Monday, September 1, 2025

'अभंग तुकाराम' चित्रपटातील कलाकारांनी घेतला 'चिंचपोकळी च्या चिंतामणी'चा आशीर्वाद.

 'अभंग तुकाराम' चित्रपटातील कलाकारांनी घेतला 'चिंचपोकळी च्या चिंतामणी'चा आशीर्वाद🙏



ऋतू बदलतात, प्रेम टिकून राहतं! 'ऋतुचक्र' प्रेमगीत प्रदर्शित

 ऋतू बदलतात, प्रेम टिकून राहतं! 'ऋतुचक्र' प्रेमगीत प्रदर्शित 

‘दशावतार’ १२ सप्टेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

प्रत्येक ऋतूतला निसर्ग वेगळा दिसतो आणि मनाला तेवढाच भावणारा असतो. माणसाच्या आयुष्यातही ऋतूंप्रमाणेच चढ उतार येत राहतात, पण त्यात जवळचं माणूस सोबत असलं तर आयुष्याचा प्रवास आनंददायी होतो. 

प्रेमाची आणि आयुष्याची ऋतूंशी अशीच सांगड घालणारं, प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आणि ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेलं ‘ऋतूचक्र’ हे वेगळ्या बाजाचं प्रेमगीत नुकतंच प्रदर्शित झालंय. 

‘दशावतार’ या बहुचर्चित आगामी चित्रपटातलं हे गीत प्रियदर्शिनी इंदलकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्या जोडीवर चित्रित करण्यात आलेलं आहे. कोकणातल्या निसर्गरम्य स्थळांवर या गीताचं चित्रीकरण करण्यात आलेलं असून न पाहिलेलं अद्भुत कोकण या गाण्यात पाहता येतंय. समाज माध्यमांवर आपल्या सुमधुर विडियोजमुळे प्रसिद्ध असलेली स्वानंदी सरदेसाई आणि गायक साहिल कुलकर्णी यांनी हे गीत गायलंय.

या गाण्याबद्दल गीतकार गुरु ठाकूर म्हणतात,’’ प्रेम ही स्थिर भावना नसून ती काळानुसार, परिस्थितीनुसार आणि नात्यातील सूक्ष्म भावनांनुसार सतत बदलत जाते. ‘ऋतुचक्र’ या गाण्यातून मी या बदलत्या प्रेमरंगांना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. ऋतूंच्या चक्राप्रमाणेच प्रेमाचं चक्रही नव्या अर्थांनी उमलत राहातं, हे या गीताचं सार आहे.’’

तर संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात, ‘’ या गाण्याच्या स्वररचनेत कोकणातील निसर्गाची गोडी, ऋतूंची मृदुता आणि प्रेमातील कोमलता गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. साहिल आणि स्वानंदीच्या आवाजातून या भावछटा अधिक खुलून येतात. ‘ऋतुचक्र’ हे प्रेमगीत निसर्ग आणि प्रेम यांचा सुसंवादी संगम आहे.”

झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ हा दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे यासारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका असलेला चित्रपट येत्या १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘दशावतार’ चित्रपटातील कलाकार अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर आणि सिद्धार्थ मेनन यांनी मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट

       ‘दशावतार’ चित्रपटातील कलाकार अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर आणि सिद्धार्थ मेनन यांनी                                                             मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट.

‘दशावतार’ चित्रपटातील कलाकार अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर आणि सिद्धार्थ मेनन यांनी मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट देत बाप्पाच्या चरणी माथा टेकवला. रंगारी बदक, परेलचा राजा, मुंबईचा राजा, जीएसबी राजा, चिंतामणी व खेतवाडी गणपती या मंडळांमध्ये जाऊन त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले आणि आरती करून आशीर्वाद मिळवला. खेतवाडीतील गणपती मंडळाने यंदा ‘दशावतार’ या चित्रपटावर आधारित भव्य दरबार सजवून भाविकांचे मन वेधून घेतले आहे.










