Saturday, January 31, 2026

India leads a ‘Global Vision for Patient Safety’ at Day 1 of Apollo Hospitals International Health Dialogue 2026

 India leads a ‘Global Vision for Patient Safety’ at Day 1 of Apollo Hospitals International Health Dialogue 2026

Hyderabad, 31 January 2026: International Health Dialogue (IHD) 2026 opened today in Hyderabad, bringing together clinicians, patient safety leaders, accreditation experts, and health system policymakers from India and abroad. With the theme Global Voices. One Vision. Day 1 centred patient safety where it truly belongs, as a leadership and governance priority, shaped by equity and enabled by responsible digital transformation. The discussions reflected a clear direction across geographies: India’s lived experience of delivering care at scale, while steadily strengthening standards and accountability, is increasingly informing how the world thinks about patient safety and trust. 

Opening the conference, Dr. Sangita Reddy, Joint Managing Director, Apollo Hospitals Group, recalled the founding purpose of IHD as a platform built for sharing learning that should not remain confined to individual systems. “So much innovation is happening within our hospitals, within our systems. We are learning every day. But why is this knowledge staying within our own ecosystem? Why are we not sharing it more openly?” she said, adding that the intent has always been to “take what we have learned and make it useful for others.” Reflecting the expanding global relevance of the platform, she noted that IHD 2026 received over 5,000 registrations, 300+ paper submissions, and 120+ award entries from 75+ institutions worldwide.

Setting the tone for outcomes that work in real life, Dr Jayesh Ranjan, Special Chief Secretary for the Industries & Commerce (I&C) and Information Technology (IT) Departments, Government of Telangana, highlighted why equity must sit at the centre of patient safety design. “When we talk about sharing learning and improving systems, we have to start with the truth that patients are not homogeneous. Different patients live in different worlds, and safety means different things in each,” he said. “An equity lens forces a design lens. If we want patient safety to hold up in the real world, we must design for those who are most vulnerable, and we must plan for continuity, access, and how people actually behave,” he added. On digital inclusion, he observed, “The digital divide is not only infrastructure. Often, the mindset divide is bigger.”

Across the day, speakers converged on one practical point: patient safety outcomes increasingly depend on how well the ecosystem works as a coordinated whole, across regulators, accreditors, providers, and technology partners. In the opening plenary, Dr. Madhu Sasidhar, President and Chief Executive Officer, Hospitals Division, Apollo Hospitals Enterprise Limited, emphasised shared ownership and organisational accountability. “Patient safety cannot be solved by one stakeholder alone. It requires regulators, governments, accreditors, providers, and technology firms to work as one. Patient safety is not a departmental responsibility. It is in fact an organisational leadership responsibility.”

From a global quality and safety lens, Dr. Carsten Engel, CEO, International Society for Quality in Health Care (ISQua), reflected on the gap between sustained attention and on-ground improvement. “Patient safety has been on the agenda for decades, but we still have to say we are not there yet,” he said. He cautioned against adding activity without impact, noting, “We risk creating safety clutter, procedures and activities done in the name of safety that do not improve safety.” He urged leaders to adopt a systems view of behaviour and context: “Don’t ask why people didn’t do what they should have done. Ask why it made sense for them to do what they did.”

On standards and execution, Dr. Atul Mohan Kochhar, CEO, National Accreditation Board for Hospitals & Healthcare Providers (NABH), underlined urgency with an implementation-first approach. “Patient safety is not only a technical issue. It is a moral, social, and economic imperative. Policies alone do not improve safety. Implementation efficiency does,” he said. Reinforcing ambition in measurable terms, he added, “We must be ambitious when it comes to patient safety. Zero harm is the only number that can be accepted for patient safety risk.”

Building on this emphasis on implementation, accountability, and measurable safety outcomes, Apollo Hospitals also signed a Memorandum of Understanding with Roche Diagnostics India as part of Day 1 proceedings to explore the integration of advanced artificial intelligence into clinical decision-making. The collaboration will focus on translating AI-enabled insights into practical, clinician-friendly support across care pathways, strengthening consistency in clinical judgement, earlier risk identification, and safer, more standardised care delivery at scale.

