Saturday, August 30, 2025

‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव -‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’

                                                 ‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव -                                           ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’

‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव २०२५ विविधांगी उपक्रमांनी समृद्ध होत आहे. भक्तिभाव आणि मनोरंजनासोबतच सामाजिक व सांस्कृतिक जाणीव जपणाऱ्या कार्यक्रमांच्या या शृंखलेत आता एक आगळावेगळा उपक्रम होणार आहे. ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’ या विशेष कार्यक्रमात गणेशभक्तांना थेट सहभागी होऊन हस्तरेषांचे रहस्य समजून घेण्याची संधी मिळणार आहे.

प्रत्येक माणसाच्या मनात भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता असते. हे गूढ उलगडण्यासाठी ज्यांना या शास्त्राचे सखोल ज्ञान आहे अशा तज्ञाची आवश्यकता असते. आणि असेच तज्ञ म्हणजे प्रद्योत पेंढरकर. त्यांनी २०१४ मध्ये हस्तसामुद्रिक शास्त्र (Palmistry) चे औपचारिक शिक्षण पूर्ण करून शास्त्रोक्त ज्योतिष केंद्र या संस्थेच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन सुरू केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ अनेक नामवंत कलाकार, राजकारणी तसेच सामान्य नागरिकांनी घेतला आहे. याचबरोबर Palmistry चे वर्गही ते यशस्वीरित्या चालवत आहेत.

हस्तसामुद्रिक शास्त्रासोबतच प्रद्योत पेंढरकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या ‘राजवरस प्रोडक्शन’ संस्थेतून शेर शिवराज, सुभेदार असे ऐतिहासिक चित्रपट निर्मिले गेले आहेत.

या गूढ व रोचक विषयावर प्रद्योत पेंढरकर यांची उत्कंठावर्धक प्रकट मुलाखत मुलाखतकार सर्वेश देशपांडे घेणार आहेत. हा कार्यक्रम दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वाजता, ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड, दादर (प), मुंबई येथे होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...