Sunday, August 31, 2025

Union MoS Raksha Khadse & Actor Jackie Shroff Inspire Citizens at 38th Edition of Sundays on Cycle in Sanjay Gandhi National Park , Borivali Organised by SAI RC MUMBAI

 

Union MoS Raksha Khadse & Actor Jackie Shroff Inspire Citizens at 38th Edition of Sundays on Cycle in Sanjay Gandhi National Park , Borivali Organised by SAI RC MUMBAI 


The Sports Authority of India, Regional Centre Mumbai, in collaboration with Sanjay Gandhi National Park (SGNP), successfully hosted the 38th Edition of ‘Sundays on Cycle’ at Borivali, Mumbai. The event drew more than 500 enthusiastic cyclists, who joined the movement to celebrate fitness, sustainability, and community spirit.



The event was graced by Hon’ble Union Minister of State for Youth Affairs & Sports, Smt. Raksha Nikhil Khadse, as Chief Guest, and renowned actor & fitness icon Shri Jackie Shroff as Guest of Honour.


In her address, Hon’ble Minister Smt. Raksha Khadse emphasised that “Sundays on Cycle,” launched under Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi ji’s Fit India Mission, is gaining greater momentum every week across India. She highlighted that cycling is not only a path to fitness but also a practical solution to rising pollution and traffic congestion, particularly in urban cities. She motivated citizens to embrace cycling as part of their lifestyle, calling it a simple yet powerful way to stay healthy.



In her address, Hon’ble Minister Smt. Raksha Khadse emphasised that “Sundays on Cycle,” launched under Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi ji’s Fit India Mission, is gaining greater momentum every week across India. She highlighted that cycling is not only a path to fitness but also a practical solution to rising pollution and traffic congestion, particularly in urban cities. She motivated citizens to embrace cycling as part of their lifestyle, calling it a simple yet powerful way to stay healthy.
 

Shri Jackie Shroff, in his trademark inspiring style, reminded the gathering that “fitness is for everyone.” He added, “Pair mein dum to aage kadam” urging participants to stay strong, take charge of their health, and inspire others around them to lead a fit and active life. 


The event was led by SAI RC Mumbai as part of the three-day National Sports Day celebrations, under the guidance of Regional Director, Shri Pandurang Chate (IRS).

 

Saturday, August 30, 2025

THE JOLLY RIVALRY GETS LOUDER AS THE ILLEGAL PARTY BANGER HITS THE CHARTS!

 THE JOLLY RIVALRY GETS LOUDER AS THE ILLEGAL PARTY BANGER HITS THE CHARTS!

Jolly LLB 3 drops its second track — the high-voltage illegal party banger Glass Uchhi Rakhey! 

The Jolly rivalry is soon reaching the court, meanwhile the illegal party banger of Jolly LLB 3 turns up a notch higher with the release of its second track, Glass Uchhi Rakhey. Following the high-voltage Bhai Vakeel Hai, this number sets the floor ablaze as the ultimate illegal party banger of the year from the film. 

Composed by Vikram Montrose, Glass Uchhi Rakhey brings a pulsating sound designed to get everyone moving. The lyrics, penned by Meggha Bali, channels pure fun and energy, making the track instantly addictive. 

The electrifying vibe is powered by the voices of Meggha Bali, Channa Ghuman, Karan Kapadia, and Vikram Montrose, whose dynamic rendition makes it a guaranteed crowd-puller. 

With its thumping beats and unstoppable energy, Glass Uchhi Rakhey is all set to dominate playlists as the party anthem of the season, building even more excitement around the much-awaited Jolly LLB 3. 

Presented by Star Studio18 and Directed by Subhash Kapoor,  featuring a powerhouse cast of Akshay Kumar, Arshad Warsi, Huma Qureshi, Amrita Rao, and Saurabh Shukla, Jolly LLB 3 promises nostalgia, sharp writing, and a clash of two iconic performers, making it one of the biggest cinematic face-offs of the year — releasing in theatres on September 19th. 