Apollo’s emphasis on culture-led transformation was articulated by Dr. Rohini Sridhar, Chief of Medical Services, Apollo Hospitals, who stressed that systems improve only when clinical teams move together with the organisation. “Unless clinicians walk with you, zero harm cannot be achieved. If one unit experiences harm, every unit must learn immediately. Technology accelerates learning, but culture determines action.”

Later in the day, IHD 2026 hosted a dedicated spotlight session for the newly launched digital health startup community, with a curated set of startups pitching to investors. The session focused on solutions grounded in real clinical and operational gaps, including safer workflows, decision support, early risk identification, improved documentation, and scalable patient engagement. The segment reinforced IHD’s emphasis on translating innovation into validated, implementable tools that strengthen safety, outcomes, and trust.

IHD 2026 continues on January 31 in Hyderabad with further sessions and showcases focused on patient safety, digital transformation, healthcare operations, and clinical learning.

For further information contact :- Rajesh Dabhade 9594061617, Adfactors PR

अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

                             थोडी प्रतीक्षा…                                     मोठीधमाल! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’           आता १३ फेब्रुवारीला

अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता पुन्हा एकदा तेवढ्याच जोशाने आणि तेवढीच धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे थोड्या प्रतीक्षेनंतर, लवकरच कुरळे बंधूंची धमाल आणि गोंधळ प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

'पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट रतन, मदन, चंदन आणि बबन या वेगवेगळ्या स्वभावांच्या चार जणांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोंधळाची, गैरसमजांची आणि अनपेक्षित वळणांची धमाल सांगणार आहे. सतत बिघडत जाणारी परिस्थिती, छोट्या गोष्टींमधून मोठा गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारा विनोद हा या कथेचा  केंद्रबिंदू आहे. या सगळ्या गोंधळात रिंकू राजगुरूची एन्ट्री त्यांच्या आयुष्यात एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे. ती या चौघांच्या आयुष्यात का आली आणि तिच्या येण्याने सगळ्यांची गडबड का उडाली, याची उत्तरं चित्रपट पाहूनच मिळणार आहेत. या सगळ्यात बबनचा खोडकरपणा, मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता आणि रतनचा ताठर स्वभाव प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रेमात पाडणार आहे. 

चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अमेय विनोद खोपकर पिक्चर्सचे अमेय खोपकर म्हणतात, ''माननीय अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. हा आघात अत्यंत वेदनादायी असून, या दुःखात आम्हीही सहभागी आहोत. अशा काळात कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा करणे आम्हाला योग्य वाटले नाही. त्यामुळे संवेदनशीलतेची जाणीव ठेवत आम्ही ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तसेच इतर चित्रपटांच्या प्रदर्शनावर कोणताही परिणाम होऊ नये, याचीही काळजी घेत आम्ही हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित करत आहोत. संवेदनशीलतेला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय प्रेक्षकांकडूनही समजून घेतला जाईल, असा विश्वास आहे.''

या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे. तसेच उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे.

स्क्रिप्ट असतानाही स्क्रिप्टशियाव घडला रुबाब! अनोख्या मेकिंग स्टोरीने ‘रुबाब’ चर्चेत

स्क्रिप्ट असतानाही स्क्रिप्टशियाव घडला रुबाब! अनोख्या मेकिंग स्टोरीने ‘रुबाब’ चर्चेत

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ‘तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे’ ही चित्रपटाची टॅगलाईन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चित्रपटातील रुबाबदार जोडीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मात्र सध्या हा चित्रपट एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या मेकिंगमधील एक अनोखी बाब समोर आली आहे. 

ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळते, तसेच कलाकारांचा जबरदस्त अभिनयही दिसतो. कलाकारांच्या दमदार अभिनयामागे एक वेगळीच गोष्ट आहे. या चित्रपटासाठी कलाकारांना स्क्रिप्टच देण्यात आले नाही. कलाकारांनी २३ दिवस वेगवेगळ्या लोकेशन्सवर जाऊन रिहर्सल करून, वर्कशॉप करून या चित्रपटाचे शूटिंग केले मात्र, स्क्रिप्ट असूनही त्यांना स्क्रिप्ट मिळाले नाही. याचे कारण असे की, दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी प्रत्येक प्रसंग, संवाद आणि भावनिक पट त्यांच्या मार्गदर्शनातून सविस्तरपणे स्पष्ट केला, ज्यामुळे कलाकारांनी प्रत्यक्ष अनुभवातून सीन साकारले. या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे सेटवर सतत संवाद, चर्चा आणि सर्जनशील देवाणघेवाण सुरू होती. परिणामी, स्क्रिप्टपेक्षा समज, अनुभव आणि रिहर्सलवर आधारित अभिनयाची एक नवी प्रक्रिया ‘रुबाब’च्या निर्मितीत पाहायला मिळाली. 

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे व शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Friday, January 30, 2026

रोहिणी हट्टंगडी – मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र!

 रोहिणी हट्टंगडी – मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र!

‘माया’मध्ये अनुभवायला मिळणार स्वतंत्र स्त्रीमनाचा प्रगल्भ आविष्कार

मराठी रंगभूमीवर माय–लेकीचं नातं अत्यंत संवेदनशीलतेनं मांडणाऱ्या गाजलेल्या ‘चारचौघी’ या नाटकातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे या दोन दिग्गज अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. यावेळी त्या रंगभूमीवर नव्हे, तर मोठ्या पडद्यावर ‘माया’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

‘चारचौघी’सारख्या स्त्रीप्रधान नाटकानंतर आता ‘माया’ या चित्रपटातही या दोघी स्वतंत्र विचारांच्या, स्वाभिमानी आणि आत्मभान असलेल्या स्त्री व्यक्तिरेखा साकारणार आहेत. अनुभव आणि अभिनयातील परिपक्वतेचा संगम असलेली ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणारी ठरत आहे.

रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय म्हणजे सूक्ष्मतेतून मोठे भाव उलगडणारी प्रक्रिया, तर मुक्ता बर्वे ही आधुनिक स्त्रीचं सशक्त प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळे 'माया' मध्ये त्यांचा केवळ अभिनय नाही तर, स्त्रीमनाच्या विविध छटांची प्रगल्भ मांडणी पाहायला मिळणार आहे. 

रोहिणी हट्टंगडी म्हणतात, ''मुक्तासोबत पुन्हा काम करणं हा एक अत्यंत समाधान देणारा अनुभव आहे. ती एक संवेदनशील, विचारशील आणि स्वतःच्या अभिनयाबाबत प्रचंड प्रामाणिक अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करताना समोरची व्यक्तिरेखा अधिक सखोल होते. अभिनय म्हणजे केवळ संवाद बोलणं नसून, तो जगण्याचा अनुभव असतो आणि मुक्ताकडे तो अनुभव मनापासून स्वीकारण्याची क्षमता आहे. तिच्यासोबतचा प्रत्येक सीन मला अभिनेत्री म्हणून अधिक समृद्ध करून जातो.'' 

मुक्ता बर्वे आपल्या अनुभवाबद्दल बोलते, ''रोहिणी ताईंसोबत पुन्हा काम करणं, ही माझ्यासाठी शिकण्याचीच एक प्रक्रिया आहे. त्यांच्या अनुभवातून येणारी शांतता, प्रसंग समजून घेण्याची दृष्टी आणि अभिनयातील प्रगल्भता सतत प्रेरणा देते. सेटवर त्यांच्यासोबत असताना अभिनय सहज घडतो. त्यांनी आयुष्य आणि अभिनय दोन्ही खूप खोलवर अनुभवलं आहे आणि ते त्यांच्या प्रत्येक भूमिकेत दिसून येतं. अशा कलाकारासोबत काम करणं हे खरं तर भाग्य आहे.”

