अभिनेता हार्दिक जोशीच्या पुण्यातील घरच्या बाप्पाची खास झलक! त्याचा आगामी चित्रपट ‘अरण्य’ या थीमवर सजवलेला हा बाप्पाचा देखणा दरबार खरोखरच नेत्रदीपक आहे. यावेळी ‘अरण्य’चा टीमने हार्दिकच्या कुटुंबासोबत आरती करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!‘अरण्य’मधील धमाकेदार ‘रेला रेला’ गाणं प्रदर्शित
काही दिवसांपूर्वीच 'अरण्य' या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला. जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आता या चित्रपटातील 'रेला रेला' हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या जोशपूर्ण गाण्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हार्दिक जोशी आणि वीणा जगताप यांच्या लग्नसोहळ्यावर चित्रित हे गाणं ऊर्जा, उत्साह आणि सांस्कृतिक रंगत यांनी परिपूर्ण आहे. गायक अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजात सादर झालेल्या या गाण्याला नितीन उगलमुगले यांचं आकर्षक संगीत लाभलं आहे, या गाण्याचे बोल पारंपरिक असून अतिरिक्त बोल मुकुंद भालेराव यांचे आहेत. गाण्याच्या ठेक्यांची लय आणि पारंपरिक ढंग प्रेक्षकांना नक्कीच थिरकायला लावेल.
दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे म्हणतात, '' 'रेला रेला' हे गाणं प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं आहे. अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजासोबत नितीन उगलमुगळे यांचं कमाल संगीत गाण्याला चारचाँद लावतात. या गाण्यातून विदर्भातील संस्कृतीची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.”
निर्माता शरद पाटील म्हणाले, '' 'अरण्य'मधून आम्ही प्रेक्षकांना एक भावनिक प्रवास घडवण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्टरला, टिझरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आणि आता ‘रेला रेला’ गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
एस एस स्टुडिओ निर्मित आणि एक्स्पो प्रस्तुत ‘अरण्य’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अमोल दिगांबर करंबे यांनी केलं आहे. शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतिका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, चेतन चावडा आणि अमोल खापरे यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत. हा भव्य प्रवास येत्या १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST