Sunday, March 22, 2026

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा

 शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा  जागर


चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला हिंदू संस्कृतीत विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा, या दिवशी या नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात होते. या पवित्र उत्सवाचा जागर करण्यासाठी शेलार मामा फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून, अभिनेता सुशांत शेलार आणि पत्नी सौ. साक्षी सुशांत शेलार यांच्या विद्यमाने लोअर परेल येथे  १९ मार्चपासून  ते २७ मार्च  या कालावधीत  ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होतोय.  


माननीय उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि खासदार मा. श्री. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेलारमामा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सुशांत अरुण शेलार यांच्या संकल्पनेतून हा चैत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मा.श्री. एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य), मा.श्री. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री -महाराष्ट्र राज्य), श्रीमती. सुनेत्रा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), मा.डॉ.निलम गो-हे (उपसभापती- विधान परिषद), मा.डॉ. श्रीकांत शिंदे (खासदार) यांच्या विशेष  उपस्थितीसह अभिनेता सौरभ गोखले,  मेघन जाधव,  विघ्नेश जोशी,  अक्षय मुडावदकर, डॉ. निखिल राजशिर्के, अभिनेत्री  तेजस्विनी पंडित, रेश्मा शिंदे आदी मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या उत्सवाला हजर राहणार आहेत. 


गेल्या काही वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात सक्रीय असलेल्या शेलारमामा फाऊंडेशन या संस्थेतर्फे मुंबईच्या लोअर परळ येथे चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन करणात येते. हिंदू धर्म, आपल्या परंपरा आणि संस्कृती याचे जतन आणि संवर्धन यासह हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा हा या चैत्र नवरात्रोत्सवा मागचा हेतू असल्याचे अभिनेता सुशांत  शेलार यांनी सांगितले.

कोकण वैभव जवळ, तालचेकरवाडी शाळेसमोर, लोअर परळ उड्डाणपुलाखाली १९ मार्च २०२६ ते २७ मार्च दरम्यान रंगणाऱ्या या उत्सवात अभिषेक, शृंगार पूजा, मंडल पूजा, पाठ वाचन, नवचंडी होमहवन,भजन, ललिता सहस्त्रनाम, कुंकू मार्चन, देवीचा गोंधळ, जागरण  महिला पुरीहिताचें पठण, श्रीरामनवमी उत्सव, विसर्जन आदी आराधनेने चैत्र नवरात्री उत्सवाचा जागर केला जाणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था प्रायोगिक रंगमंच संघातर्फे प्रथमच रंगमंच एक अभिव्यक्ती अनेक..

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था प्रायोगिक रंगमंच संघातर्फे प्रथमच रंगमंच एक अभिव्यक्ती अनेक...*

दिनांक : २१ मार्च २०२६ सायंकाळी : ६. ३० वाजता स्थळ :साळगावकर प्रायोगिक रंगमंच, यशवंतराव नाट्य संकुल, माटुंगा रोड, मुंबई - ४०००१६.

आयोजित राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धा २०२५ - २०२६ आयोजित करण्यात आला...

( विशेष सन्मान )

संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या ९१ एकांकिका मधून विजेत्या ठरलेल्या एकांकिका आणि त्यांच्या लेखकांचा सन्मान... 

प्रमुख पाहुणे : प्रेमानंद गज्वी 

प्रमुख अतिथी : गिरीश पतके 

संस्थेच्या पारितोषिक विजेत्या संघांचे कथा अभिवाचन 

उत्तेजनार्थ पारितोषिके सहा 

प्रत्येकी १०००/रुपये. +प्रमाणपत्र 

०४) नॉट स्क्रिप्टेड - देवेंद्र प्रभुदेसाई एकांकिका लेखन स्पर्धेतील उत्तेजनार्थ ₹ 1000/= चे पारितोषिक विनयरूप टूर्स अँड ट्रॅव्हल, नवी मुंबई (रुपाली विनायक सावर्डेकर )तर्फे देण्याचे घोषित करण्यात आले. 

०५)गोल्ड फिशचा खून करणारे ते - संकेत तांडेल  

०६) एका भेटीची गोष्ट - राकेश सुबाराव इंगवले 

०७) चंद्र माधवी - अनिल मुनघाटे 

०८) युगे युगे - ज्ञानेश्वर पाटील 

०९) दंश - महेंद्र डोंगरे

लक्षणीय पारितोषिके सहा

 प्रत्येकी ५००/रुपये. +प्रमाणपत्र ही पाचशे रुपयांची सहा पारितोषिके अशोक परब यांच्या सौजन्याने देण्यात आली. 

१०)ऑट लिबर्टास ऑट माॅर्स- अभिजित वाईकर 

११) पाच बाय सातचे कुरुक्षेत्र - नम्रता शिरढोणे 

१२)कळसूत्र - रवी इनामदार 

१३) शून्य गोलार्धावर आदिम अनंताचा सैतानी अस्त- अभिजित वाईकर 

१४) समांतर - कय्युम काझी 

१५) बिंब प्रतिबिंब - अर्जुन गावडे

या स्पर्धेसाठी माननीय परीक्षक म्हणून सर्वश्री डॉ. अनिल बांदिवडेकर, आभास आनंद, विलास पगार यांनी काम पाहिले. 

प्रायोगिक रंगमंच संघाच्या वतीने अंतिम फेरीत आलेल्या सर्व पारितोषिक प्राप्त एकांकिकांचा संग्रह प्रकाशित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. 

संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन दत्ता सावंत यांनी केले. 

दिलीप दळवी 

अध्यक्ष 

प्रायोगिक रंगमंच संघ

प्रसिद्धी -. आवाज माझा. महाराष्ट्राचा चॅनल 

गणेश तळेकर

Saturday, March 21, 2026

*'चैत्र चाहूल २०२६' : ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न!*

*'चैत्र चाहूल २०२६' : ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न!*


*मुंबई :* गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या या कथेचे त्यांनी केलेले सादरीकरण इतके जिवंत होते की, सभागृहातील रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. ‘माळ’ ही केवळ ओसाड जागेची प्रतिमा नसून, मनातील रिकामेपणाचे प्रतीक आहे, हे त्यांनी आपल्या वाचनातून प्रभावीपणे उलगडले. मास्तर आणि काशीताई यांसारख्या व्यक्तिरेखा जणू रंगमंचावर सजीव झाल्याचा भास रसिकांना झाला. उपस्थितांनी या वाचनाला उत्स्फूर्त दाद दिल


यानंतर ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचे वितरण करण्यात आले. पुण्यातील ‘सुदर्शन रंगमंच’च्या शुभांगी दामले यांना ‘ध्यास सन्मान’ प्रदान करण्यात आला, तर प्रख्यात लेखक व भाष्यकार सुरेश गोसावी यांना ‘रंगकर्मी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. सन्मान स्वीकारताना शुभांगी दामले यांनी सांगितले की, नाट्यदर्पण रजनीकार सुधीर दामले यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याची दिशा मिळाली आणि इतरांना संधी उपलब्ध करून देण्याच्या ध्यासातून आपली वाटचाल घडली. तर सुरेश गोसावी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “आजपर्यंत लिहिले खूप, पण बोलण्याचा प्रसंग पहिल्यांदाच आला. बाजुस पडलेल्या दगडाला मोठे पण द्यायचा आज उत्सव आहे. नमस्कार”

या प्रसंगी निलेश जाधव यांनी पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना स्वतः तयार केलेल्या विठोबाच्या तैल चित्राची आकर्षक फोटोफ्रेम भेट दिली. तसेच त्यांना सापडलेल्या सोन्याच्या दागिन्यांतून मिळालेली रक्कम सामाजिक कार्यासाठी देण्याचा उदात्त निर्णय घेत, पेण येथील दिव्यांग मुलांसाठी कार्यरत ‘सुहित जीवन ट्रस्ट’च्या संचालिका सुरेख पाटील यांच्याकडे ती रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी ‘ॲड फिझ’ निर्मित ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या कॉफीटेबल पुस्तकाची झलकही सादर करण्यात आली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी ‘रंग विठ्ठल’ हा खास ‘चैत्र चाहूल’साठी सादर केलेला अभंग रसिकांसमोर सादर केला. त्यांच्या सुरेल गायनाला तबल्यावर यती भागवत, संवादिनीवर ज्ञानेश्वर सोनवणे, तालवाद्यावर सूर्यकांत सुर्वे, पखवाजवर हनुमंत रावडे, बासरीवर अमर ओक तसेच स्वरसाथीसाठी निमिष कैकाडी, स्वरांगी मराठे आणि स्वराली जोशी यांनी समर्थ साथ दिली.


Wednesday, March 18, 2026

‘चिरायू’ च्या मंचावर ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

 *मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’*

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत. येत्या गुढीपाडव्याचं औचित्य साधत ‘शेलार मामा फाउंडेशन’ आयोजित ‘चिरायू २०२६’ हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्यांच्या उत्सवाचा सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला. अवघं मराठी कलाविश्व यानिमित्ताने एकवटलं होतं. नवनवे संकल्प आणि कार्य-प्रकल्पांसोबत मनोरंजनाची गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत ‘चिरायू’तर्फे दणक्यात साजरं केलं जातं. शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘चिरायू’चे वैशिष्ट्य म्हणजे अभिनव संकल्पनांच्या माध्यमातून ‘चिरायू’ सतत वेगळा आणि सकारात्मक संदेश देत असते. तसेच नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या कलाकर्मींची दखल ‘चिरायू’च्या मंचावर घेतली जाते.

यंदा चिरायू च्या मंचावर ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना साकारण्यात आली. गोधड्यांमध्ये बियांचा वापर करत ही गुढी तयार करण्यात आली. उभारलेली ही ‘बीज गुढी’ केवळ परंपरेचे प्रतीक न राहता निसर्गाशी नाते जपण्याची प्रेरणा देणारी ठरली. या बियांमधून भविष्यात झाडे उगवून हरित पर्यावरण घडवण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. परंपरा आणि पर्यावरण यांची सांगड घालत हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात हा सोहळा दिमाखात रंगला.२००६ पासून ‘शेलार मामा फाउंडेशन’च्या माध्यमातून हा सन्मान सोहळा सातत्याने आयोजित केला जात आहे.

मराठी कलाक्षेत्र हे प्रयोगशीलतेसोबतच समाजाभिमुखतेसाठीही ओळखले जाते. सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत ‘चिरायू’ उपक्रम राबवला जातो. यंदा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्याबद्दल अभिनेता सुयश टिळक याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुरस्कृत ‘पर्यावरण स्नेही’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पडद्यामागील कलाकारांमध्ये वेशभूषेसाठी राहुली नागरे, चित्रपट पोस्टर डिझायनिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सचिन गुरव, तर चित्रपट प्रसिद्धी-जनसंपर्क क्षेत्रातील कार्याबद्दल गणेश गारगोटे यांचा सन्मान करण्यात आला. त्यासोबत मेकअप आर्टिस्ट संतोष गिलबिले, आणि डबिंग आर्टिस्ट अभिनेता मंगेश सातपुते यांनाही याप्रसंगी गौरविण्यात आले. अमृता राव, सुजय डहाके, भार्गव जगताप, श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, कबीर खंदारे या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेत्या मान्यवरांचा विशेष सन्मानही यावेळी करण्यात आला.

या सोहळ्यात ‘शेलार मामा फाउंडेशन’चे मा. श्री. सुशांत शेलार यांनी माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष आभार मानले. तसेच खासदार श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम , सर्व मान्यवर, कलाकार आणि तंत्रज्ञांचे आभार मानत संस्थेचा उद्देश स्पष्ट केला. “समाजासाठी आणि कलेसाठी मनापासून काम करणाऱ्या व्यक्तींना योग्य व्यासपीठ देऊन त्यांचा गौरव करणे आणि त्यांच्या कार्याची दखल घेणे, हा आमचा खरा हेतू आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. “मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच आपल्या जीवनात खरी समृद्धी येते. त्यांच्या आयुष्यात आनंद फुलू दे आणि सुगीचे दिवस येऊ दे,’ अशी भावनाही सुशांत शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.

दिग्दर्शक संजय जाधव, सचित पाटील, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, दिग्दर्शक समित कक्कड,श्रुती मराठे, गौरव घाटणेकर, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग, योगेश शिरसाट, जान्हवी किल्लेदार, राधा सागर, निर्मात्या अमृता राव, रणजित जोग, अक्षया गुरव, अक्षता नाईक, संजना पाटील, मंगेश सातपुते, संगीतकार अजित परब, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, गीतकार मंदार चोळकर आदि कलाकार यावेळी उपस्थित होते. 


कला, संस्कृती, समाजसेवा यांचा गौरव करणारा आणि मान्यवरांची उपस्थिती, कलाकारांचा उत्साह, रसिकांचा भरभरून प्रतिसाद यामुळे ‘चिरायू २०२६’ सोहळा अविस्मरणीय ठरला.

गश्मीर महाजनीचा दमदार ‘गोंधळ’ !

 गश्मीर महाजनीचा दमदार ‘गोंधळ’ !

गावोगावी फिरून आई जगदंबेचा जागर करणारे गोंधळी म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक. त्यांची भक्ती, त्याची ऊर्जा आपल्यातही चैतन्य निर्माण करते. येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या आगामी ‘सालबर्डी’ या मराठी चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी दमदार गोंधळी साकारताना दिसणार आहे. ‘काळरातीचा जोर वाढला घोर, होई शिरजोर गं जगदंबे’ ।

अंधार मातला थोर, असा घनघोर, लागला घोर गं जगदंबे ।

या गोंधळ नृत्यात गश्मीरने पारंपरिक वेशभूषा, प्रभावी देहबोलीसह कमालीचा नृत्याविष्कार सादर केला आहे. नुकतेच हे गीत प्रकाशित झाले असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळतोय. जगदंबेचा हा गोंधळ कथानकात थरार आणि उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे. संबळाच्या ठेक्यावर रहस्यमय वातावरणात गश्मीरची एन्ट्री वेगळीच रंगत वाढविणारी आहे. गीतकार मुकुंद भालेराव यांच्या लेखणीतून सजलेल्या या गोंधळाला संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचा संगीतसाज आहे. अजय गोगावले यांचा दमदार स्वर गाण्याला लाभला आहे. हा गोंधळ आशिष पाटील यांनी आपल्या सदाबहार अदाकारीने नृत्यदिग्दर्शित केला आहे.   

गावातील गूढ शांततेच्या आड दडलेलं जीवघेणं रहस्य उलगडण्यासाठी हा गोंधळी येतोय का? अशा प्रश्नांची उत्सुकता यामुळे निर्माण झाली आहे. याबद्दल बोलताना गश्मीर महाजनी म्हणतो, ‘गोंधळ ही केवळ परंपरा नाही, तर देवीभक्तीची एक ऊर्जादायी अभिव्यक्ती आहे’. ‘सालबर्डी’मधील माझा गोंधळी हा कथानकाला वेगळी दिशा देणारा महत्त्वाचा दुवा आहे. गोंधळ गीतामध्ये असलेली ऊर्जा, नाद आणि पारंपरिक वातावरण यामुळे शूटिंग करतानाच अंगावर रोमांच उभे राहत होते. प्रेक्षकांनाही हा अनुभव नक्कीच जाणवेल.”

महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा थरारक शोध घेणारा ‘सालबर्डी’ हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे. ‘सालबर्डी’ चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

Indian Missions Working in ‘Mission Mode’ to Evacuate Citizens from War-Affected Regions


Indian Missions Working in ‘Mission Mode’                     to Evacuate Citizens from                 War-Affected Regions


18th March, Mumbai/New Delhi* – Amid ongoing tensions in West Asia, the Government of India and Indian missions abroad are actively engaged in efforts to safely evacuate Indian citizens. Multiple alternative routes are being used to facilitate their return.

According to the Ministry of External Affairs, around 244,000 Indians have returned safely to the country since the conflict began on February 28. To bring back those stranded in war-affected areas, the Indian government is maintaining close contact with top leadership across West Asia and the Middle East, while Indian missions overseas are operating fully in “mission mode.”

Ministry Spokesperson Randhir Jaiswal, speaking at an inter-ministerial briefing on March 17, said that approximately 700 Indian nationals have reached Armenia and Azerbaijan via land routes from Iran, from where they are returning to India. He added, “All 284 pilgrims who had gone to Iran have also safely reached Armenia. Out of these, 130 pilgrims will arrive in Delhi today.” Spokesperson Jaiswal noted that the MEA’s control room is fully operational and assisting citizens, and that the volume of incoming calls and emails has significantly decreased.