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित ‘माया’ या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर आणि विजय केंकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणारा ‘माया’ हा चित्रपट त्याच्या पोस्टरमुळे आधीच चर्चेत असून, नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी, स्त्रीमनाच्या स्वातंत्र्याची आणि आत्मशोधाची ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

*६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘आफ्टर ओ.एल.सी’ – दमदार ॲक्शन आणि थराराची पर्वणी!*

 *६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘आफ्टर                                           ओ.एल.सी’                               दमदार ॲक्शन आणि थराराची पर्वणी!*

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरलेला बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट ‘आफ्टर ओ.एल.सी’ अखेर आपल्या रिलीज डेटसह सज्ज झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला हा दमदार, ॲक्शन-पॅक्ड सिनेमा ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्यातील तगडी ॲक्शन, रहस्य आणि थरारक दृश्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रत्येक फ्रेममध्ये वेगळी ऊर्जा आणि कथा उलगडण्याची उत्सुकता निर्माण करणारा ‘आफ्टर ओ.एल.सी’ हा सिनेमा प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे.

या चित्रपटात कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके, अश्विनी चवरे यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची भक्कम टीम पाहायला मिळणार आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय देत चित्रपट अधिक प्रभावी केला आहे. थरार, रहस्य आणि जोरदार ॲक्शन यांचा उत्तम मेळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.कन्नड सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी ‘आफ्टर ओ.एल.सी’चे दिग्दर्शन केले असून, ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा मराठी भाषेत प्रदर्शित होणार असल्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल विशेष उत्सुकता आहे.

दमदार कथा, जबरदस्त ॲक्शन आणि रहस्यमय प्रवास घेऊन येणारा *‘आफ्टर ओ.एल.सी’ ६ फेब्रुवारीपासून* आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

थराराची ही सफर अनुभवण्यासाठी सज्ज राहा!

Tuesday, January 27, 2026

’पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग चर्चेचा केंद्रबिंदू!

 तीन भावांचा निरागस जल्लोष…

 ’पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग चर्चेचा केंद्रबिंदू!

कुरळे बंधू केमिस्ट्री म्हणजे नुसती गोष्ट नाही, तर धमाल, टोमणे, खट्याळपणा आणि मनमोकळा आनंद यांचा अखंड उत्सव! हाच उत्सव आता ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाच्या नव्या प्रमोशनल साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर हे दमदार, निरागस शब्दांचं आणि जबरदस्त एनर्जीने ओतप्रोत भरलेलं हे प्रमोशनल साँग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवधूत गुप्ते यांच्या खणखणीत आणि उत्स्फूर्त आवाजामुळे गाण्यात वेगळीच चैतन्याची लहर निर्माण झाली आहे. गौरव चाटी आणि आदित्य बेडेकर यांच्या संगीताने गाण्याला धमाल टच दिला असून विक्रांत हिरनाईक यांच्या साध्या, निरागस आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांतून तीन भावांमधील घट्ट नातं, इनोसंट बॉण्डिंग आणि मस्तीदार केमिस्ट्री सुंदरपणे उलगडते. हे गाणं ऐकताना पाय थिरकतातच, आणि चेहऱ्यावर हसूही नकळत उमटतं, म्हणूनच हा ट्रॅक खऱ्या अर्थाने ‘फील गुड’ ठरतोय.

या प्रमोशनल साँग निर्मिती प्रक्रिया देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे. चित्रपटाच्या कथेत गाण्यासाठी स्वतंत्र सीन नसल्यामुळे प्रमोशनल साँग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पहिलं गाणं अजय–अतुल यांचं असल्याने ते प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुळलं होतं. त्यामुळे त्या गाण्याच्या भावविश्वाशी सुसंगत असं, तरीही वेगळ्या ढंगाचं आणि तितकंच आपलेपण जपणारं गाणं देण्याचा विचार करण्यात आला.

