Tuesday, August 26, 2025

वडापाव'मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी प्रसाद ओक यांच्या अभिनयाची ‘शतकपूर्ती’

 वडापाव'मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी प्रसाद ओक यांच्या अभिनयाची ‘शतकपूर्ती’

वडापाव म्हटलं की जिभेला पाणी सुटतं. वडा जसा तिखट-चुरचुरीत असतो तसंच नात्यांमध्येही गोडवा आणि तिखटपणा असला तरच ती नाती खरी रंगतदार होतात. अगदी हाच अनुभव देणारा कौटुंबिक चित्रपट 'वडापाव' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाल टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून टीझरवरून हा चित्रपट एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असणार हे स्पष्ट होतंय. ही रुचकर पाककृती प्रसाद ओक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रसाद ओक यांच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट असल्यामुळे ते पहिल्यांदाच एकाच वेळी दिग्दर्शक आणि अभिनेते अशा दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे हा प्रवास अधिकच संस्मरणीय ठरणार आहे.

टीझर अत्यंत सुटसुटीत आहे. धमाल मनोरंजन आणि कौटुंबिक मूल्यांचा संगम असलेली ही कथा प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनर अंतर्गत, प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटाचे अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत. तर सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल असून संजय मेमाणे हे चित्रपटाचे छाया दिग्दर्शक आहेत. तर सिद्धार्थ साळवी यांनी चित्रपटाचं लेखन केले आहे.

दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, ‘’ 'वडापाव' एक अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतेच. हाच आमच्या चित्रपटाचा गाभा आहे. कुटुंब, त्यांच्या नात्यांतील गोडवा-तिखटपणा आणि त्यातून मिळणारा भावनिक व विनोदी अनुभव अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडावा, असाच आमचा प्रयत्न आहे.’’


निर्माते अमेय खोपकर म्हणतात, ''मराठी प्रेक्षक कौटुंबिक चित्रपटांवर नेहमी प्रेम करतात. ‘वडापाव’ ही कथा त्यांच्या मनात नात्यांची खरी चव रुजवेल. टीझरवरूनच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आलं, हेच आमचे पहिले यश आहे. हा सिनेमा हसवणार, रडवणार आणि विचार करायलाही लावणार.'' 

निर्माते निनाद बत्तीन म्हणतात, ‘’ वडापावचा जसा घरातील तीन पिढ्या मनसोक्त आस्वाद घेतात तसाच आमचा चित्रपट ‘वडापाव’ तीन पिढ्यांची गोष्ट सांगतो. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे. तो घराघरांत पोहोचेल आणि लोकांना आवडेल यात शंका नाही.’’

निर्माते अमित बस्नेत म्हणाले, ''मी मुळात नेपाळचा असून मला मराठी संस्कृती, खाद्यपदार्थ, साहित्य, कला यांबद्दल नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. यापूर्वी मी ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाची निर्मिती केली होती आणि आता ‘वडापाव’ची निर्मिती करत आहे. मराठी खाद्यपदार्थ हे मुळात भावनांशी जोडले गेलेले आहेत. वडापाव त्यापैकीच एक. जीवनात आपुलकीसोबत थोडा तिखटपणा हवाच. नाहीतर नातं फिकं पडतं. हाच बॅलन्स दाखवणारा हा चित्रपट आहे. टीझर पाहूनच प्रेक्षकांना जाणवलंय की, ही कथा अगदी त्यांच्या घरासारखीच आहे. ओळखीची, तरीही नव्या चवीची.''

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...