The Indian Embassy in Doha has facilitated the evacuation of more than 1,600 Indians through Qatar Airways flights. It also informed that temporary transit visa facilities for Saudi Arabia are being provided, helping those who wish to return to India via land through the Salwa border. The embassy stated that its office will remain open throughout the week to offer consular services, including passport issuance.

Additionally, in a post on X, the embassy said that as part of ongoing relief efforts supported by the mission, dry ration is being distributed to members of the Indian fishing community residing in Qatar.

Further, Additional Secretary (Gulf) in the Ministry of External Affairs, Aseem R. Mahajan, stated in a press briefing, “Indian missions in the region are working round the clock. On March 16, around 65 flights operated from the UAE to India, and about 70 flights are expected on Tuesday. Flights from Oman to various destinations in India are also continuing.”

Thursday, March 12, 2026

एडेलवाइस लाइफ इन्शुरन्सचे आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत ब्रेकइव्हन गाठण्याचे उद्दिष्ट

एडेलवाइस लाइफ इन्शुरन्सचे आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत ब्रेकइव्हन गाठण्याचे उद्दिष्ट

राष्ट्रीय: 11 मार्च २०२६: एडेलवाइस लाइफ इन्शुरन्स आगामी २-३ वर्षांत दुहेरी अंकात वाढ अपेक्षित करत असून, आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत ब्रेकइव्हन (नफा-तोटा समान पातळी) गाठण्याची आशा व्यक्त करत आहे, असे एमडी आणि सीईओ सुमित राय यांनी सांगितले.
"आम्ही सुमारे १४ वर्षांची संस्था आहोत. सुरुवातीची वर्षे, विशेषतः २०११ ते २०१६ दरम्यान, संपूर्ण आयुर्विमा उद्योगासाठी वाढीच्या दृष्टीने मंद होती. आम्हीही त्या टप्प्यावर नवीन होतो आणि व्यवसायाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून मुद्दाम पुराणमतवादी होतो. आमच्या वाढीत खरी गती २०१७-२०१८ नंतर आली," राय म्हणाले.

ते म्हणाले की, विमा कंपनी सुरुवातीला प्रामुख्याने एक-चॅनेल कंपनी होती, ते पुढे म्हणाले की, "आम्ही आता बहु-चॅनेल विमा कंपनी म्हणून काम करतो, ज्यामध्ये मालकीचे आणि भागीदारी वितरण सुमारे ५०-५० टक्के योगदान देते."

हाच समतोल कंपनीच्या उत्पादन मिश्रणातही दिसून येतो, असे राय यांनी सांगितले.
कंपनीचा सातत्यपूर्ण कल हा चॅनेल आणि उत्पादनांमध्ये वैविध्यपूर्ण, दीर्घकालीन व्यवसाय उभारण्यावर आहे, असे राय यांनी नमूद केले.

कंपनीने तिसऱ्या तिमाहीत जोरदार गती अनुभवली. त्यांचा वैयक्तिक एपीई वर्ष-दर-वर्ष ३८ टक्क्यांनी वाढला, जो उद्योगाच्या सरासरी वाढीपेक्षा खूप जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, कंपनी सुमारे ६५० कोटी रुपयांचा नवीन व्यवसाय आणि सुमारे २,४०० कोटी रुपयांचे एकूण प्रीमियम उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे, असे राय म्हणाले.

भांडवलाच्या दृष्टीकोनातून, राय म्हणाले की, कंपनीकडे खूप चांगली भांडवली स्थिती आहे. "आमचे पेड-अप भांडवल आज सुमारे २,९०० कोटी रुपये आहे. गेल्या काही वर्षांत, आम्ही दरवर्षी सुमारे १७५-२०० कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले आहे आणि आम्ही जसजसा विस्तार करू, तसतसे पुढील दोन ते तीन वर्षे हे भांडवल समर्थन चालू राहील अशी अपेक्षा आहे," असे त्यांनी सांगितले.

ब्रेकइव्हननंतर, भांडवलाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि गरज पडल्यास, ती वाढीशी संबंधित असेल, असे राय यांनी स्पष्ट केले.

Zam Zam Perfumers brings 35 years of non-alcoholic fragrance heritage to Mumbai with first store launch

Zam Zam Perfumers brings 35 years of non-alcoholic fragrance heritage to Mumbai with first store launch Mumbai, June 20, 2026: Zam Zam Perfu...