याबाबत दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतो, “चित्रपटात गाणं बसवता येईल, असा सीन नव्हता, म्हणून प्रमोशनल गाण्याचा विचार केला. पहिलं गाणं प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करून गेलं होतं. त्यामुळे त्याच भावनेला पुढे नेणारं, तरीही वेगळ्या मांडणीचं काहीतरी करायचं होतं. अजय–अतुल यांच्याशी चर्चा झाली, मात्र त्यांच्या इतर कमिटमेंटमुळे ते शक्य झालं नाही. एका सेशनदरम्यान चित्रपटातील एक बॅकग्राऊंड ट्यून आठवली आणि त्याच बेसवर जबरदस्त गाणं तयार करण्याची कल्पना सुचली. यावेळी रोमँटिक झोनऐवजी निरागस, इनोसंट आणि पूर्णपणे तीन भावांभोवती फिरणारं गाणं करायचं ठरवलं.”

टीझर, ट्रेलरनंतर आता प्रमोशनल साँगने ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची उत्सुकता शिखरावर नेली आहे. तीन भावांचा हा धमाकेदार, निरागस आणि मनमोकळा जल्लोष मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ येत्या ३० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटात भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केलं आहे. उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते असून मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते आहेत. यापूर्वीही एव्हीके पिक्चर्सने अनेक मनोरंजनात्मक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहेत. यापुढेही ते असेच जबरदस्त चित्रपट घेऊन येतील.

*WELCOME TO THE JUNGLE Arrives in Theatres on 26th June 2026!*

 *India’s biggest and most awaited comedy franchise locks the release date! WELCOME TO THE JUNGLE Arrives in Theatres on 26th June 2026!*


A franchise which gets people rolling in laughter just with the reference of its iconic tune and audiences have been waiting with much antiWELCOME TO THE JUNGLE Arrives in Theatres on 26th June 2026!*cipation for the next edition, a comedy spectacle that promises unfiltered laughs, larger than life madness and non-stop entertainment *Welcome to the Jungle*, has officially locked its theatrical release for *26th June 2026.*

Packed with unique humour, outrageous situations and rib-tickling hilarious moments with a blend of high-octane action and blockbuster music, *Welcome to the Jungle* delivers high-energy comedy on an epic scale. Blending chaos, charm, blasts and unapologetic fun, the film is designed to be a complete laugh riot, offering audiences a joyride filled with surprises, punchlines and unforgettable moments.

Directed by Ahmed Khan ‘Welcome to the Jungle’ boasts of a massive ensemble cast of over 30 actors, each a benchmark of talent and known for their excellent comic timing, a combination that is rare sight on the big screen. Akshay Kumar, Suniel Shetty, Jackie Shroff, Raveena Tandon, Disha Patani, Jacqueline Fernandez, Arshad Warsi, Paresh Rawal, Rajpal Yadav, Johnny lever, Aftab Shivdasani, Lara Dutta, Shreyas Talpade, Tusshar Kapoor, Daler Mehndi, Farida Jalal, Krishna Abhishek, Kiku Sharda, Kiran Kumar, Mukesh Tiwari, Yashpal Sharma, Vindu Dara Singh, Nawab Shah, Urvashi Rautela, Puneet Issar, Arjun Firoz Khan, Late Pankaj Dheer, Sudesh Berry, Hemant Pandey, Zakir Hussain, Sayaji Shinde and many more all come together to deliver an epic entertainer.

AA Nadiadwala and Star Studio18 present in association with Cape of Good Films and Seeta Films ‘Welcome To the Jungle’ is a Base Industries Group and Seeta Films Production and directed by Ahmed Khan is all set to hit theatres worldwide on 26th June 2026.

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...