Tuesday, August 26, 2025

मराठी रुपेरी पडद्यावर ‘जब्राट’

                                                        मराठी रुपेरी पडद्यावर                           ‘जब्राट’

आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक नवनवीन मित्रमैत्रिणी भेटतात. यात काही जण आजन्म आपल्यासोबतची मैत्री टिकवून ठेवतात. मैत्री अखेरपर्यंत निभावणं प्रत्येकाला जमत नाही. आपल्या मैत्रीला जागणाऱ्या मित्रांची कथा सांगणारा तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ हा नवीन मराठी चित्रपट नववर्षारंभी रुपेरी पडद्यावर येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे दमदार असं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.  

‘लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स असा मनोरंजनाचा जबरदस्त मसाला असणाऱ्या ‘जब्राट’ या संगीतमय चित्रपटात आयुष संजीव, अनुष्का सरकटे, वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट, प्रगती कोळगे या तरुण फळीसोबत संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर, गणेश यादव ही ज्येष्ठ कलाकार मंडळीही यात दिसणार आहेत.

‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स हे आहेत. नृत्यदिग्दर्शक ‘लावणी किंग’ आशिष पाटील आहेत तर वेशभूषा युगेशा ओमकार यांची आहे. संगीताची जबाबदारी डॉ. जयभीम शिंदे यांनी खूपच ताकदीने पेलली आहे. तसेच प्रेमगीते, प्रेरकगीत आणि लोकगीतांनी नटलेल्या या चित्रपटात बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमाप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर, स्वाती शिंदे यांनी पार्श्वगायन केलेलं आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...