दुबईत शाहरूख खानच्या नावे गगनचुंबी व्यावसायिक इमारत
डॅन्यूब प्रॉपर्टीजतर्फे दुबईच्या मध्यभागी 'शाहरुख्झ बाय डॅन्यूब' या प्रीमियम बिझनेस टॉवरचे अनावरण
मुंबई, जागतिक स्तरावर प्रथमच डॅन्यूब प्रॉपर्टीजने 'शाहरुख्झ बाय डॅन्यूब' या प्रीमियम व्यावसायिक गगनचुंबी इमारतीच्या (कमर्शियल टॉवर) अनावरणाची घोषणा केली. विशेष म्हणजे या टॉवरला बॉलीवूड 'मेगास्टार' शाहरुख खानचे नाव देण्यात आले आहे. ही घोषणा दोन सुप्रसिद्ध व्यक्तींमधील एक भव्य सहयोग दर्शवते ज्यांनी आपापल्या क्षेत्रात महत्त्वाकांक्षा आणि यशाची पुनर्परिभाषा केली, ते म्हणजे अभिनेता शाहरुख खान आणि रिझवान साजन, जे डॅन्यूब ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.
शेख झायेद रोडवर भव्यतेने उभारलेला ५५ मजली टॉवर दुबईतील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक 'लँडमार्क'पैकी एक बनण्यासाठी सज्ज आहे, जे साम्राज्य असलेले विकासक, नवोन्मेषक आणि दूरदर्शींसाठी डिझाइन केलेले आहे. शाहरुख खान आणि 'डॅन्यूब' दोघांच्याही ३३ वर्षांच्या उत्कृष्टतेचा उत्सव हा टॉवर साजरा करतो. दोघांमधील लवचिकता, नवनिर्मिती आणि यशासाठी अथक प्रयत्नांच्या सामायिक मूल्यांचे हे एक प्रतीक आहे.
शाहरुख खान आणि रिझवान साजन यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आयोजित एका शानदार उत्सवात सायंकाळी ही घोषणा करण्यात आली. या अनावरणप्रसंगी शेकडो पाहुण्यांनी हजेरी लावली, ज्यात आघाडीचे समाजमाध्यम प्रभावक, व्यावसायिक नेते, गुंतवणूकदार, निर्माते आणि माध्यमकर्मी यांचा समावेश होता. त्यामुळे हा कार्यक्रम या वर्षातील सर्वात प्रसिद्ध रिअल इस्टेट अनावरणांपैकी एक ठरला आहे.
लाँचिंगच्या वेळी बोलताना शाहरुख खान म्हणाला: "दुबईतील एका महत्त्वाच्या ठिकाणी माझ्या नावे इमारत असणे हे माझ्यासाठी गौरवास्पद आणि हृदयस्पर्शी आहे. दुबई हे नेहमीच माझ्यासाठी एक खास ठिकाण राहिले आहे, कारण ते स्वप्ने, महत्त्वाकांक्षा आणि शक्यतांनी भारलेले शहर आहे. "शाहरुख्झ बाय डॅन्यूब" हे विश्वास आणि कठोर परिश्रम तुम्हाला किती दूर नेऊ शकतात याचे प्रतीक आहे. डॅन्यूबशी जोडल्याचा मला अभिमान आहे."
"शाहरुख खान आणि रिजवान साजन दोघांनीही ३३ वर्षांपूर्वी उत्कटता आणि चिकाटीतून प्रभाव निर्माण करण्यासाठी त्यांच्या प्रवासाची सुरुवात एका छोट्याश्या स्वप्नाने केली होती. शाहरुख खानने स्वप्नांना नशिबात रूपांतरित केले, हे एक तत्वज्ञान जे डॅन्यूबमधील आमच्या प्रवासाचे प्रतिबिंब आहे. 'शाहरुख्झ बाय डॅन्यूब' ही सुरूवात आणि अथक महत्त्वाकांक्षेच्या दोन कथांना एकत्र करते," असे डॅन्यूब ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रिजवान साजन म्हणाले.
'शाहरुख्झ बाय डॅन्यूब' हा १ दशलक्ष चौरस फूट 'बिल्ट-अप' क्षेत्रफळाचा एक प्रतिष्ठित विकास प्रकल्प आहे, जो लक्झरी, नावीन्यपूर्णता आणि स्टार पॉवरचे मिश्रण देतो. फक्त ४,७५,००० डॉलर/ ४.२ कोटी रुपयांपासून सुरूवातीच्या किमतीसह, हा ऐतिहासिक प्रकल्प दुबईमध्ये 'प्रीमियम रिअल इस्टेट'साठी एक नवीन मापदंड स्थापित करतो. या प्रीमियम बिझनेस टॉवरमध्ये ४० हून अधिक जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. त्याचे धोरणात्मक स्थान बुर्ज खलिफा आणि दुबई विमानतळापासून दुबईच्या सर्वात प्रतिष्ठित लँडमार्कशी अतुलनीय जवळीक प्रदान करते.