Song link - https://yt.openinapp.co/GlassUchhiRakhe

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा! अरण्य’मधील धमाकेदार ‘रेला रेला’ गाणं प्रदर्शित

अभिनेता हार्दिक जोशीच्या पुण्यातील घरच्या बाप्पाची खास झलक! त्याचा आगामी चित्रपट ‘अरण्य’ या थीमवर सजवलेला हा बाप्पाचा देखणा दरबार खरोखरच नेत्रदीपक आहे. यावेळी ‘अरण्य’चा टीमने हार्दिकच्या कुटुंबासोबत आरती करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!‘अरण्य’मधील धमाकेदार ‘रेला रेला’ गाणं प्रदर्शित

काही दिवसांपूर्वीच 'अरण्य' या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला. जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आता या चित्रपटातील 'रेला रेला' हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या जोशपूर्ण गाण्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हार्दिक जोशी आणि वीणा जगताप यांच्या लग्नसोहळ्यावर चित्रित हे गाणं ऊर्जा, उत्साह आणि सांस्कृतिक रंगत यांनी परिपूर्ण आहे. गायक अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजात सादर झालेल्या या गाण्याला नितीन उगलमुगले  यांचं आकर्षक संगीत लाभलं आहे, या गाण्याचे बोल पारंपरिक असून अतिरिक्त बोल मुकुंद भालेराव यांचे आहेत. गाण्याच्या ठेक्यांची लय आणि पारंपरिक ढंग प्रेक्षकांना नक्कीच थिरकायला लावेल.

दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे म्हणतात, '' 'रेला रेला' हे गाणं प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं आहे. अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजासोबत नितीन उगलमुगळे यांचं कमाल संगीत गाण्याला चारचाँद लावतात. या गाण्यातून विदर्भातील संस्कृतीची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.”

निर्माता शरद पाटील म्हणाले, '' 'अरण्य'मधून आम्ही प्रेक्षकांना एक भावनिक प्रवास घडवण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्टरला, टिझरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आणि आता ‘रेला रेला’ गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

एस एस स्टुडिओ निर्मित आणि एक्स्पो प्रस्तुत ‘अरण्य’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अमोल दिगांबर करंबे यांनी केलं आहे. शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतिका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, चेतन चावडा आणि अमोल खापरे यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत. हा भव्य प्रवास येत्या १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बिन लग्नाची गोष्ट'साठी प्रिया - उमेशची निवड कशी झाली? दिग्दर्शक आदित्य इंगळेंनी सांगितली इनसाईड स्टोरी!

 'बिन लग्नाची गोष्ट'साठी प्रिया - उमेशची निवड कशी झाली? दिग्दर्शक आदित्य इंगळेंनी सांगितली इनसाईड स्टोरी!

येत्या १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कलाकारांमध्ये प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक ही तगडी नावे असली तरी, विशेष आकर्षण ठरत आहे ते म्हणजे प्रिया आणि उमेश यांची जोडी. प्रिया–उमेशची जोडी आधीपासूनच प्रेक्षकांची आवडती आहे. त्यांच्या सहजसुंदर केमिस्ट्रीमुळे दोघंही पडद्यावर रिअल वाटतात आणि हाच नैसर्गिकपणा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या नजरेत भरला.

आदित्य इंगळे त्यांच्या निवडीबद्दल सांगतात, '' मी उमेश -प्रियाकडे एकदा जेवायला गेलो असताना, प्रियाची शिस्त, उमेशचा सहजपणा, गंमतीशीर स्वभाव बघून मला त्या दोघांपेक्षा त्यांच्यात माझी पात्रच दिसायला लागली. आशय आणि ऋतिका सारखेच ते वागत होते. ते  इतके या पात्रांमध्ये फिट होत होते की त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही, असं मला वाटलं म्हणून मी त्यांना या चित्रपटासाठी विचारलं. त्यांना कथा ऐकवली. प्रिया तर गंमतीनं म्हणाली सुद्धा 'तू आधी मला बघितलं आणि मग हे पात्र लिहिलं ना?!' खरं तर या व्यक्तिरेखा आधीच लिहिल्या होत्या आणि हे दोघं त्यात परफेक्ट बसले. आशय -ऋतिका आणि उमेश - प्रियाच्या वागण्यात इतकं साम्य होतं की, दुसरं कोणी मला दिसलंच नाही.''

गिरीश ओक आणि निवेदिता सराफ ही लोकप्रिय जोडीदेखील चित्रपटात झळकणार आहे. या दोन जोड्यांच्या रंगतदार अभिनयामुळे ‘बिन लग्नाची गोष्ट’ प्रेक्षकांसाठी खास अनुभव ठरणार आहे. गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे.

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...