अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘नाट्य परिषद करंडक २०२५
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘नाट्य परिषद करंडक २०२५’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची मुंबई केंद्रावरील प्राथमिक फेरी शनिवार, २३ ऑगस्ट व रविवार, २४ ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे.
मुंबई केंद्रासाठी समन्वयक म्हणून विजय सूर्यवंशी (मो. ९८६९७९६२६२) कामकाज पाहणार आहेत. या केंद्रात एकूण १५ संघ सहभागी झाले असून, यामध्ये सुरत येथील एका संघाचा समावेश आहे. ही प्राथमिक फेरी दोन्ही दिवस सकाळी १०.०० वाजल्यापासून, जयश्री जयंत साळगावकर रंगमंच (मिनी थिएटर), यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई-१६ येथे तालीम स्वरूपात पार पडणार आहे.
सहभागी संस्था – शनिवार, २३ ऑगस्टक्र. संघाचे नाव एकांकिकेचे नाव दिग्दर्शकाचे नाव लेखकाचे नाव
१ सुप्रभा चेरीटेबल ट्रस्ट पन्नाशीची ऐशीतैशी कविता विभावरी शैलेश चव्हाण
२ बाळगंगा रंगभूमी (मुंबई ) काटेरी येल अभिलेश सुनीलदत्त सु. बा. सरपडवळ
३ जोकर्स थिएटर क्राइंग क्लब स्वप्नील जगताप स्वप्नील जगताप
४ अमर हिंद मंडळ रेशनकार्ड प्रथमेश पवार प्रथमेश पवार
५ नाटकनामा थिएटर बिझनेस क्लास तेजस सर्पेतेजस सर्पे
६ आकांक्षा फाउंडेशन मुंबई अजून उजाडत नाही गं.. प्रकाश पवार प्रकाश पवार
७ नक्षत्र कलामंच, मुंबई स्पर्शाची गोष्ट मच्छिंद्रनाथ,आनंद मच्छिंद्रनाथ
८ श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई (नाट्यसाधक) मोक्षदिशा नाईक महेंद्र कुरघोडे
सहभागी संस्था – रविवार, २४ ऑगस्ट
क्र. संघाचे नाव एकांकिकेचे नाव दिग्दर्शकाचे नाव लेखकाचे नाव
१ स्वारंभ कल्चरल फाउंडेशन सिमंतिनी अलका फोन्सेका शितल शुक्लेश मुणगेकर
२ गंधर्व कलामंच अग अग आई किरण फड किरण फड
३ शब्द स्पर्श प्रोडक्शन पहिले प्रेम मिहीर पटेल वि. स. खांडेकर
४ कोहिनूर क्रिएशन, मुंबई बाबू बँड बाजा चारुदत्त घडशी चारुदत्त घडशी
५ मोरया कलामंच समुद्र समीर चौडणकर समीर चौडणकर
६ स्वायत्त क्रिएशन टिक टिक समीर चौडणकर विक्रम होता
७ कलासक्त मुंबई पेंडूलम योगेश कदम सारिका ढेरंगे
नाट्य परिषद करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी, दिनांक १५ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
ही माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.
(अजित भुरे)
प्रमुख कार्यवाह

No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST