला अधिक प्रामाणिकपणा दिला आहे. कलाकारांनी भूमिकेत जीव ओतून काम केले असून त्यांची केमिस्त्री प्रेक्षकांना भावेल, असा मला विश्वास आहे.''

निर्माता शरद पाटील म्हणाले, ''अरण्य'ची खासियत म्हणजे त्याची मांडणी आणि अस्सलपणा. हा केवळ अ‍ॅक्शन वा ड्रामा चित्रपट नाही, तर जीवनातल्या नात्यांच्या प्रश्नांना भिडवणारी कथा आहे. प्रेक्षकांना जंगलाच्या वातावरणासोबत एक वेगळी संवेदना अनुभवायला मिळेल. म्हणूनच हा चित्रपट सर्वांनी नक्की पाहावा, असे आम्हाला मनापासून वाटते.''

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ अलिबागमध्ये चित्रीकरण सुरु महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिक्षणातील बदल, मराठी शाळांची घटणारी संख्या आणि मातृभाषेतून होणाऱ्या जडणघडणीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा अलिबाग येथे महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग उपस्थित होते. यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या, ''आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीत शाळेचे मोठे योगदान असते. मातृभाषेतून होणारे शिक्षण विद्यार्थ्यांच्या संस्कारांवर खोलवर परिणाम करणारे आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटातून समाजाला योग्य संदेश मिळेल आणि तो विचार करायला लावणारा ठरेल. रायगड जिल्ह्यात या चित्रपटाचा मुहूर्त होत असल्याचा मला विशेष अभिमान आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे व निर्मात्या क्षिती जोग नेहमीच समाजाला आरसा दाखवणारे आशयसंपन्न चित्रपट सादर करत असतात. त्यांचा हा नवीन चित्रपटही नक्कीच मनाला स्पर्श करणारा ठरेल.” दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''आज मी जे काही आहे, ते माझ्या मराठी शाळांमुळेच आहे. मातृभाषेतून शिकताना मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. या चित्रपटातून मातृभाषेतून होणारे शिक्षण कमीपणाचं नसून खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न असेल. मुहूर्ताला मा. आदिती तटकरे यांसारख्या समाजभान असलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.” क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. या चित्रपटात नेमके कोण कोण कलाकार झळकणार आहेत याबाबत मात्र अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.

                             'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ अलिबागमध्ये चित्रीकरण सुरु                                 महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न 

मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिक्षणातील बदल, मराठी शाळांची घटणारी संख्या आणि मातृभाषेतून होणाऱ्या जडणघडणीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा अलिबाग येथे महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग उपस्थित होते.

यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या, ''आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीत शाळेचे मोठे योगदान असते. मातृभाषेतून होणारे शिक्षण विद्यार्थ्यांच्या संस्कारांवर खोलवर परिणाम करणारे आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटातून समाजाला योग्य संदेश मिळेल आणि तो विचार करायला लावणारा ठरेल. रायगड जिल्ह्यात या चित्रपटाचा मुहूर्त होत असल्याचा मला विशेष अभिमान आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे व निर्मात्या क्षिती जोग नेहमीच समाजाला आरसा दाखवणारे आशयसंपन्न चित्रपट सादर करत असतात. त्यांचा हा नवीन चित्रपटही नक्कीच मनाला स्पर्श करणारा ठरेल.”

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''आज मी जे काही आहे, ते माझ्या मराठी शाळांमुळेच आहे. मातृभाषेतून शिकताना मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. या चित्रपटातून मातृभाषेतून होणारे शिक्षण कमीपणाचं नसून खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न असेल. मुहूर्ताला मा. आदिती तटकरे यांसारख्या समाजभान असलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.”

क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. या चित्रपटात नेमके कोण कोण कलाकार झळकणार आहेत याबाबत मात्र अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.



Amanta Healthcare Limited IPO Opens on September 01, 2025

 Amanta Healthcare Limited IPO Opens on September 01, 2025

        Total Issue Size - Up To 1,00,00,000 Equity Shares of face value 10 each

        IPO Size - 12,600.00 Lakhs (At Upper Price Band)

        Price Band - 120 - 126 Per Share

        Lot Size – 119 Equity Shares

Amanta Healthcare Limited, a pharmaceutical company engaged in development, manufacturing, and marketing of sterile liquid products, including both large and small volume parenterals (LVPs and SVPs), proposes to open its Initial Public Offering on September 01, 2025, aiming to raise 12,600.00 Lakhs (at upper price band) with shares to be listed on the NSE and BSE Platform.

The issue size is up to 1,00,00,000 equity shares with a face value of 10 each with a price band of 120 - 126 Per Equity Share.

Equity Share Allocation

  • Qualified Institutional Buyer – Not more than 50,00,000 Equity Shares
  • Non-Institutional Investors - Not less than 15,00,000 Equity Shares
  • Individual Investors - Not less than 35,00,000 Equity Shares

The net proceeds from the IPO will be utilized for funding capital expenditure requirements for civil construction work and towards purchase of equipment, plant and machinery for setting up new manufacturing line of SteriPort at Hariyala, Kheda, Gujarat, funding capital expenditure requirements towards civil construction work, purchase of equipment, plant and machinery for setting up new manufacturing line for SVP at Hariyala, Kheda, Gujarat, and general corporate purposes. The anchor portion will open on Friday, August 29, 2025 and issue will close on Wednesday, September 03, 2025.

The Book Running Lead Manager to the Issue is Beeline Capital Advisors Private Limited, and the Registrar is MUFG Intime India Private Limited (Formerly Known as Link Intime India Private Limited).

Mr. Bhavesh Patel, Chairman and Managing Director of Amanta Healthcare Limited expressed,“Our company has grown by developing and supplying a wide range of sterile liquid products across therapeutic segments and medical devices. We have established a presence across domestic and international markets. This IPO marks a step forward in our growth journey, allowing us to expand our manufacturing capabilities with new SteriPort and SVP lines at our Hariyala facility, which will strengthen our capacity and support us for Future plans.”

About Amanta Healthcare Limited 

Amanta Healthcare Limited, a pharmaceutical company engaged in developing, manufacturing, and marketing of sterile liquid products, including both large and small volume parenterals (LVPs and SVPs) using Aseptic Blow-Fill-Seal (ABFS) and Injection Stretch Blow Moulding (ISBM) technologies, The Company serve’s six therapeutic segments such as fluid therapy - (IV Fluid), formulations, diluents, ophthalmic, respiratory care and irrigation solutions. The company also manufacture medical devices like irrigation solutions, first-aid products, and eye lubricants. Our packaging includes a wide range of closure systems and container volumes from 2 ml to 1000 ml. 

 Amanta is led by experienced Management including Mr. Bhavesh Patel who is the Promoter, chairman and managing director of the company–. He is a Mechanical Engineer and holds a master’s degree in management with more than 30 years of experience. 

In FY25, The Company achieved a Revenue of 27,470.82 Lakhs, EBITDA of 6,105.37 Lakhs & PAT of 1,050.07 Lakhs.

Disclaimer:

Certain statements in this document that are not historical facts are forward looking statements. Such forward-looking statements are subject to certain risks and uncertainties like government actions, local, political or economic developments, technological risks, and many other factors that could cause actual results to differ materially from those contemplated by the relevant forward-looking statements. The Company will not be in any way responsible for any action taken based on such statements and undertakes no obligation to publicly update these forward-looking statements to reflect subsequent events or circumstances.

 

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...